शहरं
Join us  
Trending Stories
1
“अशोक खरात विकृत, जलदगती न्यायालयात प्रकरण चालवून फाशी द्या”; सुनील तटकरेंनी केली मोठी मागणी
2
इराणपेक्षा हा अरब देशच जास्त होरपळतोय; वीज, पाणी अन् ऑईल डेपो, सरकारी इमारतीही नेस्तनाभूत...
3
देशात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा; कोणकोणत्या राज्यांना हवामान खात्याने दिला अलर्ट?
4
पत्नीने पतीसोबत राहण्यास दिला नकार, उच्च न्यायालयाने प्रियकरासोबत राहण्याची दिली परवानगी
5
इराण युद्धाचा परिणाम! 'मूडीज'ने भारताचा विकास दर अंदाज घटवला; महागाई आणि व्याजदर वाढण्याचा धोका
6
इराणचा मोठा दावा! पायलटला शोधायला आलेले अमेरिकेचे C-130 विमान पाडले 
7
Middle East War: मध्य पूर्वेतील युद्ध भडकणार? अमेरिकेचं सर्वात घातक मिसाइल युद्धाच्या रणांगणात, इराणवर महासंकट!
8
मतदार यादीच्या कामाचा ‘शिक्षण-आरोग्य’वर ताण; ‘आरोग्य’चे ३ हजार, 'शिक्षण'च्या २ हजार कर्मचाऱ्यांचा समावेश
9
"या वेड्याला कसंही करून रोखा...!"; नोबेल विजेत्या माजी आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा एजन्सी प्रमुखांचंं खाडी देश अन् UN ला आवाहन
10
थारच्या वाळवंटातून कच्च तेल उत्पादनात विक्रमी वाढ; भारताचे आयातीवरील अवलंबित्व कमी होणार?
11
AI च्या नावाखाली layoff सुरू! Oracle, Amazon, Meta...२०२६ मध्ये हजारो कर्मचाऱ्यांना नारळ
12
मुंबई हादरवण्याचा कट उधळला, २५ सेकंदाच्या व्हिडिओनं पोलखोल; पाकिस्तानी नेटवर्कचा खेळ बिघडला
13
Ashok Kharat Case : भोंदूबाबाचा १ कोटींचा 'महाप्रताप'! अशोक खरातवर १२ वा गुन्हा दाखल; व्यावसायिकाची मोठी फसवणूक
14
शरद पवार-उद्धव ठाकरेंमध्ये चर्चा; बारामती-राहुरी पोटनिवडणुकीबाबत ठरवले? नेमके काय घडतेय?
15
ते जहाज पुन्हा भारताकडे वळले...! चीनकडे का जात होते? 'पिंग शुन'चे गुपित 
16
क्रिकेट सोडून सरकारी नोकरी करायला गेला; चप्पल घालून टाकलेल्या एका चेंडूने 'त्याचे' आयुष्यच बदललं
17
Dhruv Jurel: मास्टरमाइंड जुरेल! आधी दमदार बॅटिंग, मग डोकं लढवून जिंकला सामना, ठरला विजयाचा शिल्पकार
18
अंधश्रद्धेच्या नावाखाली मुलीचा बळी देण्याचा प्रयत्न; स्थानिकांनी वाचवला जीव, आरोपीला बेदम चोप...
19
टाटा ट्रस्टमधील वादाला नवे वळण! TVS च्या वेणू श्रीनिवासन यांचा तडकाफडकी राजीनामा; मेहली मिस्त्रींच्या एका आव्हानाने खळबळ
20
२००० किमी दूर कोलकात्यावर हल्ल्याची धमकी; पाकिस्तानच्या हाती 'अशी' कोणती मिसाइल लागली?
Daily Top 2Weekly Top 5

दररोज १० ते १५ जणांच्या नशिबी शिवभोजन थाळी नाही!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 26, 2021 04:32 IST

भंडारा : कोरोनाच्या कठीण काळात कुणीही उपाशीपोटी राहू नये यासाठी राज्य शासनाने शिवभोजन थाळी सुरू केली. यासाठी मोठ्या ...

