शहरं
Join us  
Trending Stories
1
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
2
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
3
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
4
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
5
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
6
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
7
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
8
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
9
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
10
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
11
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
12
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
13
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
14
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
15
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
16
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
17
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
18
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
19
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
20
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
Daily Top 2Weekly Top 5

भंडाऱ्यातील सामाजिक न्याय विभागात १८ पैकी १३ पदे रिक्त

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 9, 2025 14:44 IST

कारभार प्रभारींच्या खांद्यावर : योजनांच्या अंमलबजावणीत अडथळे

लोकमत न्यूज नेटवर्क भंडारा : सामाजिक न्याय विभाग हा गरजू नागरिकांना आर्थिक, शैक्षणिक आणि सामाजिक साहाय्य पुरवित असतो. मात्र, सद्यस्थितीत या विभागात मंजूर १८ पदांपैकी केवळ ५ पदेच भरण्यात आली आहेत. ज्यामुळे या योजनांच्या अंमलबजावणीत अडथळे येत आहेत. वरिष्ठाचे पद रिक्त असल्याने ही जबाबदारी प्रभारींच्या खांद्यावर आहे.

भंडारा जिल्ह्याची राज्यात मागास जिल्हा म्हणून ओळख आहे. जिल्ह्याच्या ठिकाणी राज्याच्या समाजकल्याण कार्यालयाची भव्य शासकीय इमारत आहे. मात्र, या कार्यालयात वर्ग १ व वर्ग २ च्या तसेच स्थायी कर्मचाऱ्यांची कमतरता असल्याने जिल्ह्यातील नागरिकांची कामे वेळेत होत नसल्याची खंत नेहमीच ऐकण्यात येते.

याकडे शासन व लोकप्रतिनिधींनी लक्ष देण्याची गरज आहे. समाज कल्याण विभागामार्फत एकाच इमारतीत पाच महामंडळे, एक जात व्हॅलिडीटीचे कार्यालय, एक बहुजन विभागाचे कार्यालय, एक लायब्ररी, समाज कल्याण कार्यालय इतके कार्यालय असताना हे विभाग प्रभारी व कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या भरोशावर कामकाज सुरू आहे. 

जिल्हा परिषदेचा कारभारही प्रभारीवरचजिल्ह्यात अनुसूचित जाती, जमाती व भटक्या जातींची संख्या मोठ्या प्रमाणात आहे. समाज कल्याण विभागाच्या अनेक योजना आहेत. मात्र, अधिकाऱ्यांची पदे अनेक वर्षांपासून रिक्त आहे. मंजूर पदे १२ असून; चार पदे भरल्या गेली आहेत. वर्ग १ चे अधिकारीही प्रभारीच आहेत. या चार कर्मचाऱ्यांच्या भरोशावर जिल्हा परिषद समाज कल्याण विभागाचे कामकाज सुरू आहे. प्रभारी अधिकाऱ्यांच्या भरोशावर कार्यालय सुरू असल्याने समाजकल्याण विभागातील अनेक योजनांचा लाभ घेण्यास, नागरिकांना हेलपाटे मारावे लागत असल्याची चित्र पाहावयास मिळत आहे.

"नागरिकांना त्रास होणार नाही. आपली सामाजिक जबाबदारी आहे. याचे भान ठेवून काम करतो. वर्ग १ व वर्ग २ चे पदे भरतीची प्रक्रिया पार पडली असून, एप्रिलपर्यंत पूर्णपदे भरण्यात येणार आहेत."- डॉ. सचिन मडावी, उपायुक्त, समाजकल्याण विभाग, भंडारा.

"कर्मचारी कमी असतानाही समाजकल्याण सभापती म्हणून माझी सामाजिक बांधिलकी जोपासत, जिल्ह्यातील तळागाळातील लाभार्थ्यांचा नुकसान होऊ नये म्हणून प्रभारी अधिकाऱ्यांच्या मदतीने सर्व योजनांचे लाभ देण्यात कुठेही कमतरता भासणार नाही. याची काळजी घेत आहे. मंगळवारी लाभार्थ्यांसाठी शिलाई मशीन, सायकल व ताडपत्री वाटपाची यादी मंजूर केली असून, त्याचा लाभ लवकरच मिळणार आहे." - मदन रामटेके, सभापती, समाजकल्याण विभाग, जि. प. भंडारा.

टॅग्स :bhandara-acभंडारा