शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
2
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
3
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
4
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
5
भंडाऱ्यात चोरांचे तांडव! ५ तासांत २१ दुकाने फोडली; लाखोंचा मुद्देमाल गायब, टोळी असल्याचा संशय
6
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
7
रवींद्र एरंडेच्या ऑफिसमध्ये धनादेशांचा खच; वाचवण्यासाठी अहिल्यानगरच्या 'त्या' नेत्यांचा पोलिसांवर दबाव
8
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
9
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
10
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
11
आठ वर्षांच्या चिमुरडीचा डम्परखाली चिरडून मृत्यू; संतप्त नागरिकांचा रास्ता रोको, चालकाला अटक
12
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
13
पहिल्या पॉड टॅक्सीचे भूमिपूजन; मात्र कुर्ला ते वांद्रे रेल्वे स्थानक प्रवासासाठी २०३१ची प्रतीक्षा
14
‘टनेल बोरिंग’ मशिनवर 'ठाणेकर' उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठेवणार नजर- मुख्यमंत्री फडणवीस
15
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
16
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
17
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
18
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
19
२०१४ मधील पोलिस कोठडी मृत्यू प्रकरणी सात पोलिसांविरुद्ध खुनाचा आरोप कायम
20
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
Daily Top 2Weekly Top 5

'जो दुसऱ्यावरी विसंबला, त्याचा कार्यभाग बुडाला' असे समर्थ रामदास स्वामी का सांगतात? वाचा ही गोष्ट!

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 28, 2022 07:00 IST

चिमणीच्या छोट्याशा गोष्टीतून मोठा बोध मिळतो स्वावलंबित्त्वाचा, तो आचरणात आणा आणि ताठ मानेने जगा!

चिमणी रोजच्याप्रमाणे आपल्या इवल्याशा चोचीतून पिलांसाठी दाणे घेऊन घरट्यात आली. पिल्लं उदास होती. चिमणीने विचारले, काय झाले, तुम्ही उदास का?पिल्लं म्हणाली, 'आई, शेतकरी आलेला, तो सांगत होता, उद्या त्याची मुलं येऊन झाडाची कापणी करणार आहेत. मग आपण बेघर होऊ, याच विचाराने आम्ही उदास आहोत!'चिमणी म्हणाली, 'काळजी करू नका पिलांनो, उद्या कोणी येणार नाही. तुम्ही निश्चिन्त राहा.' दुसऱ्या दिवशी खरोखरच कोणीच आले नाही. 

काही दिवसांनी पुन्हा पिलांनी आईकडे काळजी व्यक्त केली, 'आई आई, आज शेतकरी आला होता. तो उद्या त्याचे कामगार पाठवून शेतात छाटणी करणार आहे. आपण बेघर झालो तर?'चिमणीने पुन्हा तीच भविष्यवाणी केली आणि तेव्हाही ती खरी ठरली. 

आणखी काही दिवसांनी पिल्लं गयावया करू लागली. 'आई आज शेतकरी आला होता. तो सांगत होता की उद्या तोच येऊन पिकांची आणि झाडाची कापणी करणार आहे. त्यादिवशी मात्र चिमणी म्हणाली, 'आता आपण मुक्काम हलवायला हवा' असे म्हणत रातोरात त्यांनी जागा बदलली आणि दुसऱ्या झाडावर घरटे बांधले. दुसऱ्या दिवशी खरोखरच शेतकरी आला आणि त्याने ठरवल्याप्रमाणे झाडांची आणि पिकाची कापणी केली. 

त्या दिवशी संध्याकाळी पिल्लं आईला म्हणाली, 'आई याआधी आम्ही तक्रार करून सुद्धा तू दुर्लक्ष केलं आणि कोणी येणार नाही सांगून वेळ मारून नेलीस. पण यंदा मात्र त्वरित स्थलांतरित होण्याचा निर्णय कसा घेतलास? तुला भविष्य पाहता येतं का?'चिमणीने हसून पिलांना पंखाखाली घेत म्हटले, 'पिलांनो, इतके दिवस शेतकरी दुसऱ्यांवर अवलंबून होता. त्यामुळे त्याचे काम रखडले होते. पण आज तो स्वतः येणार होता, म्हणजे तो स्वावलंबी झाला होता. जो स्वावलंबी असतो, तोच ठरवलेली गोष्ट पूर्ण करू शकतो.  परावलंबी नाही! म्हणून तुम्ही सुद्धा आता घरट्याबाहेर पडायला शिका आणि स्वावलंबी व्हा!'