शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
2
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
3
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
4
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
5
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
6
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
7
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
8
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
9
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
10
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
11
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
12
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
13
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
14
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
15
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
16
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
17
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
18
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
19
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
Daily Top 2Weekly Top 5

नदीपात्रात बुडून ११ वर्षीय बालकाचा करूण अंत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 25, 2018 22:52 IST

मित्रांसोबत नदीवर पोहायला गेलेल्या ११ वर्षीय मुलाचा नदीत बुडून करूण अंत मृत्यू झाला. गावकऱ्यांच्या सतर्कतेने दोघांचे जीव वाचले. हर्षल विठोले (११) असे मृत बालकाचे नाव आहे. ही घटना शनिवारी सकाळी ११ वाजताच्या सुमारास खोडगाव येथील सुरनदी पात्रात घडली.

ठळक मुद्देखोडगाव येथील घटना : दोघांचा जीव वाचला

लोकमत न्यूज नेटवर्कवरठी : मित्रांसोबत नदीवर पोहायला गेलेल्या ११ वर्षीय मुलाचा नदीत बुडून करूण अंत मृत्यू झाला. गावकऱ्यांच्या सतर्कतेने दोघांचे जीव वाचले. हर्षल विठोले (११) असे मृत बालकाचे नाव आहे. ही घटना शनिवारी सकाळी ११ वाजताच्या सुमारास खोडगाव येथील सुरनदी पात्रात घडली.सुभाष वार्ड वरठी येथील सुमेध ठाकूर (१३), देवेंद्र गोमासे (१५) व हर्षल विठोले (११) हे तिघेही शनिवारी सकाळी खोडगाव येथील नदीत पोहायला गेले होते. नदी पात्रात जाताना तिघांनी कपडे कडून नदीत पोहण्याची तयारी केली. दरम्यान हर्षल वेगाने पाण्यात उतरला. नदीतील पाण्याच्या पातळीचा अंदाज चुकल्याने तो वाहुन गेला. त्याच्या मागोमाग इतर दोन मित्र पाण्याच्या प्रवाहात जाणार एवढ्यात नदीच्या काठावर असलेल्या लोकांनी आरडाओरड केली.देवेंद्र गोमासे हा सुद्धा पाण्याच्या दिशेने वाहून जाण्याच्या स्थितीत असताना त्याला नागरिकांनी पाण्यातून बाहेर काढले. यात दोघांचा जीव वाचला असून हर्षल पाण्यात बुडाला. त्याचे मृतदेह शोधण्याचा काम सुरू असून सायंकाळ पर्यंत शोध लागला नव्हता. हर्षल हा लालबहादूर शास्त्री विद्यालय भंडारा येथे ५ व्या वर्गात तर देवेंद्र आणि सुमेध हे नवप्रभात हायस्कुल वरठी येथे इयत्ता १० व ८ वर्गात शिकत आहेत.तिघेही शाळेत गेले नव्हते. मृतक हर्षल हा आई वडिलांना एकुलता मुलगा आहे. त्याचे पालक फळ बाजी विक्री करतात. एक महिन्यापासून त्याची प्रकृती बरी नसल्याने तो शाळेत नियमित जात नसल्याची माहिती वडिलांनी दिली. घटनेची माहिती मिळताच वरठी पोलीस स्टेशन चे पोलीस निरीक्षक एस बी ताजने ताफ्यासह घटना स्थळावर हजर झाले. मृतदेह शोधण्यासाठी दोन चमू तयार करून शोधाशोध सुरू होती. दरम्यान घटनास्थळी माजी जिल्हा परिषद सदस्य दिलीप उके, माजी सरपंच संजय मिरासे, माजी उपसरपंच मनोज सुखाणी, सामाजिक कार्यकर्ते कैलास बन्सोड उपस्थित होते.