शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताच्या कारवाईमुळे बांगलादेश खवळला, भारतीयांसाठी व्हिसा सर्व्हिस केली बंद 
2
‘बांगलादेशी आहेस का?’, केरळमध्ये परप्रांतीय तरुणाला बेदम मारहाण, रुग्णालयात मृत्यू 
3
वैभव सूर्यवंशी आणि आयुष म्हात्रेनं जशास तसे उत्तर दिलं; पण सरफराज अहमदला ते नाही दिसलं! म्हणे...
4
रशियाला युद्धादरम्यान मोठा धक्का ! सैन्याचे लेफ्टनंट जनरल सर्वारोव्हचा कार स्फोटात मृत्यू
5
सौदी अरेबियातील वाळवंटात पसरली बर्फाची चादर, अनेक वर्षांनंतर दिसलं असं चित्र, आपली पृथ्वी देतेय असे संकेत
6
बाथरूममध्ये तरुणाने प्रस्थापित केले संबंध, अतिरक्तस्त्रावाने गर्लफ्रेंडचा मृत्यू, वडिलांचे गंभीर आरोप
7
युजवेंद्र चहलने विकत घेतली आलिशान BMW Z4 कार; भारतात त्याची किंमत ऐकून धक्काच बसेल!
8
नवीन वर्षाच्या सुरूवातीला कमी हाेणार थंडीचा जोर; हवामान तज्ज्ञांनी व्यक्त केला अंदाज
9
Vijay Hazare Trophy स्पर्धेत दिसणार रोहित-विराटचा जलवा! ही जोडी कधी अन् कोणत्या मैदानात खेळणार सामना?
10
बांगलादेशातील हिंदू तरुणाच्या हत्येप्रकरणी मोठा खुलासा; ईशनिंदेचा आरोप खोटा, 'हे' होते कारण
11
महाराष्ट्रापाठोपाठ गोव्यातील निवडणुकीतही भाजपाची मुसंडी, काँग्रेसची पीछेहाट, आपचा धुव्वा
12
AI शक्तिशाली सहाय्यक, मात्र मानवी मेंदूला पर्याय नाही; सर्व तज्ज्ञांचे एकमताने शिक्कामोर्तब
13
भारतीय ऑलराउंडरची क्रिकेटच्या सर्व प्रकारातून निवृत्ती! IPL लिलावात CSK नं लावली होती विक्रमी बोली
14
"पालिका निवडणुकांमध्येही देवेंद्र फडणवीसच ‘धुरंधर’; उद्धव ठाकरे 'रेहमान डकैत"; भाजपाची टीका
15
IPL 2026: Axar Patel ला धक्का! कर्णधारपदावरून हटवलं, आता 'हा' Delhi Capitals चा 'कॅप्टन'
16
Video: उकळत्या तेलात हात घालून काढते गरमागरम पकोडे... 'समोसा गर्ल' ची रंगलीये तुफान चर्चा
17
झाडू मारण्यासाठी सॉफ्टवेअर इंजिनिअरने सोडली हाय-फाय नोकरी; आता महिन्याला १.१ लाख पगार
18
हाण की बडीव! रुग्णालयात डॉक्टर-रुग्ण भिडले, एकमेकांच्या जीवावर उठले; लाथाबुक्क्यांनी मारहाण
19
VIDEO: तुर्की संसदेत जोरदार राडा ! आधी खासदारांमध्ये बाचाबाची अन् लाथाबुक्क्यांनी हाणामारी
20
नगरपरिषद निवडणुकीतील यश भाजपाचंच की 'इनकमिंग'चं?; सुप्रिया सुळेंनी मांडला 'हिशेब'
Daily Top 2Weekly Top 5

२०२५चा पहिला गुरुवार: वर्षभर गुरुबळ हवे? संकल्पाने ‘हा’ एक मंत्र म्हणा, स्वामी कृपा मिळवा

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 1, 2025 09:42 IST

Shree Swami Samarth Maharaj Tarak Mantra In Marathi: स्वामी सेवेसाठी आवर्जून वेळ काढावा. स्वामींवर पूर्ण विश्वास तसेच श्रद्धा ठेवून गुरुबळाचा स्वानुभव घ्यावा, असे सांगितले जाते.

Shree Swami Samarth Maharaj Tarak Mantra In Marathi: ०२ जानेवारी २०२५ रोजी नववर्षातील पहिला गुरुवार आहे. गुरुवार या दिवसावर नवग्रहांचा गुरु बृहस्पती म्हणजेच गुरु ग्रहाचा प्रभाव असतो, असे मानले जाते. तसेच गुरुवारी विशेष करून दत्तगुरु, दत्तावतार आणि दत्त संप्रदायातील दिव्य सत्पुरुषांचे मनोभावे स्मरण केले जाते. दत्तगुरुंचा अवतार असलेले स्वामी समर्थ महाराज यांची विशेष सेवा केली जाते. नववर्षाची सुरुवात संकल्पाने करून तो संकल्प वर्षभर कायम ठेवला, तर त्याची प्रचिती येऊ शकते, असे म्हटले जाते. 

