इंद्रपाल कटकवार भंडारास्थानिक गुन्हे शाखेने गत वर्षभरात केलेल्या १०० कारवाईत २७९ जणांना अटक करून ४१ लाख १२ हजारांचे रूपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. ही फक्त लोकल क्राईम ब्राँचने केलेली कारवाई असून जिल्ह्यातील १५ पोलीस ठाण्यांतर्गत करण्यात आलेली कारवाई वेगळी आहे. परिणामी जिल्ह्यात क्राईमच्या आलेखात चढउतार होत आहे.विविध नावीन्यपूर्ण कामगिरींनी भंडारा येथील लोकल क्राईम ब्राँच नेहमी चर्चेत असते. तुमसर तालुक्यात भरणाऱ्या कोंबड बाजारावर धाड असो की भंडारा शहरात झालेल्या ‘डबल मर्ङर मिस्ट्री’, स्थानिक गुन्हे शाखेने वेळोवेळी तत्परता दाखवीत तपासाअंती आरोपींना बेड्या ठोकल्या आहेत. एलसीबीने मागील वर्षभरात घडलेल्या खून, जबरी चोरी, घरफोडी, मोटारवाहन चोरी, दारूची अवैध वाहतूक, हत्यार कायदा, पिटा अॅक्ट (प्रिव्हेंशन आॅफ इमॉरल ट्रॅफीक अॅक्ट) यासह अन्य प्रकरणात एकूण १०० गुन्हे उघडकिला आणले. यात एकूण ६८ जणांना करून त्यांच्या ताब्यातून ४१ लक्ष १२ हजार ३०१ रूपयांचे साहित्य हस्तगत केले आहेत. यात जबरी चोरीचे ३ गुन्हे, घरफोडीचे १३ हत्यार कायद्यातंर्गत २ गुन्हे उघडकिला आणले. २०१५ मध्ये सप्टेंबर महिन्यात म्हाडा कॉलनीत घडलेला थरार व प्रगती कॉलनीत झालेल्या चोरीच्या घटनेचा तपास अवघ्या दहा तासात लावून आरोपींना जेरबंद केले होते. खुनाच्या दोन घटनेत एकूण १२ आरोपींना पथकाने अटक केली.
१०० गुन्ह्यांमध्ये २७९ आरोपी गजाआड
By admin | Updated: February 25, 2016 00:34 IST