शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई-गोवा महामार्गाची गडकरींनी दिली नवी तारीख; म्हणाले, सर्व खटले मिटले...
2
मुख्यमंत्र्यांना पत्र लिहिणार, कॉलही करणार; MPSC विद्यार्थ्यांच्या भेटीनंतर शरद पवार काय म्हणाले?
3
५५ हजारांवर येण्याचं स्वप्न भंगलं; एका दिवसात सोन्याच्या दरात १३०० रुपयांपेक्षा अधिक वाढ, नवे दर काय?
4
पुण्यातील १२ रुग्णालये नावालाच 'धर्मादाय'; नियम पायदळी तुडवले, उपचारावरून गरिबांना लुटले
5
IPL 2025 मध्ये फिक्सिंगचा प्रयत्न सुरू, खेळाडूंच्या कुटुंबीयांना केलं जातंय टार्गेट, मास्टरमाइंड कोण?
6
"आज आम्ही भोगतोय, वेळ बदलेल तेव्हा…’’ EDच्या चौकशीला हजर झालेल्या रॉबर्ट वाड्रांचं सूचक विधान   
7
"मुर्शिदाबादचा हिंसाचार सुनियोजित कट, घुसखोरांना का येऊ दिलं गेलं?"; ममतांचा सवाल
8
धमाल! आता WhatsApp वर तुम्ही ठेवू शकता मोठं स्टेटस; १ मिनिटाची लिमिट कितीने वाढवली?
9
डीअर क्रिकेट, गिव्ह मी वन मोअर चान्स! क्रिकेटवर प्रेम करणाऱ्या करुण नायरची गोष्ट
10
३ दिवसांपासून रॉकेट बनलाय 'हा' स्टॉक, झुनझुनवालांकडे आहेत १३ कोटींपेक्षा अधिक शेअर; किंमत ₹९५ पेक्षा कमी 
11
Sankashti Chaturthi 2025: संकष्टीपासून ॐकार साधना सुरू करा आणि अगणित लाभ मिळवा!
12
१०० कोटींची ऑर्डर! "१२०० फूट खोल खाणीत...", मुलीला शेवटचा मेसेज, लक्ष्मण शिंदेंची अपहरण करून हत्या
13
तुम्हाला श्रीमंत बनवणाऱ्या SIP चे १० सीक्रेट; कोट्यधीश होण्याचे गणित समजून घ्या
14
दीड लाखाचे व्याज माफ, म्हाडाचा निकाल; बिल्डरने आकारलेली वाढीव रक्कम रद्द करण्याची सूचना
15
"ड्रग्सच्या नशेत त्याने माझ्या ड्रेसला...", २९ वर्षीय अभिनेत्रीचा खळबळजनक आरोप; म्हणाली...
16
'हा' शेअर विकण्यासाठी गुंतवणूकदारांची रांग, महिन्याभरात अर्धी झाली किंमत; आता SEBI ची मोठी कारवाई
17
IPL 2025: 'असंभव....'; चहलच्या 'मॅचविनिंग' गोलंदाजीनंतर RJ महावशची इन्स्टा स्टोरी अन् खास मेसेज 
18
प्रसिद्ध अभिनेत्री झाली आई, डिलीव्हरीच्या आदल्या दिवशी केलं फोटोशूट; जपानी भाषेत ठेवलं नाव
19
‘हनी ट्रॅप’पासून सावध राहा; गौरव पाटील प्रकरणात उच्च न्यायालयाचा इशारा
20
सतत जांभई येणं सामान्य गोष्ट नाही; मोठ्या आजाराचे असू शकतात संकेत, कसा टाळाल धोका?

दत्तगुरुंचे आसन नेहमी मृगाजिन का असते? काय आहे त्याचे वैशिष्ट्य? चला जाणून घेऊ!

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 8, 2023 15:19 IST

उपासनेची बैठक स्वच्छ, पवित्र असेल तरच ती अध्यात्मक बैठक पक्की होते. असेच शास्त्र जोडले आहे या ठरविक आसनांमागे!

देवी देवतांकडे कधीही पहा, त्या प्रसन्न दिसतात. त्यांना पाहून आपल्यालाही प्रसन्न वाटते. म्हणून आपण देवदर्शन घेण्यासाठी मंदिरात जातो. देवाचे नखशिखांत रूप न्याहाळतो. ते न्याहळत असताना देवाचे वस्त्र आपले लक्ष वेधून घेते. 

सरस्वतीचे शुभ्र वस्त्र, राम-सीतेची वल्कले, विष्णूंचे पितांबर, दत्तात्रेयांचे मृगाजिन, महादेवाचे व्याघ्राजिन, जगदंबेची खणाची साडी, गणरायाचे सोवळे, पांडुरंगाचे-बालाजीचे शुभ्र धोतर आपल्या लक्षात राहते. बाकीचे वस्त्रप्रकार आपणही वापरतो. पैकी मृगाजिन, व्याघ्राजिन हे वस्त्रप्रकार मात्र दत्त, महादेव वगळता साधू-संत, ऋषीमुनी वापरत असल्याचे आपण पाहिले आहे. यामागे कारण काय ते जाणून घेऊ. 

व्याघ्राजिन म्हणजे काय आणि त्याचे गुणधर्म कोणते-व्याघ्रजिन म्हणजे वाघाच्या कातड्याचे वस्त्र. व्याघ्राजिनावर बसण्याने मूळव्याध, भगेंद्र, अंडवृद्धी यासारखे विकार होत नाहीत. झालेलेही नष्ट होतात. तसेच व्याघ्राजिनाजवळ सर्प, विंचू, किडेकाटे विषारी जीवजंतु येत नाहीत. त्यामुळे त्यांचे भय रानावनात निर्जन प्रदेशातही व्याघ्राजिनावर बसून ध्यानधारणा करणाऱ्यांना राहत नाही. प्राणी मेल्यानंतरसुद्धा त्यांचे गुणधर्म त्याच्या शारीरिक घटकात म्हणजे कातडे, अस्थि, केस यामध्येही राहिलेले असतात.

मृगाजिन म्हणजे काय आणि त्याचे गुणधर्म कोणते-मृगाजिनावर बसल्यानेही मूळव्याध, भगेंद्र, अंडवृद्धि यासारखे रोग नष्ट होतात. मृग हा निसर्गत: शाकाहारी सत्ववृत्तीचा प्राणी आहे. म्हणूनच तपोवनातील तपस्वी आपल्या आश्रमात मृग पाळून त्यांचा सहवास स्वीकारत असत. हरणाजिनावर बसणाराचा कामविकार शमन पावतो. इतकेच काय, पण त्यावर सतत बसल्यास नपुंसकता येते. म्हणून, तपस्वी, वानप्रस्थी, संन्यासी त्यांचा सतत उपयोग करत असत. परंतु ब्रह्मचारी, गृहस्थाश्रमी तसे नपुंसक होऊ नये, म्हणून त्यांनी मृगाजिनावर दर्भासन घ्यावे, असे श्रीकृष्णांनी सांगितले आहे. त्यायोगे कामशमन होते परंतु नपुंसकता येत नाही.

म्हणून देव, ऋषि मुनी मृगाजिन, व्याघ्राजिन परिधान करत किंवा त्याचे आसन बनवून त्यावर आसनस्थ होत तपश्चर्या करत असत.