भंडारा : कोरोनाच्या कठीण काळात कुणीही उपाशीपोटी राहू नये यासाठी राज्य शासनाने शिवभोजन थाळी सुरू केली. यासाठी मोठ्या प्रमाणात शिवभोजन केंद्रे सुरू करण्यात आली. या केंद्रचालकांना शासनाकडून प्रती थाळी अनुदान ठरवून देण्यात आले आहे.

जिल्ह्यात ३८ केंद्रांच्या माध्यमातून गरजूंसाठी भोजनाची व्यवस्था करण्यात आली. या शिवभोजन केंद्रांच्या माध्यमातून २६ जानेवारी २०२० पासून आतापर्यंत ५ लाख नागरिकांना भोजन देण्यात आले. गरजूंचे पोट भरण्यासाठी शिवभोजन थाळी केंद्रे सुरू करण्यात आली आहेत. परंतु, या शिवभोजन थाळीला मागणी अधिक आणि पुरवठा कमी असल्याने अनेक केंद्रांवरून दररोज १५ ते २० लोक उपाशी परत जात आहेत. राज्य शासनाच्या या उपक्रमाचा गरजूंना खरेच मोठा आधार झाला व त्यांच्या दोन वेळच्या जेवणाचा प्रश्न सुटला होता. आताही शिवभोजन थाळीच्या माध्यमातून गरजूंना जेवणाची सोय सुरूच आहे. मात्र, ग्रामीण भागात दररोज ७५ थाळी एका केंद्राला एका दिवसात वाटप करण्याच्या सूचना आहेत. परंतु उपाशी राहणारे लोक थाळीभोजन करण्यासाठी आले तरी दररोज काही लोक भोजनाशिवाय खाली परत जात आहेत.

शासनाने सुरू केलेल्या शिवभोजन थाळीत दोन चपात्या, एक भाजी, भात, आमटी असे पोटभर जेवण दिले जाते. सर्वसामान्यांना जरी मोफत अथवा पाच ते दहा रुपये मोजावे लागत असले तरी शासन केंद्र चालकांना ग्रामीण भागात ३५ रुपये तर शहरी भागात ४५ रुपयांचे अनुदान देत आहे. त्यामुळे सर्वसामान्यांना उत्तम प्रतीचे जेवण मिळत असल्याने ही योजना सामान्यांना दिलासा देणारी ठरली आहे. ग्रामीण भागातून विविध कामांसाठी लवकर आलेल्या नागरिकांना शिवभोजन थाळीमुळे कमी पैशात चांगले जेवण मिळत आहे. जिल्ह्यात सुरुवातीला १३ शिवभोजन केंद्रे होती. मात्र, आता नागरिकांचा वाढत असलेला प्रतिसाद पाहून राज्य शासनाने या केंद्रांची संख्या वाढविल्याने आता जिल्ह्यात एकूण ३८ केंद्रांमार्फत शिवभोजन थाळी दिली जात आहे. जिल्हास्तरावरून अनुदान प्राप्त होताच केंद्र चालकांना अनुदान वितरित करण्यासाठी पाठपुरावा होतो.

दररोजच्या थाळीसाठी अधिक लोक

त्रिमूर्ती चौक भंडारा : शहरातील त्रिमूर्ती चौकात शिवभोजन थाळीकरिता १५ ते २० लोक अधिक येतात. परंतु थाळींची संख्या एवढे वाटप झाल्यानंतर पुन्हा वाढविण्यासाठी जेवण तयार नसते.

जिल्हा परिषद भंडारा : शासनाने दिलेल्या संख्येनुसारच जेवण तयार होत असल्याने अधिकच्या लोकांना जेवण देता येत नाही. एक-दोघे असल्यावर त्यांना जेवण समाज भावनेतून दिले जाते. परंतु जास्त लोक आले तर त्यांना जेवण देण्यासाठी तयार नसते.

जिल्ह्यात ३८ शिवभोजन थाळी केंद्रे आहेत. यातून जिल्ह्यातील २०७० नागरिकांना दररोज जेवणाची सोय होते.

शिवभोजन थाळीची मागणी करणारे हात अधिक आहेत. मात्र, केंद्र संचालकांना ७५ थाळींचीच परवानगी दिली आहे.