शहरं
Join us  
Trending Stories
1
आता जर चुकाल तर संपाल, मराठी माणसांना आवाहन; उद्धवसेना-मनसे युतीची अधिकृत घोषणा
2
Shiv Sena MNS Alliance: 'शिवतीर्थ'वर राज-उद्धव! बाळासाहेबांच्या स्मृतीस्थळावर संपूर्ण ठाकरे कुटुंबाचं अभिवादन
3
शिवसेनेनं 'करून दाखवलं', मनसेचं 'इंजिन' घसरलं! पाहा, मागील दोन निवडणुकांमध्ये नेमकं काय घडलं?
4
IND W vs SL W: भारताच्या 'लेडी सेहवाग'चा मोठा पराक्रम; स्मृती मानधना, दिप्ती शर्मा, जेमिमालाही टाकलं मागं!
5
'आम्ही भारतातील सर्वात मोठे फरार', ललित मोदी आणि विजय मल्ल्या यांचा सरकारवर हल्लाबोल; व्हिडीओ व्हायरल
6
सोने-चांदी-हिरे काही कमी नाही, राममूर्ती घडवायला दिले ३० कोटी; अयोध्येतील राम मंदिराला भेट दिली
7
Uddhav- Raj Thackeray PC: थोड्याच वेळात उद्धवसेना-मनसे युतीची अधिकृत घोषणा होणार; पत्रकार परिषदेकडे सगळ्यांचं लक्ष
8
कुणीही एकत्र आले तरी मुंबईत भाजपाचा महापौर बसेल; मंत्री बावनकुळेंचा ठाकरे बंधूंवर निशाणा
9
फास्ट फूडमुळे खरंच झाला विद्यार्थिनीचा मृत्यू? डॉक्टर आणि कुटुंबीयांनी सांगितलं धक्कादायक 'सत्य'
10
DCM शिंदे पोहोचले बाळासाहेबांच्या स्मृतीस्थळावर; ठाकरे बंधूंच्या यूतीपूर्वी घडामोडींना वेग
11
बांग्लादेशात हिंदूंवरील अत्याचार वाढले; चिटगावमध्ये कट्टरतावाद्यांनी हिंदूंची घरे जाळली
12
Vijay Hazare Trophy स्पर्धेतील पहिल्याच सामन्यात वैभव सूर्यवंशीचा धमाका! वादळी शतकासह रचला इतिहास
13
शेतकरी ते नोकरदार... बँकिंगपासून सोशल मीडियापर्यंत 'हे' ८ नियम १ जानेवारीपासून बदलणार
14
शरद पवारांची राष्ट्रवादी ठाकरे बंधूंच्या युतीत सहभागी होणार?; बैठकीतील इनसाइड स्टोरी समोर
15
नमो भारत ट्रेनमधील 'तो' अश्लील चाळा पडणार महागात! तरुण-तरुणीवर FIR; किती शिक्षा होणार?
16
अगदी बाबाची कॉपी! वडिलांसारखीच हँडसम आहेत हृतिकची मुलं, हृदान-हृहानचे डान्स मूव्ह्ज पाहून चाहते प्रेमात
17
सुधीर मुनंगटीवार यांनी घेतली CM देवेंद्र फडणवीसांची भेट; बैठकीत काय घडले, नाराजी दूर होणार?
18
अमेरिकेत 'एपस्टीन फाइल्स'चा महास्फोट! डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर 'तसले' गंभीर आरोप; रिपोर्टने खळबळ
19
इंडिगोची 'दादागिरी' आता चालणार नाही; सरकारने दोन नवीन विमान कंपन्यांना दाखवला हिरवा कंदील
20
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत विक्रमी वाढ सुरुच, आज किती आहे १० ग्रॅम सोन्याचा लेटेस्ट रेट?
Daily Top 2Weekly Top 5

१५ टक्के लागवडक्षेत्र पडित

By admin | Updated: September 17, 2016 00:58 IST

मातीतून सोनं उगवणारा उपाशी मरतो, ही बाब यंदाही अस्मानी संकटाच्या रूपाने प्रत्ययास येऊ लागली आहे.

