शहरं
Join us  
Trending Stories
1
"...त्यामुळे मी भारतावरील टॅरिफ भरपूर वाढवणार आहे"; अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचा पुन्हा इशारा
2
१२,००० सॅमसंग स्मार्टफोनने भरलेला ट्रक चोरीला गेला; चोरट्यांनी ९१ कोटींच्या वस्तू लंपास केल्या
3
एक मालिका अन् दोन मालिकावीर! गंभीरमुळं गिलसोबत हॅरी ब्रूकला मिळाला मालिकावीरचा पुरस्कार
4
अमित शाह मोडणार देशाच्या गृहमंत्र्यांचा रेकॉर्ड! जम्मू काश्मीरबद्दल सरकार घेणार आणखी एक मोठा निर्णय?
5
मारहाण, शिवीगाळ असं काहीच घडलं नाही; पुणे पोलिसांनी मुलींचे सगळेच आरोप फेटाळले
6
'भारत आगीशी खेळत आहे'; डोनाल्ड ट्रम्प, एस. जयशंकर यांच्याबद्दल खोटी विधाने केली पोस्ट, 'एक्स'ने खातीच केली बंद
7
iPhone 16: पहिल्यांदाच आयफोन १६ च्या खरेदीवर एवढी मोठी सूट!
8
भारत रशियाला युक्रेनविरुद्ध युद्धासाठी अप्रत्यक्षपणे निधी पुरवतोय, अमेरिकेचा आरोप!
9
येमेनमध्ये निमिषा प्रियाच्या अडचणी वाढल्या! मृताच्या भावाने पत्र लिहून केली मोठी मागणी
10
Siraj, IND vs ENG: 'तो' एक शब्द अन् सिराजने फिरवला अख्खा सामना... टीम इंडियाच्या विजयानंतर उघड केलं गुपित
11
आपच्या सत्येंद्र जैन यांना दिलासा, CBIच्या क्लोजर रिपोर्टवर कोर्टाचं शिक्कामोर्तब
12
माझा 'तो' व्हिडीओ रोहित पवारांना कुणी पाठवला? मंत्री मेघना बोर्डीकर म्हणाल्या...
13
राज ठाकरेंच्या 'मराठी'नंतर नितीश कुमारांची 'बिहारी' घोषणा; शिक्षक भरतीत नोकरी बिहारींनाच मिळणार
14
Siraj, IND vs ENG: ‘पूरा खोल दिए पाशा...’; सिराजच्या 'मॅचविनिंग' गोलंदाजीवर ओवेसींची हैदराबादी शैलीत स्तुती
15
कमाल झाली राव! रशियन महिलेने सांगितली भारतीय पुरुषाशी लग्न करण्याची खास कारणं, जिंकलं मन
16
क्रिस वोक्स स्ट्राइकवर आला असता तर...? इंग्लंडच्या लढवय्याबद्दल काय म्हणाला मॅच विनर सिराज?
17
'तिचे ओठ असे हलतात जणू मशीनगनच'; डोनाल्ड ट्रम्प कॅरोलिन लेविट यांच्याबद्दल काय बोलून गेले?
18
Maharashtra Rain: जून महिन्यात धो-धो; जुलैत पावसाला ब्रेक! 
19
प्रत्यक्षात घडली Jolly LLB 2 सारखी घटना, ३० वर्षे साधूच्या वेशात लपून होता बांगलादेशमधील गुन्हेगार, अखेर…
20
१ तास सीबीआयला चकवा दिला, पैशांनी भरलेली बॅग कचराकुंडीत फेकली; नवी मुंबईत फिल्मी स्टाईल 'थरार'

Yogini Ekadashi 2022: आर्थिक, वैवाहिक, सामाजिक आणि राजकीय प्रश्नांतून मार्ग मिळवण्यासाठी रोज 'हे' स्तोत्र म्हणा!

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 24, 2022 11:17 IST

Yogini Ekadashi 2022: स्तोत्रामध्ये प्रचंड सामर्थ्य असते, फक्त ते किती भक्तिभावाने म्हटले जाते यावर त्याचा प्रभाव दिसून येतो!

ज्याप्रमाणे एखाद्या व्यक्तीचे नाव घेताच, त्याचे व्यक्तिमत्त्व डोळ्यासमोर उभे राहते, तसे भगवान महाविष्णुंच्या १००० नामांमधून त्यांचे वैविध्यपूर्ण कार्य डोळ्यासमोर येते. विष्णुंच्या नावाबरोबर त्यांच्या कार्याचीही उजळणी व्हावी, या हेतूने महाभारत कालापासून विष्णुसहस्त्रनाम स्तोत्र मोठ्या भक्तीभावाने म्हटले जात आहे. महाभारताच्या 'अनुशासनपार्वान्तर्गत', 'दानधर्म' पर्वामध्ये १४९ व्या अध्यायात विष्णुसहस्रनाम स्तोत्राचा उल्लेख आढळतो. 

