शहरं
Join us  
Trending Stories
1
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
2
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
3
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
4
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; या खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
5
Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
6
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
7
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
8
Mumbai: वांद्र्यात जलवाहिनी फुटल्यानं रस्ते जलमय; वाहतूक विस्कळीत, नागरिकांचेही हाल!
9
RR vs RCB : 'छोटा पॅक बडा धमाका' की, स्विंगचा किंग पुन्हा ठरणार भारी! वैभव पलटवार करणार?
10
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये झालेले सीझफायर भविष्यासाठी किती फायद्याचे...
11
रात्री WiFi चालू ठेवून झोपल्याने खरंच कॅन्सर होतो? रिसर्चमधून मोठा खुलासा
12
४ वर्षांनंतर Bajaj Pulsur 180 बाजारात दाखल; मस्क्युलर लूक आणि तगड्या फीचर्ससह कमबॅक!
13
मला बी नोबेल मिळू द्या की...! पाकिस्तानात शांततेच्या नोबेलचा तिसरा दावेदारही तयार; पक्षाने प्रस्तावच ठेवला
14
"आज ऑफिसला येऊ शकणार नाही", म्हणताच त्याला नोकरीवरूनच काढले; गुरुग्राममधील प्रकरण काय?
15
घालमेल...! पाकिस्तानची JF-17, F-16 लढाऊ विमाने सौदी, इराणच्या दिशेने उडाली; 'ऑपरेशन आयर्न एस्कॉर्ट' ठेवले नाव
16
Viral Video: बाईकवरून जात होती तरुणी, पाठीमागून आले अन् नको तिथं...; तरुणांचं घाणेरडं कृत्य कॅमेऱ्यात कैद
17
भाजपचा मास्टरस्ट्रोक! बंगालमध्ये ममतांच्या 'लक्ष्मी भंडार'ला तगडा ठोसा; सत्तेत आल्यास महिला अन् बेरेजगारांना लॉटरी लागणार!
18
Latest Marathi News LIVE Updates: ओवेसींचा मोठा निर्णय! हुमायू कबीरच्या पक्षासोबतची आघाडी तोडली
19
खळबळजनक! ४० जणांच्या ग्रुपसोबत फिरायला गेली अन् गायब झाली; ३ दिवसांनी सापडला मृतदेह
20
Chanakya Niti: गरिबी येण्यापूर्वी घरात दिसतात 'ही' ५ लक्षणे; आचार्य चाणक्यांनी दिलेला इशारा वेळीच ओळखा!
Daily Top 2Weekly Top 5

विवाहेच्छुक मंडळींनो, तुमची स्वप्नं सांगतील तुमचा विवाह योग, जोडीदार आणि वैवाहिक जीवनाची माहिती!

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 19, 2021 11:57 IST

स्वप्नांमध्ये मिळालेले संकेत आपल्याला दिलासा देण्याचे काम नक्की करतील. बाकी आपले चारित्र्य, व्यक्तिमत्त्व आणि स्वभाव यावरच आपला जोडीदार ठरणार आहे, हे लक्षात ठेवा. 

कोव्हीडकाळात कोणी लग्नें उरकून घेतली, तर कोणाची लांबणीवर गेली. काही विवाहेच्छुक मंडळींची तर विवाहाची बोलणीदेखील पुढे सरकली. अशात घरच्यांसमोर आपल्याच लग्नाचा प्रस्ताव मांडला, तर म्हणतील 'गुडघ्याला बाशिंग लावून बसला आहे.' ज्योतिषाला विचारायला जावे, तर चार जणांची चार उत्तरे. मनाची घालमेल शांत करावी तरी कशी? यावर स्वप्न ज्योतिष काय सांगते पहा. 

>> स्वप्नात इंद्रधनुष्य दिसणे शुभ मानले जाते. वैवाहिक आयुष्य सुखाचे जाणार यासंबंधी ते संकेत आहेत. तसेच मोरपीस दिसणेदेखील शुभ असते. तुमच्या मोरपंखी आयुष्याची लवकरच सुरुवात होणार आहे, याची सूचना मिळते. 

>> स्वप्नात आनंदाने स्वतःलाच नाचताना पाहणे, हे लवकरच लग्न ठरणार असल्याचे संकेत आहेत. असे स्वप्न सुखी दाम्पत्य जीवनाचे प्रतीकही मानले जाते. 

>> वस्त्र किंवा सोने खरेदी करत असल्याचे स्वप्न पडले असता, श्रीमंत जोडीदार मिळण्याची दाट शक्यता असते. 

>> स्वप्नात तुम्ही एखाद्या यात्रेत किंवा गर्दीमध्ये हरवून जात असाल, तर घाबरू नका तुमचा शोध घेणारा जोडीदार लवकरच तुमचा हात धरणार आहे. 

>> विवाहेच्छुक मंडळींनी स्वप्नात कोणाची प्रेत यात्रा किंवा शव पाहिले, तर त्यांचे वैवाहिक जीवन कलह पूर्ण असू शकते. 

>> स्वप्नात कोणाशी टोकाची भांडणे होत असतील आणि अशी स्वप्नं वारंवार दिसत असतील, तर अशा लोकांचे वैवाहिक जीवन धोक्यात असते. 

>> स्वप्नात तुम्ही स्वतःला कामात गढून गेलेले पहात असाल, तर तुमचे वैवाहिक जीवन खडतर परंतु सुखमय व्यतीत होते. 

>> स्वप्नात तुमचा बघण्याचा कार्यक्रम दिसत असेल पण बघायला आलेली व्यक्तीच आठवत नसेल, तर काळजी करू नका, तुम्हाला मनपसंत जोडीदारच मिळणार आहे. 

आता वरील सर्व शक्यता वाचून तुम्हाला कोणती स्वप्नं पडतात याचा विचार करा पण त्यात अडकून राहू नका. लग्नाच्या गाठी ब्रह्म देवाने स्वर्गात बांधलेल्या आहेत. त्या कधी, कशा, कुठे बांधल्या जातील हे त्यालाच माहीती! स्वप्नांमध्ये मिळालेले संकेत आपल्याला दिलासा देण्याचे काम नक्की करतील. बाकी आपले चारित्र्य, व्यक्तिमत्त्व आणि स्वभाव यावरच आपला जोडीदार ठरणार आहे, हे लक्षात ठेवा. 

टॅग्स :marriageलग्न