शहरं
Join us  
Trending Stories
1
ईडीचे कार्यालय असलेल्या कैसर-ए-हिंद इमारतीला भीषण आग; पहाटे २.३० वाजल्यापासून अद्याप धुमसतेय...
2
पहिलाच प्रकार! बँक अकाऊंट सांभाळता सांभाळता डीमॅट अकाऊंट खाली झाले; रातोरात ५ लाखांचे शेअर वळते केले
3
पाकची कोंडी करण्यासाठी हालचाली; अमेरिकेसह विविध देशांचा पाठिंबा मिळविण्यासाठी संपर्क साधणे सुरू
4
पाकिस्तानी दहशतवाद्यांना आता धास्ती 'अननोन गनमॅन'ची; दोन वर्षांत २० ते २५ अतिरेक्यांचा केला खात्मा
5
आजचे राशीभविष्य, २७ एप्रिल २०२५: नव्या कार्याचा आरंभ न करणे हितावह राहील
6
बिलावल बरळले; पाणी रोखले तर भारतीयांच्या रक्ताचे पाट वाहतील
7
काश्मीरमध्ये मोठे कोंबिंग ऑपरेशन, दहशतवाद्यांना मदत करणाऱ्या ४४६ पेक्षा जास्त लोकांना घेतले ताब्यात
8
दहशतीच्या भयाण रात्री खुर्शीदभाईंनी आम्हा पाच कुटुंबांना दिला घरात आश्रय; आमच्यासाठी धावून आलेले देवदूतच
9
बेकायदा पार्किंगबाबत जनजागृती करा; उच्च न्यायालयाची ज्येष्ठ नागरिकांना सूचना
10
पर्यटकांना होऊ शकतो घाबरण्याचा आजार; मानसिक आरोग्यावर घातक परिणाम होऊ शकतात
11
पाकचे तीन तुकडे होणे गरजेचे, तर युद्ध क्षमता कमी होईल..!
12
पाकिस्तानला पाण्यासाठी भीक मागायला लावायची असेल तर...
13
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
14
'झेलम'ला अचाकच पूर आला, पाकिस्तानात एकच गोंधळ उडाला; पाक मीडियानं भारतावर मोठा आरोप केला! नेमकं काय घडलं?
15
पर्यटकाच्या व्हिडिओमध्ये कैद झाले दहशतवादी...? देहूरोड येथील सामाजिक कार्यकर्त्याचा दावा
16
चोपड्यात थरार...! प्रेमविवाह केलेल्या मुलीला बापानेच गोळी झाडून संपवलं, जावई जखमी  
17
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
18
अंबाला गावात लग्नाच्या जेवणातून विषबाधा; आठ वर्षीय बालकाचा मृत्यू, अनेकांची प्रकृती चिंताजनक
19
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
20
पहलगाम ईफेक्ट : सूक्ष्म नजर ठेवा, सतर्क रहा; भारतीय रेल्वेला अलर्ट!

निर्माल्य केराच्या टोपलीत का टाकू नये? त्यामागील शास्त्रीय कारण वाचा!

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 15, 2021 09:51 IST

देवांमधील चैतन्याचा गंध या फुलांच्या माध्यमातून मंदिरात, घरात दरवळून आपणास प्राप्त होतो. यापुढे त्या फुलांना, माळांना पावित्र्य प्राप्त होते. तेव्हा अशा कोणत्याही पवित्र वस्तुला पाय लावीत नाहीत.

आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये केर काढणाऱ्या केरसुणीलाही लक्ष्मी मानतात. तिचे दिवाळीत पूजन करतात. तिला चुकून जरी पाय लागला तरी नमस्कार करतात. तेव्हा अशा या अतिउच्च संस्कृतीमध्ये देवाला आदल्या दिवशी वाहिलेल्या व दुसऱ्या दिवशी निर्माल्य झालेल्या फुलांनाही महत्त्व दिले आहे. यात नवल नाही.

पण पूजा ही मूलत: आर्य संस्कृतीमध्ये नव्हती. आर्यांना पूजन माहित नव्हते, त्यांना यजन माहित होते. ऋग्वेदामध्ये पूजा हा शब्द देखील नाही. पूजा हा द्राविड भाषेतील शब्द आहे. त्यातील पू चा अर्थ पुष्प असा आहे. पू अधिक जेय म्हणजे पुष्पलंकरण होय. त्यावरून पुढे पूजा हा शब्द आपल्याकडे निर्माण झाला असावा. यातील तात्पर्य असे की पूजेच्या वेळी देवांना फुले वाहून अलंकृत करण्यात येते.  दुसऱ्या दिवशी त्याचे रुपांतर निर्माल्यात होते.

'देवस्वत्वनिवृत्तिविशिष्ट देवदत्तं वस्तू' म्हणजे देवाला अर्पण केलेली, पण नंतर देवाने तिच्यावरील स्वामित्त्व काढून घेतलेली अशी जी वस्तू ती निर्माल्य होय. मग ती फुले असोत वा दूर्वा तुळशीसारखी तृणपल्लवी असो. बेल मात्र त्याला अपवाद आहे. तो कितीही वेळा वाहिला तरी त्याचे निर्माल्य होत नाही. 

काही काही पूजांची लागलीच सांगता होते. तेव्हा अशा प्रसंगी देवाला वाहिलेली फुले पुष्पमाला किंवा देवाला एकदा वाहून काही वेळाने काढलेल्या पुष्पमाला, फुले ही सुद्धा निर्माल्यच मानतात.

देवांमधील चैतन्याचा गंध या फुलांच्या माध्यमातून मंदिरात, घरात दरवळून आपणास प्राप्त होतो. यापुढे त्या फुलांना, माळांना पावित्र्य प्राप्त होते. तेव्हा अशा कोणत्याही पवित्र वस्तुला पाय लावीत नाहीत. इतकेच नव्हे, तर देवांवरील असे निर्माल्य काढल्यानंतर तो आपल्या भाळी लावून हुंगतात, त्यात सुरलेल्या देविक चैतन्याचाही लाभ व्हावा, ही भावना असते. याला शिव निर्माल्य मात्र अपवाद आहे. कारण सुखी जीवन जगावे अशी निर्माल्य हुंगण्यामागील भावना असते. शिव ही संहारक देवता असल्याने त्याचा निर्माल्य हुंगीत नाहीत, असे सर्व प्रकारचे निर्माल्य साठवून किंवा लागलीच नदी किंवा जलाशयात टाकतात. केराच्या टोपलीत टाकत नाहीत. कारण त्याच्या पावित्र्याला धक्का लागू नये, ही त्यामागील श्रद्धा असते.