शहरं
Join us  
Trending Stories
1
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
2
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
3
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
4
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
5
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
6
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
7
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
8
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
9
महाकुंभातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने केले लग्न; पत्नी काय करते? जाणून घ्या...
10
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
11
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
12
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
13
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
14
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
15
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
16
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
17
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
18
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
19
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
20
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
Daily Top 2Weekly Top 5

जिल्ह्यातील 1154 मामा तलाव मोजत आहेत अखेरच्या घटका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 1, 2022 05:00 IST

गोंड राजांच्या साम्राज्यात पूर्व विदर्भात तलावांची निर्मिती करण्यात आली होती. ब्रिटिशांच्या काळात सर्व तलाव तत्कालीन जमीनदार अर्थात मालगुजारी करणाऱ्यांच्या ताब्यात गेले. म्हणूनच या तलावांना आता माजी मालगुजारी अर्थात मामा तलाव म्हणून ओळखले जाते. जिल्ह्यात सद्यस्थितीत ११५४ मामा तलाव आहेत. या तलावांची साठवण क्षमता ८७.२४ दलघमी असून २४ हजार ९२५ हेक्टर सिंचन क्षमता आहे. जिल्ह्यातील प्रत्येक गावात मामा तलाव आहेत. सिंचनासोबतच या तलावांचा उपयोग मत्स्य पालनासाठीही केला जातो. 

इंद्रपाल कटकवारलोकमत न्यूज नेटवर्कभंडारा : तलावांमुळे संपूर्ण राज्यात ओळख असलेल्या भंडारा जिल्ह्यातील माजी मालगुजारी अर्थात मामा तलावांची स्थिती दयनीय झाली आहे. अतिक्रमण, देखभाल दुरुस्तीचा अभाव यामुळे जिल्ह्यातील ११५४ मामा तलाव अखेरच्या घटका मोजत आहेत. २५ हजार हेक्टर सिंचन क्षमता या तलावांच्या देखभाल दुरुस्तीसाठी तीन वर्षांपासून निधीच मिळाला नाही.गोंड राजांच्या साम्राज्यात पूर्व विदर्भात तलावांची निर्मिती करण्यात आली होती. ब्रिटिशांच्या काळात सर्व तलाव तत्कालीन जमीनदार अर्थात मालगुजारी करणाऱ्यांच्या ताब्यात गेले. म्हणूनच या तलावांना आता माजी मालगुजारी अर्थात मामा तलाव म्हणून ओळखले जाते. जिल्ह्यात सद्यस्थितीत ११५४ मामा तलाव आहेत. या तलावांची साठवण क्षमता ८७.२४ दलघमी असून २४ हजार ९२५ हेक्टर सिंचन क्षमता आहे. जिल्ह्यातील प्रत्येक गावात मामा तलाव आहेत. सिंचनासोबतच या तलावांचा उपयोग मत्स्य पालनासाठीही केला जातो. मात्र, गेल्या कित्येक वर्षांपासून या तलावांतील गाळ काढण्यात आला नाही. अनेक तलावांची पाळी फुटली असून पावसाळ्यात पाणी वाहून जाते. तलावांवर  अतिक्रमण झाले असून देखभाल दुरुस्ती होत नाही. जिल्हा परिषदेच्या अखत्यारीत असलेल्या या तलावांच्या दुरुस्तीसाठी दरवर्षी निधी मिळतो. मात्र, तीन वर्षांपासून प्रस्ताव पाठवूनही निधी मिळाला नाही. 

तीन कोटी १० लाखांचा प्रस्ताव- भंडारा जिल्ह्यातील मामा तलावांचे खोलीकरण, पाळी बांधणे, कालव्यांची दुरुस्ती, गेट दुरुस्ती आदींसाठी जिल्हा परिषदेच्या लघु पाटबंधारे विभागाने तीन कोटी १० लाख रुपयांचा प्रस्ताव पाठविला आहे. हा प्रस्ताव नागपूर येथील मृदा व जलसंधारण विभागाच्या प्रादेशिक जलसंधारण अधिकाऱ्यांकडे पाठविण्यात आला.  मात्र, अद्यापपर्यंत या तलावांच्या दुरुस्तीसाठी निधी मिळाला नाही.

 

टॅग्स :Irrigation Projectsपाटबंधारे प्रकल्प