शहरं
Join us  
Trending Stories
1
'महादेवी' परतणार! नांदणी मठाजवळच हत्तीणीसाठी पुनर्वसन केंद्र उभारण्यास 'वनतारा' मदत करणार
2
Video: चीन आता 'लांडग्याला' युद्धावर पाठविणार, मिनिटाला ६० गोळ्या झाडणारा रोबो; सैन्यासोबत सरावाचा व्हिडीओ... 
3
रेल्वे कंत्राटावरून वाद, ३ मराठी भावंडांवर परप्रांतीयांचा प्राणघातक हल्ला; रॉडने डोके फोडले अन् रचला बनाव
4
तुमचा iPhone धोक्यात? ॲपल युजर्ससाठी भारत सरकारचा 'रेड अलर्ट', लगेच 'हे' काम करा!
5
'या' १६ देशांमध्ये चिकनगुनियाचा कहर, चीनमध्ये ७००० रुग्ण; अमेरिकेतही अलर्ट जारी
6
तेल, टॅरिफ अन् S-400..; डोनाल्ड ट्रम्प यांच्या इशाऱ्यानंतर अजित डोवाल रशियात दाखल
7
शाळेच्या गेटमधून आत शिरली, अचानक चक्कर येऊन कोसळली; सहावीतील विद्यार्थिनीचा हृदयविकाराने मृत्यू
8
Dadar Kabutarkhana: दादरमध्ये जोरदार राडा! कबुतरखान्यावरील ताडपत्र्या आंदोलकांनी हटविल्या, पोलिसांसोबत झटापट
9
दुसरा श्रावण गुरुवार: १० मिनिटांत होणारे प्रभावी ‘गुरुस्तोत्र’ म्हणा; दत्तगुरूंची कृपा मिळवा
10
डोळ्यांवर काकडी ठेवल्याने खरंच रिलॅक्स वाटतं की फक्त ब्यूटी ट्रेंड? सत्य समजल्यावर वाटेल आश्चर्य
11
शेतकऱ्यांसाठी १ दिवस मुंबई बंदचा आवाज उठवावा; 'शिवतीर्थ'वर बच्चू कडूंनी घेतली राज ठाकरेंची भेट
12
अपेक्षाभंग! RBI च्या निर्णयानंतर बाजार गडगडला; २.१३ लाख कोटींचा फटका! 'या' क्षेत्रात सर्वाधिक घसरण
13
...अन् धूर्त कोल्होबानं क्रिकेटच्या पंढरीतील Live मॅच थांबवली, नेमकं काय घडलं?
14
नवा ट्विस्ट! "तू ये, नाहीतर तो मला मारून टाकेल"; लेकीचा 'तो' ऑडिओ ऐकून कुटुंबाला मोठा धक्का
15
इम्रान खान समर्थकांचा पाकिस्तानात मोठा राडा, ५००हून अधिक लोकांना अटक! झालं काय?
16
RBI Repo Rate: रेपो रेट म्हणजे काय रे भाऊ? तो वाढल्यानं का वाढतो तुमचा EMI? जाणून घ्या
17
Video : दुचाकीवर हेल्मेट घालणं टाळता? हा व्हिडीओ बघाल तर पुढच्यावेळी घरातूनच हेल्मेट घालून बाहेर पडाल! 
18
"घरं गाडली गेली, फक्त छप्पर बाहेर; आम्ही शिट्ट्या वाजवत होतो जेणेकरून लोकांना पळता येईल"
19
दुसरा श्रावण गुरुवार: फक्त १० मिनिटे ‘अशी’ स्वामी सेवा करा; चिंतामुक्त व्हा, पुण्यच लाभेल!
20
ट्रम्प यांनी जपानला फसवलंय, आता भारताची पाळी..; चिनी एक्सपर्टनं अमेरिकेचा असा केला पर्दाफाश

१४८ ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुका

By admin | Updated: June 26, 2015 00:56 IST

आॅगस्ट ते आॅक्टोबर या कालावधीत मुदत संपणाऱ्या ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक व पोटनिवडणुकांचा कार्यक्रम

भंडारा : आॅगस्ट ते आॅक्टोबर या कालावधीत मुदत संपणाऱ्या ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक व पोटनिवडणुकांचा कार्यक्रम राज्य निवडणूक आयोगाने जाहीर केला आहे. पहिल्या टप्प्यात जिल्ह्यांतील १४८ ग्रामपंचायतींसाठी सार्वत्रिक तर १४ ग्रामपंचायतींमधील रिक्त पदाच्या पोटनिवडणुकांसाठी २५ जुलैला मतदान होईल. गुरुवारी अधिसूचना प्रसिध्द करण्यात आली असून निवडणुकीची आचारसंहिता जारी झाली आहे.सध्या जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीची रणधुमाळी सुरु आहे. चार जुलैला मतदान होणार असल्याने राजकीय पक्षांचे नेते जिल्हा परिषद निवडणुकीच्या प्रचारात व्यस्त आहेत. राज्य निवडणूक आयोगाने आॅगस्ट ते आॅक्टोबर या कालावधीत ग्रामपंचायत निवडणुकीचा कार्यक्रम करुन राजकीय नेत्यांना कामाला लावून दिले. जिल्ह्यातील १४८ ग्रामपंचायतींच्या ४६१ प्रभागासाठी सार्वत्रिक तर १४ ग्रामपंचायतीसाठी पोटनिवडणूक होत आहे.जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुकीची रणधुमाळी सुरु असतानाच निवडणूक आयोगाने ग्रामपंचायतचा निवडणूक कार्यक्रम जाहीर करून राजकीय नेत्यांना धक्का दिला आहे. जिल्हा परिषद निवडणुकीच्या तापलेल्या वातावरणात ग्रामपंचायत निवडणुकीची भर पडणार आहे. महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियम १९५८ च्या तरतुदीनुसार अनुसूचित जाती, जमाती किंवा नागरिकांच्या मागासवर्ग यांच्याकरिता राखीव असलेल्या जागेसाठी निवडणूक लढविणाऱ्या उमेदवाराला नामनिर्देशनपत्रासोबत जातीचे प्रमाणपत्र व जात पडताळणी समितीने दिलेले जात पडताळणी प्रमाणपत्राची प्रमाणित प्रत जोडणे बंधनकारक आहे. तसेच निवडणुकीचा २७ जुलैला निकाल जाहीर झाल्यापासून ३० दिवसाच्या आत उमेदवाराला निवडणूक खर्चाचा तपशील द्यावा लागणार आहे. भंडारा जिल्ह्यात जिल्हा परिषद, पंचायत समिती, अर्बन बँकेची निवडणूक असल्याने जिल्ह्यात राजकीय वातावरण तापले आहे. (नगर प्रतिनिधी)