शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
3
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
4
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
5
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
6
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
7
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
8
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
9
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
10
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
11
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
12
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
13
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
14
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
15
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
16
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
17
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
18
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
19
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
20
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
Daily Top 2Weekly Top 5

अशी आलिशान गाडी तुमच्याकडेही असेल, फक्त संधीचे सोने करता आले पाहिजे; जसे या मुलाने केले!

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 26, 2021 17:39 IST

आपणही अनेकदा चुका करतो. अभ्यास करतो पण परीक्षेला घाबरतो आणि परीक्षा दिली तरी निकाल बघायला घाबरतो. म्हणून प्रयत्नात कुचराई नको आणि संधी दवडणेही नको.

संधी मिळत नाही म्हणून माणूस रडत असतो, पण संधी ओळखता येत नाही, हे तो मान्य करत नाही. ती ओळखण्याची वेगळी अशी दृष्टी वगैरे नसते, तर प्रत्येक क्षणाचा बारकाईने विचार व मेहनतीची जोड देऊन काम केले तर आपोआप प्रत्येक क्षणाचे संधीत रूपांतर होते व संधीचे सोने करता येते. आता ही पेट्रोलपंपावर काम करणाऱ्या कर्मचाऱ्याचीच कथा पहा ना...

पेट्रोलपंपावर काम करणारा एक मुलगा तिथे येणाऱ्या महागड्या गाड्या रोज निरखून पाहत असे. आज ना उद्या आपल्याकडेही अशी गाडी असेल असे स्वप्नरंजन करत असे. 

एक दिवस तिथे खूप महागडी गाडी आली. ती पाहून त्याचे डोळे दिपून गेले. त्याने गाडीत पेट्रोल भरले व न राहवून भीत भीत त्या गाडीमालकाला विचारले, 'या गाडीची किंमत किती आहे साहेब?'गाडीमालक म्हणाला, `ऐंशी लाख रुपए! का बरं?''साहेब, तुम्ही ही गाडी कशी विकत घेतलीत?' मुलाने निरागसपणे पुढचा प्रश्न विचारला.गाडीमालक हसत म्हणाला, `कशी म्हणजे? कष्टाने विकत घेतली. मी सुद्धा एक साधारण माणूस होतो. पण जिद्दीने, मेहनतीने व्यवसाय वाढवत श्रीमंत झालो आणि ही गाडी विकत घेतली. तुलाही भविष्यात अशी गाडी घ्यायची असेल तर मला या नंबरवर फोन कर आणि एक दिवस भेटायला ये!'

असे म्हणत गाडीमालक भरधाव वेगाने निघून गेला. हातात व्हिजिटिंग कार्ड घेऊन तो मुलगा विचार करू लागला. पण त्याच्या मनात अनेक शंकांनी घर केले. त्याला वाटले, आपल्याला वाम मार्गाला लावले तर? हातून चुकीचे काम करून घेतले तर? मनाविरुद्ध वागावे लागले तर? नकोच हा विचार. असे म्हणत मुलाने ते कार्ड कचऱ्याच्या डब्यात टाकून दिले. 

दुसऱ्या दिवसापासून तो पुन्हा आपले काम करत तेच जुने स्वप्न उराशी बाळगू लागला. करता पाहता पाच वर्षे निघून गेली. एक दिवस त्याच्या पेट्रोलपंपावर पुन्हा एक महागडी गाडी आली. तो ती गाडी निरखू लागला. परंतु यंदा गाडीमालकाचा चेहरा त्याला ओळखीचा वाटला. त्याने नीट निरखून पाहिले आणि ओळख काढण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी गाडीमालक म्हणाला, `मला ओळखले नाहीस? पाच वर्षांपूर्वी मी सुद्धा या पेट्रोलपंपावर सफाई कामगार म्हणून काम करत होतो. मी सुद्धा तुझ्यासारखे गाडीचे स्वप्न पाहत होतो. एक दिवस तुला त्या साहेबांशी बोलताना आणि नंतर ते कार्ड पेâकताना पाहिले. ते कार्ड नंतर मी उचलले आणि एक प्रयत्न करून पाहू असे म्हणत मी त्यांना भेटलो. छोट्या कामापासून सुरुवात झाली, खूप मेहनत घेतली आणि दोन महिन्यांपूर्वी ही गाडी विकत घेतली. त्या दिवशी तू सुद्धा जर ती संधी ओळखून किमान प्रयत्न केला असतास, तर आज तू सुद्धा अशाच आलिशान गाडीचा मालक असतास...!'

आपणही अशीच चूक अनेकदा करतो. अभ्यास करतो पण परीक्षेला घाबरतो आणि परीक्षा दिली तरी निकाल बघायला घाबरतो. म्हणून प्रयत्नात कुचराई नको आणि संधी दवडणेही नको. तरच तर संधीचे सोने नक्की होईल.