मोहदुरात १२ म्हशींची सुटका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 24, 2019 09:56 PM2019-03-24T21:56:05+5:302019-03-24T21:56:27+5:30

कत्तलीसाठी जाणाऱ्या १२ म्हशींची सुटका स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने शहापूर ते सातोना मार्गावरील मोहदुरा येथे केली. याप्रकरणी दोन वाहने जप्त करण्यात आली असून चालकांविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

12 buffaloes rescued in Mohandur | मोहदुरात १२ म्हशींची सुटका

मोहदुरात १२ म्हशींची सुटका

Next
ठळक मुद्देदोन वाहने जप्त : स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई

लोकमत न्यूज नेटवर्क
भंडारा : कत्तलीसाठी जाणाऱ्या १२ म्हशींची सुटका स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने शहापूर ते सातोना मार्गावरील मोहदुरा येथे केली. याप्रकरणी दोन वाहने जप्त करण्यात आली असून चालकांविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
शहापूर ते सातोना मार्गावरुन जनावरांची अवैध वाहतुक होत असल्याची माहिती स्थानिक गुन्हे शाखेचे प्रमुख रविंद्र मानकर यांना मिळाली. त्यांनी आपल्या पथकासह शनिवारी सायंकाळी सापळा रचला त्यावेळी एका मागोमाग असलेल्या दोन वाहनांची तपासणी केली असता त्यात जनावरे आढळून आले.
टेम्पो क्रमांक एमएच ३६ एफ ३६०२ या वाहनात सात म्हशी तर चारचाकी पिकअप वाहनात (क्र. एम एच ३६ एए ५९८) एक रेडा आणि चार म्हशी अशी पाच जनावरे आढळून आले. याप्र्रकरणी चालक धर्मेंद्र रामभाऊ बसेशंकर (३२) व अमन दिलीप ठोसरे (२२) दोघे रा. जांब ता. मोहाडी यांना ताब्यात घेण्यात आले.
१२ म्हशींची किंमत एक लाख २० हजार रुपये असून त्यांची रवानगी भगिरथी गोअनुसंधान मालीपार येथे करण्यात आली. दोन्ही चालकांविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला. ही कारवाई पोलीस अधीक्षक अरविंद साळवे, अप्पर पोलीस अधीक्षक रश्मी नांदेडकर यांच्या मार्गदर्शनात स्थानिक गुन्हे शाखेचे प्रमुख रविंद्र मानकर, पोलीस उपनिरीक्षक सचिन गदादे, जितेंद्र आडोळे, हवालदार साकोरे, कुथे, मोहरकर, मेश्राम, कडव, तायडे, बेदुरकर, मडावी यांनी केली.

Web Title: 12 buffaloes rescued in Mohandur

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.