शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

१०८ अ‍ॅम्बुलन्सची दोन लाखांवर रुग्णसेवा

By admin | Updated: July 1, 2017 00:29 IST

संपूर्ण महाराष्ट्राला वरदान ठरलेल्या १०८ अ‍ॅम्ब्युलन्स सेवेने रुग्णसेवेचा उच्चांक गाठला आहे.

एका क्लिकवर मदत : जनतेला प्रोत्साहित करण्याचे आरोग्य विभागाचे आवाहनहितेश रहांगडाले । लोकमत न्यूज नेटवर्कवडेगाव : संपूर्ण महाराष्ट्राला वरदान ठरलेल्या १०८ अ‍ॅम्ब्युलन्स सेवेने रुग्णसेवेचा उच्चांक गाठला आहे. यशस्वी मार्गक्रमण करीत नागपूर विभागात या सेवेने दोन लाखाहून अधिक रुग्णांना सेवा दिल्याचे वास्तव पुढे आले आहे.महाराष्ट्र इमर्जन्सी मेडीकल सर्व्हिस प्रोजेक्ट अंतर्गत बीव्हीजी इंडिया मार्फत संपूर्ण महाराष्ट्रात १०८ अ‍ॅम्ब्युलन्स सेवेची सुरुवात करण्यात आली. १ जानेवारी २०१४ पासून सुरू झालेल्या या सेवेने अवघ्या तीन वर्षाच्या अल्पकाळात दोन लाखांहून अधिक रुग्णांना सेवा पुरविण्यात आली आहे. सदर सेवेंतर्गत बेसीक लाईफ स्पोर्ट (बीएलएस) व अ‍ॅडव्हांस लाईफ स्पोर्ट (एएलएस) अशा दोन प्रकारच्या अ‍ॅम्ब्युलॅन्स सेवा पुरविण्यात आल्या असून संपूर्ण राज्यात ९३७ अ‍ॅम्ब्युलॅन्स सेवा देत आहेत. सदर सेवा पूर्णत: नि:शुल्क असून १०८ या टोल फ्री क्रमांकाद्वारे या सेवेचा लाभ गरजूला घेता येतो. एवढेच नव्हे तर सदर सेवेने अलीकडेच मोबाईल अ‍ॅप सुरू केले आहे. त्यामुळे सदर अ‍ॅपद्वारे एका क्लिकवर गरजूला मदत मिळू शकते. यासाठी रुग्णाचा पत्ता सांगण्याची गरजही पडत नाही.नागपूर विभागात १०८ अ‍ॅम्ब्युलॅन्स कार्यरत आहेत. गोंदिया जिल्ह्यात १३, भंडारा ११, नागपूर ४२, वर्धा ११, चंद्रपूर २१, गडचिरोली १० याप्रमाणे १०८ अ‍ॅम्ब्युलॅन्स सेवा देत आहेत. १०८ अ‍ॅम्बुलन्स सेवेच्या तत्परतेने सर्वच नागरिक समाधानी असून गरजंूना वाहन व आरोग्य सेवा एकाचवेळी सहज व मोफत उपलब्ध होत आहे.मार्च २०१४ पासून सुरू झालेल्या १०८ अ‍ॅम्ब्युलन्स सेवेचे अगदी कार्य अगदी धडाडीने सुरू आहे. मागील तीन वर्षात अ‍ॅम्ब्युलॅन्स सेवेचा आकडा दोन लाखाच्या जवळपास पोहोचलेला आहे.सदर सेवा गरजू रुग्णांकरिता सहज व मोफत असून जनतेने याचा लाभ घेण्याकरिता पोलीस पाटील, तलाठी, पदाधिकारी व सुशिक्षितांनी जनतेला प्रोत्साहित करण्याचे आवाहन आरोग्य विभाग व शासनाच्यावतीने करण्यात आले आहे.