शहरं
Join us  
Trending Stories
1
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
2
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
3
विशेष लेख: पंजाबमधल्या भगव्या छावणीत आता ‘काँग्रेसयुक्त भाजप’!
4
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
5
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
6
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
7
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
8
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
9
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
10
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
11
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
12
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
13
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
14
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
15
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
16
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
17
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
18
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
19
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
20
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
Daily Top 2Weekly Top 5

देवघराचे चुकीचे स्थान निर्माण करेल वास्तुदोष; करा पुढील बदल!

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 20, 2021 15:15 IST

अजाणतेपणी आपल्याकडून देव्हाऱ्याची जागा चुकते आणि आपल्याला पूजेचा, देवदर्शनाचा आनंद मिळत नाही किंवा समाधान लाभत नाही. यासाठी फार बदल अपेक्षित नाहीत, फक्त दिशाबदल अपेक्षित आहे.

आपली रोजची सकाळ देवदर्शनाने होते. देवाचा निरोप घेऊन आपण कामाची सुरुवात करतो. हिंदू घरांमध्ये देव्हारा नाही, असे होत नाही. सगळे जण आपापल्या सोयीप्रमाणे घरात देव्हाऱ्याची रचना करतात किंवा जागेचा अभाव असेल, तर देवी-देवतांची फोटो फ्रेम लावतात आणि त्याची पूजा करतात. परंतु, अजाणतेपणी आपल्याकडून देव्हाऱ्याची जागा चुकते आणि  आपल्याला पूजेचा, देवदर्शनाचा आनंद मिळत नाही किंवा समाधान लाभत नाही. यासाठी फार बदल अपेक्षित नाहीत, फक्त दिशाबदल अपेक्षित आहे. हा बदल वास्तू शास्त्रानुसार सुचवलेला आहे. तुम्हालाही घरात दोष जाणवत असतील, कुटुंबाची प्रगती थांबलेली आहे असे जाणवत असेल, तर देव्हाऱ्याची जागा बदलून पहा व पुढील चूका टाळा.

देवघर कुठे असावे ?

घर स्वत:चे असो नाहीतर भाड्याचे, छोटे असो किंवा मोठे, देवघर असलेच पाहिजे. कारण, या स्थळावर सर्व जण नतमस्तक होतात. देवघराची दिशा उत्तर पूर्व असल्यास शुभ मानली जाते. या दिशेने देवघर असल्यास घरात सकारात्मक ऊर्जा जाणवते. ईशान्य दिशेचे प्रमुख गुरु बृहस्पती हे अध्यात्मिक ज्ञान देतात. सकारात्मक ऊर्जेचा संचार याच दिशेने होते. वास्तुपुरूष जेव्हा धरतीवर आले, तेव्हादेखील त्यांचे शीर ईशान्य दिशेने होते. म्हणून देवघरासाठी ईशान्य दिशा महत्त्वाची ठरते. 

काही कारणास्तव ईशान्य दिशेने देवघर ठेवणे जमत नसेल, तर पूर्व दक्षिण दिशेचा वापर करावा. परंतु केवळ दक्षिण दिशेच्या दिशेने देवघर नसावे. कारण ती यमाची दिशा आहे. पूजा करताना व्यक्तिचे मुख पूर्व दिशेने असेल, तर पूजेचे पूर्ण फळ मिळते आणि पूजा संपन्न होते.

देवघर कुठे नसावे?

अनेकदा जागेच्या अभावामुळे आपण कोनाडा पाहून देवघर बनवून मोकळे होतो. तसे असले, तरीदेखील देवघराचे पावित्र्य राखण्याच्या दृष्टीने आणि देवपूजेतून प्रसन्नता मिळण्याच्या दृष्टीने पुढील जागांची निवड प्रकर्षाने टाळावी. अशा ठिकाणी देवघर असेल, तर घरात अकारण क्लेष होतात, आर्थिक हानी होेते आणि कुटुंबप्रमुख नाखुष राहतो. 

>>शिडीच्या खाली देवघर असू नये.>>शौचालयाच्या जवळपास देवघर असू नये. >>शयन कक्ष अर्थात बेडरूममध्ये देवघर असू नये.>>घराची अडगडीची जागा, कोनडा, बेसमेंट, स्टाअर रूम अशा ठिकाणी देवघर करू नये. 

अशा रितीने देवघराची जागा निश्चित करून दिवसभरातून किमान पाच मिनीटे देवासमोर, देवाच्या सान्निध्यात घालवावीत, त्याचा लाभ तुम्हाला आणि तुमच्या घरच्यांना अवश्य मिळेल.