पाऊस आला तरीही निराशाच : सरासरी ६९ टक्के पाऊसभंडारा : मातीतून सोनं उगवणारा उपाशी मरतो, ही बाब यंदाही अस्मानी संकटाच्या रूपाने प्रत्ययास येऊ लागली आहे. पावसाची चातकासारखी वाट बघणाऱ्या बळीराजावर वरूणराजा प्रसन्न होवून शेतातील धानपिकांना नवसंजीवनी मिळाली. परंतु दुसरीकडे पावसाच्या प्रतीक्षेची तग धरू न शकणाऱ्या जवळपास १५ टक्के धानक्षेत्रातील जमीन रोवणीअभावी पडीत राहण्याची चिन्हे आहेत. परिणामी पाऊस बरसला पण...त्याचा मेलेल्या धनाच्या पेंढींना उपयोग काय? अशी म्हणण्याची वेळ आली आहे.जिल्ह्यात दोन लाख नऊ हजार ५२७ हेक्टर क्षेत्रावर खरीप पिकांची लागवड होत असते. मागील वर्षीच्या तुलनेत यावर्षी पावसाच्या भरवश्यावर उत्पादन अधिक होईल, अशी आशा होती. मात्र पावसाने सुरूवातीला व मध्यांतरी असा दोनवेळा दगा दिला. पोळ्यापूर्वी बरसणारा वरूणराजा गणेशोत्सवात बरसला. धानपिकाला संजीवनी मिळाली. पावसाच्या अपेक्षेत रखडलेलेली रोवणी शेवटपर्यंत झाली नाही. जमिनीला भेगा पडल्या. बळीराजाच्या डोळ्यात अश्रू तरळले, पण पाऊस बरसला नाही. पंधरा दिवसांपूर्वी जी स्थिती होती, त्यात काही बदल झाला असला तरी गरजेच्या वेळी पाऊस न बसरल्याने रोवणीच्या प्रतीक्षेत असलेली रोपे कोमेजून नष्ट झाली. याचे प्रमाण किती याचे सर्वेक्षण होणे गरजेचे आहे. धान्य उत्पादनावर किती परिणाम होईल ही बाब येणारी वेळ ठरविणार असली तरी, सध्या तरी बळीराजाला मुसळधार पावसाची प्रतीक्षा कायम आहे. जिल्ह्याचा प्रमुख व्यवसाय शेती असून ८० टक्के लोकांचा उदरनिर्वाह शेती व्यवसायावरच आहे. दोन वषापुर्वी झालेल्या अतिवृष्टी व ढगफुटीमुळे शेतकऱ्यांची पिके नष्ट होऊन ओल्या दुष्काळाचे संकट बळीराजावर ओढावले होते. दररोज वातावरण ढगाळलेले होते. मात्र पाऊस पडत नाही. त्यामुळे पुन्हा शेतकरी चिंतेत होता. मागील आठवड्यात ही चिंता वरूणराजाच्या आगमनाने दुर झाली होती. आता पावसाने पुन्हा पाठ फिरविली काय? अशी स्थिती आहे. पिकांवर लष्करी अळी, तुळतुळा आदी रोगाने धान पिके ग्रासलेली आहे. एकीकडे पाण्याचा प्रश्न तर दुसरीकडे धानावर रोग अशा द्विधा मनस्थितीमध्ये शेतकरीवर्ग सापडलेला आहे. यावर्षी चांगला पाऊस पडेल असे भाकीत हवामान खात्याने वर्तविले होते. मात्र हवामान खात्याचे अंदाज खोटे ठरवित पाऊस पाहिजे त्या प्रमाणात आला नाही. शेतकऱ्यांचे वर्षभराचे गणित पावसावर अवलंबून असते. परंतु पावसाअभावी शेतकऱ्यांच्या पदरी निराशाच आली आहे. (प्रतिनिधी)