शहरं
Join us  
Trending Stories
1
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
2
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
3
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
4
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
5
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
6
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
7
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
8
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
9
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
10
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
11
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
12
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
13
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
14
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
15
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
16
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
17
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
18
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
19
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
20
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
Daily Top 2Weekly Top 5

विशेषत: स्त्रियांनी तुळशीचे पूजन का करावे? वाचा!

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 5, 2021 17:19 IST

तुलसी महात्म्य समजून घेण्यासाठी तुळशीचा नित्य सहवास नको का? म्हणूनच स्त्रियांनी तुळशीची नित्यपूजा करावी असे धर्म शास्त्र सांगते.

तुळशी ही लक्ष्मीस्वरूप आहे म्हणून कार्तिक शुक्लपक्षात आपण विष्णूबरोबर तिचा विवाह करतो. बायकोला आपण गृहलक्ष्मी म्हणतो. गृहलक्ष्मीने मुख्य लक्ष्मीचे रोज पूजन करणे युक्तच आहे. या पूजेने चंचल असलेली लक्ष्मी आपल्या घरी स्थिर राहावी, अशी गृहलक्ष्मी पूजा करून तिची प्रार्थना करते.पृथ्वीभोवती ओझोन वायूचा जाड थर आहे व तो आवश्यक आहे. औद्योगिकरणामुळे जे प्रदुषण होत आहे ते ओझोन वायुमुळे अडवले जाते. पण वाढत चाललेल्या प्रदूषणाने हा थर कमी होत आहे व त्याचे मानवावर दुष्परिणाम होतील असे शास्त्रज्ञ नेहमी सांगत असतात.

तुळशीमध्ये हा ओझोन नावाचा वायू आहे. तो वायू स्त्रियांना फारच हितावह आहे, असे शास्त्रज्ञांचे म्हणणे आहे. पूर्व सुरीनी हे जाणून स्त्रियांनी तुलसीपूजन करण्याचा धर्मात अंतर्भाव केला आहे. स्वाभाविकच तुळशीजवळ जावे लागते. तिचा स्पर्शही होतो, त्यामुळे स्त्रियांना आवश्यक असलेला वायू सहज मिळतो. तुळशीला प्रदक्षिणा घातल्यावर हा ओझोन वायू अधिक मिळतो व लाभही अधिक होतो.

तुळशी दारात लावणे ही हिंदूंच्या घराची खूण आहे. धर्म शास्त्राने तुळशी वृंदावन लावावे असे सांगितले होतेच, परंतु विज्ञानाने महत्त्व पटवून दिल्यावर तुळशीच्या रोपाबद्दल अधिक जनजागृती झाली. 

आयुर्वेदाच्या दृष्टीने तुळस ही उत्तम कफघ्न आहे. सर्दी पडसे या विकारांवर उत्तम औषधी आहे. दम्याच्या विकारांवरही गुणकारक आहे. 

असे हे तुलसी महात्म्य समजून घेण्यासाठी तुळशीचा नित्य सहवास नको का? म्हणूनच स्त्रियांनी तुळशीची नित्यपूजा करावी असे धर्म शास्त्र सांगते.