शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

अनैसर्गिक कृत्य करणाऱ्या आरोपीला १० वर्षे कारावासाची शिक्षा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 6, 2018 00:44 IST

एका ११ वर्षीय बालकाशी अनैसर्गिक कृत्य केल्याप्रकरणी अतिरिक्त सत्र न्यायाधीश सचिन भन्साली यांनी आरोपीला १० वर्षे सक्षम कारावास व द्रव्यदंडाची शिक्षा गुरूवारला सुनावली.

ठळक मुद्देचप्राड येथील घटना : अतिरिक्त सत्र न्यायालयाचा निर्णय

लोकमत न्यूज नेटवर्कभंडारा : एका ११ वर्षीय बालकाशी अनैसर्गिक कृत्य केल्याप्रकरणी अतिरिक्त सत्र न्यायाधीश सचिन भन्साली यांनी आरोपीला १० वर्षे सक्षम कारावास व द्रव्यदंडाची शिक्षा गुरूवारला सुनावली. चक्रधर बगमारे (२५) रा.चप्राड ता.लाखांदूर असे शिक्षा ठोठावलेल्या आरोपीचे नाव आहे.२३ डिसेंबर २०१५ रोजी लाखांदूर तालुक्यातील चप्राड येथे पीडित ११ वर्षीय मुलगा हा घराशेजारी मुलासोबत खेळत होता. घरासमोर कार्यक्रम सुरु असल्याने सायंकाळी त्याच मुलांसोबत जेवणासाठी गेला. परंतु तिथून तो घरी परतला नाही, त्यामुळे कुटूंबीयांनी त्याची शोधाशोध केली. दरम्यान रात्री ८ वाजताच्या सुमारास हा मुलगा रडतरडत घरी आला. त्यानंतर पित्याने काय झाले असे मुलाला विचारले असता त्याने आपबिती सांगितली. त्यानंतर या मुलाच्या वडिलाने लाखांदूर पोलीस ठाण्यात तक्रार नोंदविली. तक्रारीवरुन आरोपीविरुध्द भादंवि ३७७ व लैंगिक अत्याचारापासून बालकाचे संरक्षण अधिनियम, अनुसूचित जाती जमाती प्रतिबंधक कायद्यान्वये गुन्हा दाखल केला. या गुन्ह्याचा तपास उपविभागीय पोलीस अधिकारी विक्रम साळी यांनी करून आरोपी चक्रधर बगमारे याला अटक केली. तपासात आरोपीविरुध्द पुरावे गोळा करून विशेष सत्र न्यायालयात आरोपपत्र दाखल केले. अतिरिक्त सत्र न्यायाधीश सचिन भन्साली यांच्या न्यायालयात या प्रकरणाचे साक्ष पुरावे तपासले असता आरोपीविरुध्द दोष सिध्द झाले. त्यावरून न्यायाधिशांनी भादंवि ३७७ कलमान्वये दहा वर्षे सश्रम कारावास व एक हजार रूपये दंड, दंड न भरल्यास सहा महिने कारावास, लैंगिक अत्याचारापासून बालकाचे संरक्षण अधिनियमान्वये सात वर्षे सश्रम कारावास, एक हजार रूपये दंड, दंड न भरल्यास सहा महिने कारावास अशी शिक्षा सुनावली. याप्रकरणात सरकार पक्षातर्फे अ‍ॅड.रमाकांत खत्री यांनी युक्तीवाद केला. या गुन्ह्यात पोलीस निरीक्षक बंडोपंत बन्सोडे व भलावी यांनी पैरवी अधिकारी म्हणून काम पाहिले. 

टॅग्स :Crimeगुन्हा