शहरं
Join us  
Trending Stories
1
"अमेरिकेच्या हल्ल्यानंतरही आमचे अणुऊर्जा प्रकल्प सुरक्षित"; इराणने दिली माहिती, ट्रम्प यांचा दावा फेटाळला
2
VIDEO: इराणवर हल्ले सुरुच; अमेरिकेने दिलेली लढाऊ विमाने इस्रायलने केली नष्ट
3
इराणच्या अणुकेंद्रांवर अमेरिकेने टाकलेले बंकर बस्टर बॉम्ब एवढे आहेत विध्वंसक, अशी आहेत त्यांची वैशिष्ट्ये
4
तीन भाषा शिकण्यासाठी खेळाच्या तासात कपात; हिंदी शिकवण्यावरुन सुप्रिया सुळेंची CM फडणवीसांकडे मागणी
5
पुढच्या आठवड्यात बाजारात १२ कंपन्यांचे IPO, १५,८०० कोटींची उलाढाल! तुमच्यासाठी 'ही' सुवर्णसंधी!
6
"इराणने आता शांततेच्या मार्गावर यावे, अन्यथा...", अणुकेंद्रांवरील हल्ल्यानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा सक्त इशारा  
7
नोकऱ्या आल्या धोक्यात! सरकार शिक्षकांना म्हणते, ‘देता आधार, का करू अंधार’
8
अलिबाग: खांदेरीवर ‘मंकला’, ‘वाघबकरी’ खेळांचे अवशेष; शोधमोहिमेत सापडले मंकलाचे १० पट
9
बुलेट ट्रेनसाठी ४० मीटरचा बॉक्स गर्डर; महाराष्ट्रात प्रथमच बसवला पूर्ण लांबीचा गर्डर 
10
अमेरिकेचा प्रत्येक नागरिक आणि सैनिक आमच्या निशाण्यावर, अणुकेंद्रावर हल्ल्यानंतर इराणचा थेट इशारा  
11
मी अजूनही ठाकरेंसोबत; तेजस्वी घोसाळकरांचे स्पष्टीकरण, राजकीय वळण न देण्याचे केले आवाहन 
12
US Airstrikes Iran: तीन अणुऊर्जा केंद्रावर बॉम्बचा वर्षाव, अमेरिकेने इराणवर हवाई हल्ला कसा केला?
13
मुंबई, चेन्नईत सीबीआयचे छापे; ८०० कोटींच्या भ्रष्टाचार, जेएनपीएच्या माजी मुख्य व्यवस्थापकासह चौघांवर गुन्हा
14
"आधी ताकद दाखवली जाते, मग..."; अमेरिकेच्या हल्ल्यांवर इस्रायलने व्यक्त केला आनंद, नेतान्याहू म्हणाले, "धन्यवाद ट्रम्प"
15
आजचे राशीभविष्य - २२ जून २०२५, मान-प्रतिष्ठा ह्यात वाढ झाल्याने आपण आनंदित व्हाल
16
America Iran: अमेरिकेचा इराणमध्ये घुसून हल्ला! अनेक अणुऊर्जा केंद्रावर टाकले बॉम्ब; ट्रम्प म्हणाले, "आता..."
17
विशेष लेख: शिंदे-ठाकरे दोघांना भांडू द्या, तुम्ही निवडून कसे येणार हे बघा!
18
विमान कर्मचारी वेळापत्रकात आढळल्या गंभीर त्रुटी, एअर इंडियाच्या तीन अधिकाऱ्यांवर कारवाईचे आदेश
19
'मला नोबेल मिळणार नाही'; डोनाल्ड ट्रम्प यांनी व्यक्त केली खंत
20
हिंदी भाषा पुस्तकांच्या छपाईचे आदेशच नाहीत, कच्च्या आराखड्यास अंतिम मान्यताच नाही

१२६ पॉझिटिव्ह, तिघांचा मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 5, 2020 05:00 IST

भंडारा जिल्ह्यात लॉकडाऊन घोषित झाला तेव्हापासून आरटीपीसीआर तपासणी केली जात आहे. पहिला रुग्ण एप्रिल महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात आढळून आला होता. अलिकडे अ‍ॅन्टीजेन टेस्ट किटद्वारे तपासणी केली जात आहे. जिल्ह्यात आतापर्यंत ४८ हजार ४११ व्यक्तींची कोरोना तपासणी करण्यात आली आहे. त्यापैकी ४२ हजार ४२१ व्यक्ती निगेटिव्ह आढळून आले तर पॉझिटिव्ह आढळून आलेल्या ५९९० व्यक्तींपैकी ४११२ व्यक्तींनी कोरोनावर यशस्वी मात केली आहे.

