शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्यात ‘कृषी समृद्धी’ योजना राबविणार ; जुन्या योजनेत गैरप्रकार, नवी पीकविमा योजना लागू 
2
नाही-नाही करत अखेर जयंत पाटील यांचा राजीनामा; शशिकांत शिंदे नवे प्रदेशाध्यक्ष
3
वेलकम बॅक शुभांशू... चारही अंतराळवीरांचे पृथ्वीवर सुखरूप आगमन
4
बिस्किटांच्या बॉक्समधून ६० कोटींच्या कोकेनची तस्करी; भारतीय महिलेला अटक
5
धक्कादायक! एक कोटी १२ लाख एसआयपी बंद म्हणजे बंदच...; का पैसे काढून घेतायत लोक...
6
दिलासा देणारी बातमी...! वर्षाला ५ लाखांपर्यंत उत्पन्न असलेल्यांच्या कमाईत वाढ
7
झोपडपट्टी पुनर्विकासाच्या मुद्द्यावरून गदारो‌ळ, मंत्री देसाई अन् ठाकरे-सरदेसाईंमध्ये खडाजंगी
8
आर्थिक गंडा घातल्यास दंडही वाढेल अन् वसुलीही होईल; मुख्यमंत्री फडणवीस यांची विधानसभेत घोषणा
9
भाजप आमदारांची मागणी भाजपच्याच मंत्र्यांनी लावली धुडकावून; बाजार समितीवरून झाला खेळ...
10
२३ वर्षांपूर्वीच्या कांदा धोरण समितीच्या अहवालाचे काय?
11
बोगस डॉक्टर, पॅथलॅबप्रकरणी कायद्यासाठी लवकरच समिती; नगरविकास राज्यमंत्री  मिसाळ यांची घोषणा
12
कुत्र्यांना तुमच्या घरी का खाऊ घालत नाही? याचिकाकर्त्याला सर्वोच्च न्यायालयाने सुनावले
13
अभिव्यक्ती स्वातंत्र्य म्हणजे चिखलफेक करणे नव्हे : कोर्ट
14
सावत्र बापाने घात केला, बेपत्ता चिमुरडीचा मृतदेह सापडला ससून डाॅक समुद्रात 
15
निमिषा प्रियाची फाशी टाळण्यात महत्त्वाची भूमिका बजावणारे ९४ वर्षीय मुस्लीम धर्मगुरू कोण? कुठे आणि कशी झाली चर्चा?
16
सोशल मीडियावर फॉलोअर्स वाढवण्याच्या नादात तरुणी गेल्या तुरुंगात, अख्खा गाव विरोधात, नेमका प्रकार काय?   
17
‘’महाराष्ट्रातील सर्वजण मराठीच, मराठीला हात लावाल तर खबरदार, काँग्रेसचा हिंदीला विरोध नाही तर…’, हर्षवर्धन सपकाळ यांचं मोठं विधान
18
'मी मज हरपून...' आशा भोसलेंची नात जनाई आहे खूपच बिनधास्त अन् 'ब्यूटिफूल', पाहा तिचे ग्लॅमरस Photos
19
"मॉस्को आणि सेंट पीटर्सबर्गवर हल्ला करू शकता?"; झेलेन्स्की यांच्या सोबत झालेल्या सिक्रेट बैठकीत ट्रम्प यांनी तयार केला खतरनाक प्लॅन!
20
Video: "आता राजही सोबत आलेला आहे", उद्धव ठाकरे यांचं मोठं विधान; १९ जुलैला 'राज' उलगडणार?

११ ट्रक, २ ट्रॅक्टर, जेसीबी मशीन जप्त

By admin | Updated: January 24, 2017 00:27 IST

वैनगंगा नदीपात्राच्या निलज घाटावर मशिनच्या सहाय्याने रेतीचा नियमबाह्य उपसा सुरू होता.

रेतीचा उपसा सुरूच : करडी पोलिसांची मोठी कारवाई तुमसर : वैनगंगा नदीपात्राच्या निलज घाटावर मशिनच्या सहाय्याने रेतीचा नियमबाह्य उपसा सुरू होता. याप्रकरणी करडी पोलिसांनी सापळा रचून ११ ट्रक, दोन ट्रॅक्टर, एक जेसीबी मशिन जप्त केली. करडी पोलिसांची ही आतापर्यंतची मोठी कारवाई आहे.भंडारा जिल्ह्यातील रेती प्रसिद्ध आहे. वैनगंगा नदी पात्रातील रेतीला नागपुरात मोठी मागणी आहे. रेती तस्कराकडून नियमबाह्यपणे रेतीचा उपसा करतात. निलज रेती घाटातून रात्रीच्या वेळी रेतीचा मोठ्या प्रमाणावर उपसा सुरू असल्याची माहिती पोलिसांना मिळताच त्यांनी नदी पात्रात धाड टाकत ११ ट्रक, दोन ट्रॅक्टर व १ जेसीबी मशीन जप्त केली. ट्रक क्रमांक एमएच ३१ सीबी ९८५८, एमएच ४० एके ३५९१, एमएच ३१ सी क्यु ९५७९, एमएच ४० एके २८२४, एमएच ३६ एफ ३०२५, एमएच ३६ एफ ३४३०, एमएच ३६ जी ६६७७, एमएच ३६ जी १७५१, एमएच ४० एके ४५९१, एमएच ४० सीक्यु ३३४९, एमएच ३१ बीएस ७५५३, ट्रॅक्टर क्रमांक एमएच ३५ जी १६५२, ट्रॉली क्रमांक एमएच ३५ - ५१७०, एमएच ३५ बी ८१८० व जेसीबी मशिनचा समावेश आहे. जेसीबी मशिनचा अधिकृत कोणताच क्रमांक नाही.सर्व वाहन जप्त करून भादंवि ७९, ५११, १८८ कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आले. राज्य शासनाच्या परिपत्रकानुसार सुर्याेदय ते सुर्यास्तपर्यंतच नदी पात्रातून रेतीचा उपसा करता येतो. यातही यंत्राचा समावेश नसावा, अशी अट निविदेत नमूद करण्यात येते. रात्रीला नदीपात्रातून रेतीचा उपसा करता येत नाही. निलज रेती घाटावर यंत्राच्या साहायने मध्यरात्री रेतीचा उपसा करणे सुरू होते. त्यामुळे ट्रक मालकांवर गुन्हा दाखल करण्यात आला. सध्या ही वाहने करडी पोलीस ठाण्यात जमा करण्यात आले आहे. (तालुका प्रतिनिधी)मध्यरात्री रेतीचा उपसा करता येत नाही. निलज रेती घाटावर रेती उपसा सुरू होता. धाड टाकून त्यांच्यावर नियमानुसार कारवाई करण्यात आली. यात मशीनचा समावेश आहे.-पी.के. बोरकुटे, सहायक पोलीस निरीक्षक करडी.