प्रत्येक गुरुवारी स्वामींची नित्य सेवा करणारे लाखो भाविक आहेत. परंतु, स्वामी सेवा करण्याची इच्छा आहे, परंतु, काही ना काही कारणास्तव प्रारंभ राहून जात आहे, अशांनी नवीन वर्षाच्या सुरुवातीला स्वामी सेवेचा संकल्प करावा आणि त्याची प्रामाणिक अंमलबजावणी करण्याचा प्रयत्न करावा. एखाद्या वेळेस काही अपरिहार्य कारणांमुळे संकल्पात खंड पडला तरी खंत वाटून घेऊन नये. स्वामींना मनापासून साद घाला, क्षमायाचना करा आणि पुढे संकल्प सुरू ठेवा. धकाधकीच्या अतिशय व्यस्त जीवनात एक मंत्र म्हणूनही स्वामी सेवा केली जाऊ शकते, असे सांगितले जाते. एक म्हणजे ‘श्री स्वामी समर्थ’ या मंत्राचा आवर्जून किमान १०८ वेळा तर किमान यथाशक्ती जप करावा. दुसरे म्हणजे सर्वांत प्रभावी मानल्या गेलेल्या श्री स्वामी समर्थ तारक मंत्राचे दिवसातून एकदा तरी पठण करावे. दररोज शक्य नसेल, तर दर गुरुवारी वेळात वेळ काढून तारक मंत्र अवश्य म्हणावा. 

अशक्यही शक्य करतील स्वामी

'तारक मंत्र' या दोन शब्दातच त्याचा अर्थ आहे. जो आजाराने त्रासलेला आहे, जो चिंतेने ग्रासलेला आहे, त्यांना तारण्यासाठी नेहमी स्वामी काही तरी उपाय करतात, अशी मान्यता आहे. तारक मंत्रात इतकी प्रचंड शक्ती आहे की मी, तुम्ही आणि आपण कोणीच त्याचा विचारही करू शकत नाही, असे म्हटले जाते. शेवटही स्वामींची शक्ती अगम्य आहे. हा मंत्र म्हणायला सुरवात केल्यावर मानसिक बळ येते, याची अनुभूती अनेकांनी घेतलेली असल्याचे सांगितले जाते. हा मंत्र हळूहळू म्हटला तर खूपच बळ, शक्ती संचारते, असा स्वामी भक्तांचा अनुभव आहे. "अतर्क्य अवधूत हे स्मर्तूगामी, अशक्यही शक्य करतील स्वामी", फक्त या स्वामींच्या वाचनावर आणि स्वामींवर विश्वास ठेवा. स्वामी सदैव आपल्या पाठीशी असतात. पण आपणच त्यांना ओळखू शकत नाही. कुठल्या ना कुठल्या मार्गाने स्वामी आपल्याबरोबर नेहमी असतात. फक्त आपण हे लक्षात ठेवले पाहिजे की, स्वामी सदैव माझ्याबरोबर आहेत, असे सांगितले जाते. अनेक स्वामी भक्तांनी याबाबतचे अनुभव कथन करून ठेवले आहेत. आपणही संकल्पाने सुरुवात करा आणि स्वानुभव घ्या.

स्वामींचा एक प्रभावी तारक मंत्र

नि:शंक हो, निर्भय हो, मना रेप्रचंड स्वामीबळ पाठीशी रेअतर्क्य अवधूत हे स्मर्तूगामीअशक्यही शक्य करतील स्वामी ।।१।।

जिथे स्वामी पाय तिथे न्युन कायस्वये भक्त प्रारब्ध घडवी ही मायआज्ञेविणा काळ ना नेई त्यालापरलोकही ना भीती तयाला ।।२।।

उगाची भितोसी भय पळू देजवळी उभी स्वामी शक्ती कळू देजगी जन्ममृत्यु असे खेळ ज्यांचानको घाबरू तू असे बाळ त्यांचा ।।३।।

खरा होई जागा तू श्रद्धेसहितकसा होशी त्याविण तू स्वामीभक्तकितीदा दिला बोल त्यांनीच हातनको डगमगू स्वामी देतील साथ ।।४।।

विभूती नमन नाम ध्यानादी तीर्थस्वमीच या पंच प्राणाभृतातहे तीर्थ घे, आठवी रे प्रचितीन सोडेल स्वामी ज्या घेई हाती ।।५।।

|| श्री स्वामी समर्थ ||

|| श्री गुरुदेव दत्त ||

|| अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त ||

 

टॅग्स :shree swami samarthश्री स्वामी समर्थspiritualअध्यात्मिकshree datta guruदत्तगुरु