शहरं
Join us  
Trending Stories
1
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
2
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
3
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
4
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
5
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
6
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
7
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
8
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
9
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
10
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
11
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
12
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
13
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
14
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
15
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
16
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
17
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
18
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
19
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
20
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
Daily Top 2Weekly Top 5

ग्रामपंचायतींच्या पथदिव्यांची 12 काेटी 75 लाख थकबाकी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 2, 2021 05:00 IST

भंडारा जिल्ह्यात ५३७ ग्रामपंचायती असून त्याअंतर्गत ८९८ महसुली गावे आहेत. प्रत्येक गावात पथदिवे आहेत. वीज वितरणकडे या पथदिव्यांचे नाेंदणीकृत १२०० ग्राहक आहेत. त्यापैकी तब्बल १०९७ ग्राहक थकबाकीदार आहेत. तीन वर्षांपासून पथदिव्यांचे वीज बिल भरले नाही. त्यामुळे गत महिन्यांभरापासून वीज वितरणने धडक माेहीम हाती घेतली त्याअंतर्गत पथदिव्यांचा वीजपुरवठा खंडित करणे सुरू केले आहे.

ज्ञानेश्वर मुंदेलाेकमत न्यूज नेटवर्कभंडारा : ग्रामपंचायतींच्या पथदिव्यांचे वीज बिल कुणी भरावे यावरून वादविवाद सुरू असून थकीत वीज बिलापाेटी वीज वितरणने पथदिव्यांचा वीजपुरवठा खंडित केला आहे. जिल्ह्यातील ग्रामपंचायतीच्या १०९७ ग्राहकांकडे तीन वर्षांपासून १२ काेटी ७५ लाख रुपये थकीत आहे. वीज वितरणने गत आठवड्यात ५६ ग्रामपंचायतीच्या वीजपुरवठा खंडित केला. त्यामुळे गावांमध्ये अंधाराचे साम्राज्य पसरले आहे.भंडारा जिल्ह्यात ५३७ ग्रामपंचायती असून त्याअंतर्गत ८९८ महसुली गावे आहेत. प्रत्येक गावात पथदिवे आहेत. वीज वितरणकडे या पथदिव्यांचे नाेंदणीकृत १२०० ग्राहक आहेत. त्यापैकी तब्बल १०९७ ग्राहक थकबाकीदार आहेत. तीन वर्षांपासून पथदिव्यांचे वीज बिल भरले नाही. त्यामुळे गत महिन्यांभरापासून वीज वितरणने धडक माेहीम हाती घेतली त्याअंतर्गत पथदिव्यांचा वीजपुरवठा खंडित करणे सुरू केले आहे. जिल्ह्यातील १०९७ पथदिवे ग्राहकांकडे १२ काेटी ७५ लाख रुपये थकीत असून सर्वाधिक रक्कम भंडारा तालुक्यातील १९७ ग्राहकांकडे दाेन काेटी ७४ लाख रुपये आहे.पूर्वी ग्रामपंचायतीच्या पथदिव्यांचे वीज बिल शासन स्तरावर जिल्हा परिषदेच्या माध्यमातून भरले जात हाेते. त्यामुळे वीज बिलाची ग्रामपंचायतींना चिंता नव्हती. परंतु आता शासनाने हात वर केले असून ग्रामपंचायतींनाच पथदिव्याचे बिल भरावयाचे आहे. अनेक ग्रामपंचायतीकडे उत्पन्नाचे स्त्राेत नसल्याने पथदिव्यांचे वीज बिल थकीत राहिले. त्यातच आता वीज वितरण कंपनीने वीजपुरवठा खंडित करणे सुरू केले. त्यामुळे पावसाळ्यात आणि सणासुदीच्या दिवसात गावांमध्ये अंधाराचे साम्राज्य पसरले आहे.

वीज खंडीत करण्याची माेहीम थांबविलीवीज वितरण कंपनीने गत आठवड्यात वीजपुरवठा खंडित करण्याची माेहीम हाती घेतली हाेती. मात्र आता ती काही काळासाठी थांबविण्यात आली आहे. एप्रिल २०२१ नंतर आलेले वीज बिल ग्रामपंचायतींना भरावयाचे आहे. मात्र त्यापूर्वीचे वीज बिल काेण भरणार यावर अद्याप एकवाक्यता झाली नाही. त्यामुळे वीजपुरवठा खंडित करण्याची माेहीम थांबविल्याची माहिती आहे.पाणीपुरवठा याेजनांकडे २ काेटी ७० लाख थकीतजिल्ह्यातील ७६१ पाणीपुरवठा ग्राहकांपैकी तब्बल ५६२ पाणीपुरवठा याेजनांकडे वीज वितरण कंपनीचे दाेन काेटी ७० लाख रुपये थकीत आहेत. वसुलीसाठी वीज वितरण कंपनीने या सर्वांना नाेटीस बजावली आहे. ३९ पाणीपुरवठा याेजनांचा वीजपुरवठा खंडित करण्यात आला आहे.

ग्रामपंचायतींनी थकबाकी तातडीने भरून अप्रिय कारवाई टाळावी, तूर्तास वीजपुरवठा खंडित करण्याची माेहीम स्थगित करण्यात आली आहे. मात्र लवकरच पुन्हा माेहीम हाती घेतली जाणार आहे. ग्रामपंचायतीकडे माेठ्या प्रमाणात थकबाकी असल्याने कारवाई करण्याची वेळ आली.- राजेश नाईक, अधीक्षक अभियंता,वीज वितरण कंपनी भंडारा

 

टॅग्स :gram panchayatग्राम पंचायतelectricityवीज