शहरं
Join us  
Trending Stories
1
संसदेच्या पावसाळी अधिवेशनासाठी सरकारचा भरगच्च आर्थिक अजेंडा
2
"साहेब, तुम्ही जे म्हणता तेच..."; राज ठाकरेंचा व्हिडीओ केला पोस्ट, मनसेचा नेता काय म्हणाला?
3
उत्तर महाराष्ट्रात भाजपाची ताकद वाढणार; पुढील ४८ तासांत २ माजी आमदारांचा पक्षप्रवेश होणार
4
भारताने पाकिस्तानला नकाशावरून हटवले असते; इंडोनेशियात खुलासा, अणुयुद्ध झाले असते तर काय घडलं असते?
5
हिंदीचे दोन्ही जीआर रद्द, त्रिभाषा सूत्राचा निर्णय घेण्यासाठी नवी समिती स्थापन
6
‘कोलकाता सामूहिक बलात्कार प्रकरण माध्यमांतूनच कळाले’
7
पाकिस्तानमध्ये तुफान चालतोय 'सरदार जी ३', दिलजीतची सोशल मीडियावर माहिती; होतेय टीका
8
Today's Horoscope: आर्थिक बाबतीत मात्र सावध राहावे लागेल, काय सांगतेय तुमची राशी? 
9
गुंतवणुकीसाठी सुवर्णसंधी ! बाजारात ७ आयपीओ होणार खुले; योग्य कंपनी निवडल्यास होऊ शकतो फायदा
10
भाजपच्या नव्या अध्यक्षांची निवड लवकरच; प्रधान आघाडीवर, पावसाळी अधिवेशनापूर्वी प्रक्रिया होऊ शकते पूर्ण
11
राज्य सरकारला घेरण्याची विरोधी पक्षांची रणनीती; मविआचा सरकारच्या चहा पानावर बहिष्कार, जनतेला वाऱ्यावर सोडले
12
प्रशासकीय सीमा ३१ डिसेंबरला होणार ‘फ्रीझ’, जनगणना : नंतर होणार नाही नवे गाव, जिल्हा, महापालिका
13
विकले जात राहणे हेच पाकिस्तानचे नशीब
14
अधिवेशनाकडून अपेक्षा; विरोधक हिंदीच्या मुद्द्यावरून अधिवेशनापूर्वीच एकवटले
15
कार्ला येथील एकवीरा मंदिरात ड्रेसकोड; ७ जुलैपासून नव्या नियमांची अंमलबजावणी
16
लुटालुटीला आरटीओची मूक संमती? अधिकृत रिक्षा स्टॅंडवर दरपत्रकच नाही; कल्याण आरटीओ क्षेत्रातील वास्तव
17
हिंदी भाषेसंदर्भातील दोन्ही शासन निर्णय रद्द; राज-उद्धव यांच्या मोर्चाआधीच CM फडणवीसांची मोठी घोषणा
18
एअर इंडियाच्या विमानात समस्या, टोकियोहून दिल्लीला जाणाऱ्या विमानाचे कोलकात्यात इमरजन्सी लँडिंग
19
रेल्वे प्रवाशांसाठी आनंदाची बातमी! आता रिझर्वेशन चार्ट तयार होणार रेल्वे सुटण्याच्या 8 तास आधी; हे नियमही बदलणार
20
"...म्हणून सरकारने हिंदीचा GR रद्द केला"; उद्धव ठाकरेंचा राज्य सरकारवर हल्लाबोल, स्पष्टच बोलले

एकात्मिक पाणलोटमधून होणार १० कोटींची कामे

By admin | Updated: May 4, 2015 00:48 IST

करडी, मुंढरी परिसरात एकात्मिक पाणलोट विकास कार्यक्रम सन २०१४-१५ पासून लागू करण्यात आला आहे.

२७ गावांचा समावेश : पाच वर्षात होणार कामे करडी (पालोरा) : करडी, मुंढरी परिसरात एकात्मिक पाणलोट विकास कार्यक्रम सन २०१४-१५ पासून लागू करण्यात आला आहे. यात २७ गावांचा समोवश असून १७ गावातील कामे कृषी विभागामार्फत तर १० गावातील कामांचे नियोजन व अंमलबजावणी स्वयंसेवी संस्था करणार आहे. जवळपास १० कोटी ४१ लाखांची विकास कामे ५ वर्षात पूर्ण केली जाणार आहेत.एकात्मिक पाणलोट विकास कार्यक्रमांतर्गत करडी, मुंढरी परिसरातील २७ गावांसाठी विकास कामे केली जाणार आहेत. त्यासाठी पाणलोट गटक्रमांक १६ मध्ये करडी, मोहगाव, जांभळापाणी, दवडीपार, उसरीपार, मुंढरी बु, मुंढरी खुर्द, निलज खुर्द, निलज बुज, देव्हाडा खुर्द, देव्हाडा बुज, नरसिंगटोला, नवेगाव, किसनपूर, कान्हळगाव, पांजरा व बोरी गावांचा समावेश आहे. सदर १७ गावातील कामांची जबाबदारी कृषी विभागाकडे सोपविण्यात आली आहे. पाणलोट गट क्रमांक १७ मध्ये पालोरा, खडकी, बोंडे, डोंगरदेव, ढिवरवाडा, केसलवाडा, जांभोरा, लेंडेझरी, बोरगाव, यलकाझरी आदी १० गावांचा समावेश आहे. प्रथम टप्प्यातील प्रस्ताव तयार करण्याची कामे अंतिम टप्प्यात असून कृषी विभागामार्फत १७ गावांसाठी ५ कोटी १७ लाखांची कामे नियोजित आहेत. संस्थेमार्फत १० गावांसाठी ५ कोटी २४ लाखांची कामे प्रस्तावित करण्यात येणार आहेत. योजनेअंतर्गत प्रती हेक्टर १२ हजार रुपये या प्रमाणात कामांना निधी दिला जाणार आहे. यामध्ये वनविभागाच्या जागेतील कामांचा समावेश आहे.प्रत्येक गावात पाणलोट विकास समितीपरिसरातील २७ गावांसाठी स्वयंत्र पाणलोट विकास समिती स्थापन केली जाणार आहे. ग्रामपंचायतींकडे सूचना व सनियंत्रणाची कामे सोपविण्यात आलेली आहेत. ग्रामपंचायतींना ग्रामसभेतून समितीची निवड करायची आहे. यात वेगवेगळ्या प्रवर्ग व गटातील १४ कामांची निवड करायची आहे. या कार्यक्रमात नियोजित कामांच्या एकूण निधीपैकी ५६ टक्के निधी मृद व जलसंधारणाच्या कामावर खर्च करावयाचा आहे तर ४४ टक्के निधी गावातील इतर विकास कामांवर खर्च करण्याचे सूचित करण्यात आले आहे. खर्च करावयाच्या कामांच्या निधीची टक्केवारी पूर्व निर्धारित आहे.कामांचे नियोजन, नियंत्रण देखरेख व मुल्यमापन आदी व अन्य कामांसाठी ४ तज्ज्ञांची निवड निकषानुसार केली जाईल. संपूर्ण सर्व्हेक्षण आराखडे तयार करून अहवाल मंजूरीसाठी पुणे येथे पाठविण्याची कामेही सोपविण्यात आलेली आहेत.