ठळक मुद्देरविवारी १०६ जणांची सुटी : जिल्ह्यात आतापर्यंत ५ हजार ९९० व्यक्ती कोरोनाबाधित

लोकमत न्यूज नेटवर्कभंडारा : जिल्ह्यात कोरोना रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. जिल्ह्यात आतापर्यंत ४८ हजार ४११ व्यक्तींची अ‍ॅन्टीजेन आणि आरटीपीसीआर तपासणी करण्यात आली. त्यात ५९९० व्यक्ती पॉझिटिव्ह आढळून आले आहेत. दरम्यान रविवारी कोरोनामुळे तिघा जणांचा मृत्यू झाला आहे.भंडारा जिल्ह्यात लॉकडाऊन घोषित झाला तेव्हापासून आरटीपीसीआर तपासणी केली जात आहे. पहिला रुग्ण एप्रिल महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात आढळून आला होता. अलिकडे अ‍ॅन्टीजेन टेस्ट किटद्वारे तपासणी केली जात आहे. जिल्ह्यात आतापर्यंत ४८ हजार ४११ व्यक्तींची कोरोना तपासणी करण्यात आली आहे. त्यापैकी ४२ हजार ४२१ व्यक्ती निगेटिव्ह आढळून आले तर पॉझिटिव्ह आढळून आलेल्या ५९९० व्यक्तींपैकी ४११२ व्यक्तींनी कोरोनावर यशस्वी मात केली आहे. ८८३ जणांचा अहवाल अजूनही अप्राप्त आहे.तपासणीच्या तुलनेत पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या कमी असल्याने ही जिल्ह्यासाठी दिलासादायक बाब आहे. नागरिकही आता कोरोनाबाबत जागृक झाले असून संसर्ग टाळण्यासाठी स्वत:हून विविध उपाययोजना करताना दिसत आहे. जिल्ह्यातील एक लाख २० हजार ०६२ नागरिकांनी आरोग्य सेतू अ‍ॅप डाऊनलोड केला असून त्यामाध्यमातून कोरोनाबाबत इत्यंभूत माहिती मिळत आहेत.तसेच माझे कुटुंब, माझी जबाबदारी या मोहीमेंतर्गत गावागावात तपासणी मोहीम राबविली जात आहे.आयसोलेशन वॉर्डात ८९ रुग्णजिल्हा सामान्य रुग्णालयातील आयसोलेशन वॉर्डात सध्यास्थितीत ८९ रुग्ण कोविड अंतर्गत उपचार घेत आहेत. विशेष म्हणजे आतापर्यंत २२३७ व्यक्तींना आयसोलेशन वॉर्डातून सुटी देण्यात आली आहे. अतितिव्र श्वासदाह असलेल्या रुग्णांवर नजर ठेवली जात आहे. तसेच नागरिकांनी तपासणीसाठी समोर यावे, असे आवाहन केले आहे.सर्वाधिक रुग्ण भंडारा तालुक्यातजिल्ह्यात रविवारी १२६ व्यक्तींचा अहवाल पॉझिटिव्ह आला. त्यात भंडारा तालुक्यातील ५४, साकोली १७, लाखांदूर १३, मोहाडी ८, पवनी २३, लाखनी ११ रुग्णांचा समावेश असून तुमसर तालुक्यात एकही रुग्ण आढळून आला नाही. भंडारा तालुक्यातील एकूण रुग्णांची संख्या आता ३०८५ झाली आहे. त्यामुळे जिल्ह्यात सर्वाधिक रुग्ण भंडारा तालुक्यात आहे. तसेच साकोली तालुक्यात एकुण रुग्ण संख्या ४५९, लाखांदूर २६७, तुमसर ५२२, मोहाडी ५५२, पवनी ५४८ तर लाखनी तालुक्यात ५५७ रुग्ण आहेत.कोविडमुळे तरुणाचा मृत्यूजिल्ह्यात रविवारी कोरोनामुळे तीन जणांचा मृत्यू झाला असून त्यापैकी एका ३२ वर्षीय तरुणाचाही समावेश आहे. सदर तरुण हा तुमसर तालुक्यातील रहिवासी होता. तसेच भंडारा तालुक्यातील ६५ वर्षीय वृध्द कोरोनाने मृत पावले. तर साकोली तालुक्यातील ६६ वर्षीय वृध्दाचा कोरोनामुळे जिल्हा सामान्य रुग्णालयात मृत्यू झाला.

टॅग्स :CoronaVirus Positive Newsकोरोना सकारात्मक बातम्या