शरपंजरी असताना भीष्माचार्यांना युधिष्ठीराने विचारले, सर्व जगामध्ये एकच देव कोणता आहे? कोणत्या देवाची भक्ती केली असता, मनुष्याचे कल्याण होऊ शकते? सर्व धर्मात श्रेष्ठ धर्म कोणता? आणि कोणत्या दैवताचा जप केला, तर मनुष्य जन्म-मरणाच्या फेऱ्यातून आणि संसार बंधनातून मुक्त होतो?

त्यावर भीष्माचार्य म्हणाले, 'भगवान पुरुषोत्तमाचे सहस्रनाम निरंतर घेतले असता, मनुष्य हरतऱ्हेच्या दु:खावर मात करू शकतो. हे स्तोत्र सर्वांना हितकारी आहे. प्राणीमात्रांची कीर्ती वाढवणारे आहे. मन:शांती देणारे आहे. त्याचे नित्य पारायण करण्याने मनुष्य सर्व क्षेत्रात यशस्वी होतो. भिष्माचार्य हे वर्णन सांगत असताना भगवान श्रीकृष्णदेखील तिथे उपस्थित होते आणि त्यांच्या वक्तव्याला अनुमोदन देत होते.  महाभारत रचैते महर्षी व्यास यांनीदेखील सांगितले आहे, की 'जो विष्णुसहस्रनामाचे पठण किंवा श्रवण करतो, त्याचे काहीच अशुभ होत नाही. त्याला आत्मसुख, लक्ष्मी, धैर्य प्राप्त होऊन त्याचा सर्वत्र विजय होतो. 

विष्णुसहस्रनामाचे फायदे : 

>> आर्थिक, वैवाहिक, सामाजिक, राजकीय प्रश्नांतून मार्ग मिळतो. 

>> गर्भधारणेसंबंधी समस्या दूर होतात. गर्भसंस्काराच्या वेळी स्तोत्र ऐकले असता, बालकावर चांगले संस्कार होतात. 

>> ग्रहदशा कुठलीही असो, विष्णुसहस्रनामाचे पठण केल्यामुळे मन:शांती लाभते, भय कमी होते आणि संकटावर मात करण्याचे बळ मिळते.

>> मुलांचे अभ्यासात मन लागत नसेल, घरात वादविवाद होत असतील, तर विष्णुसहस्रनामाचे सामुहिक पठण करावे. निश्चित लाभ होतो. 

विष्णुसहस्रनामाचे पठण कसे व कधी करावे?

कोणत्याही स्तोत्राचे पठण व स्पष्ट उच्चार अतिशय महत्त्वाचे असतात. तरच, स्तोत्राचा योग्य परिणाम होतो. हे मंत्र उच्चार मोठ्याने म्हटल्यास सकारात्मक ऊर्जा निर्माण होते आणि तना-मनावर सकारात्मक बदल दिसून येतात. 

>> स्तोत्र पाठ नसेल, तर युट्यूबवर विष्णुसहस्रनामाचे अनेक व्हिडिओ उपलब्ध आहेत. रोज सायंकाळी दिवेलागण झाली, की मोठ्या आवाजात हे स्तोत्र लावावे. विशेषत: दक्षिणेकडील प्रख्यात गायिका एम.एस. सुब्बालक्ष्मी यांनी म्हटलेले विष्णुसहस्रनाम मंत्रमुग्ध करते.

>> स्तोत्र केवळ कानावर पडून उपयोग नाही. त्याचे शब्द डोळ्यांसमोर असले, तर लक्ष विचलित होत नाही. म्हणून स्तोत्र श्रवणाबरोबर हातात पोथी घेऊन त्याचे नित्य पठणही करावे. म्हणजे मन एकाग्र होण्यास मदत होते. 

>> अधिक मासात १०८ वेळा हे स्तोत्र म्हणण्याचा संकल्प केल्यास, अधिक लाभ होतो असा भाविकांना अनुभव आला आहे. 

>> सत्यनारायण पूजेत विष्णुसहस्रनाम घेतले जाते. म्हणून अधिक मासात अनेक ठिकाणी सत्यनाराण पूजेचे आयोजन केले जाते.

आपणही योगिनी एकादशीच्या सुमुहूर्तावर या स्तोत्राचे पठण सुरू करूया!