शहरं
Join us  
Trending Stories
1
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
2
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
3
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
4
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
5
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
6
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
7
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
8
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
9
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
10
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
11
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
12
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
13
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
14
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
15
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
16
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
17
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
18
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
19
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
20
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
Daily Top 2Weekly Top 5

१४० शेतकऱ्यांनी दिला आत्मदहनाचा इशारा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 14, 2018 23:45 IST

गावासह तेथील नागरिकांच्या विकासासाठी औद्योगिक वसाहत उभारण्यावर शासनाने भर दिला आहे.

ठळक मुद्देसिंचनाअभावी शेती पडिक : राजेगाव एमआयडीसीत हरितक्रांतीला अडसर

आॅनलाईन लोकमतभंडारा : गावासह तेथील नागरिकांच्या विकासासाठी औद्योगिक वसाहत उभारण्यावर शासनाने भर दिला आहे. मात्र हेच औद्योगिक वसाहत भंडारा तालुक्यातील राजेगाववासीयांचे आयुष्य उद्ध्वस्त करणारे ठरले आहे. एमआयडीसीमुहे सिंचनासाठी पाणी मिळत नसल्याने राजेगाव येथील सुमारे २५० एकर शेती बंजर झाली आहे. त्यामुळे हवालदिल झालेल्या १४० शेतकऱ्यांनी आत्मदहन करण्याचा इशारा दिला आहे.राजेगावजवळून वाहणाऱ्या पाटामुळे येथील शेतकरी शेतीला सिंचन करून उत्पादन घेत होते. १९८२ च्या कालावधीत राज्य शासनाच्या औद्योगिक विकास धोरणानुसार राजेगाव येथे औद्योगिक वसाहतीची निर्मिती करण्यात आली.यानुसार सदर पाण्याचा प्रवाह असलेला पाट हा औद्योगिक वसाहतीतून मार्गक्रमण करणारा असल्याने तो औद्योगिक प्रक्रियेत समाविष्ट झाला. त्यामुळे या पाटाचे पाणी राजेगाव येथील नागरिकांना मिळणे बंद झाले. त्यामुळे ज्या शेतकºयांनी सिंचनाची व्यवस्था केली अशा शेतकºयांना वगळून अन्य शेतकरी सिंचन सुविधेपासून दूर झाले. त्यामुळे त्यांच्या शेती पडिक झाल्या आहेत. परिणामी शेतकरी शेती असूनही हवालदिल झाला आहे.औद्योगिक क्षेत्राची उभारणी करताना शासनाने येथील शेतकऱ्यांना रोजगार उपलब्ध करून देण्याचे अभिवचन दिले होते. यानुसार शेतकऱ्यांनी औद्योगिक वसाहतीतून जाणाºया पाण्याच्या प्रवाहाला विरोध केला असला तरी प्रशासनापुढे त्यांना नमते घ्यावे लागले. कालांतराने औद्योगिक वसाहतीमुळे शेतकरी पाण्यापासून व रोजगारापासून वंचित झाले. यामुळे शेतकरी व त्यांच्या कुटुंबियावर आर्थिक संकट ओढावले आहेत. २५० एकरातील ‘हरीतक्रांती’ आता ओसाड झाली आहे.औद्योगिक विकासाच्या नावावर ग्रामस्थांची शेती भकास केली आहे. शेतकऱ्यांना सिंचनापासून वंचित ठेवता येत नाही. जिल्हा प्रशासनाने याची वेळीच दखल घेणे गरजेचे आहे.- शशिकांत भोयर,जिल्हा महासचिव बसपा भंडारा.