शहरं
Join us  
Trending Stories
1
CJI गवईंवर बूट फेकणाऱ्या राकेश किशोरवर अवमानाची कारवाई सुरू; सुप्रीम कोर्टात नेमके काय घडले?
2
“निवडणूक आयोग हा भाजपाची विस्तारित शाखा, फडणवीसांना वकील कुणी केले?”; संजय राऊतांची टीका
3
पीएम मोदींच्या महत्त्वाकांशी योजनेला ख्वाडा? जन-धन योजनेबाबत चिंताजनक बातमी, तुमचं खातं बंद होणार का?
4
EV चार्जिंगशी निगडीत कंपनीच्या शेअरवर गुंतवणूकदारांच्या उड्या; सोनू सूदशी निगडीत आहे कंपनी, ₹१२५ वर आला भाव
5
VIDEO: मुंबईचा रँचो! लोकलमध्ये प्रसुती वेदना, तरुणाने डॉक्टर मैत्रिणीला व्हिडिओ कॉल करुन केली प्रसुती
6
मुंबईत महिलेवर हल्ला केला आणि कोकणात जाऊन लपला, ४८ वर्षांनी झाली अटक, असा सापडला आरोपी
7
"पप्पांना मारलंय... "; लेकानेच केला खुनी आईचा पर्दाफाश; भाच्याच्या प्रेमात घेतला नवऱ्याचा जीव
8
Video - "मला माफ करा..."; तिकीट नाकारल्यानंतर ढसाढसा रडला नेता, व्यक्त केलं दु:ख
9
महाराष्ट्रात एकनाथ शिंदेंसोबत जे झालं, तसंच नितीश कुमारांसोबत होईल? बिहारमध्ये चर्चांना उधाण, पण...
10
सासरेबुवा घरी घेऊन आले २ सूना; लग्नाच्या तिसऱ्या दिवशीच झाल्या गायब अन्... समोर आलं धक्कादायक सत्य
11
Video : सलीम खान राज ठाकरेंच्या भेटीला, गॅलरीमध्ये रंगल्या गप्पा, भेटीचं कारण काय?
12
दर महिना ७० हजार सॅलरी पण हाती शिल्लकच राहत नाही; टेक प्रोफेशनल युवकानं शेअर केला अनुभव
13
Platinum Investment: सोने-चांदीच्या किंमती आवाक्याबाहेर, प्लॅटिनममध्ये गुंतवणूक करणे चांगला पर्याय आहे का?
14
Video: हायकोर्टच्या व्हर्च्युअल सुनावणीदरम्यान वकीलाचा महिलेला Kiss; व्हिडिओ व्हायरल...
15
Virat Kohli Property: विराट कोहलीने ८० कोटीच्या बंगल्याची भावाला दिली 'पॉवर ऑफ अटॉर्नी'? काय आहे हा दस्तऐवज?
16
VIRAL : बाब्बो! ९३व्या वर्षी बाबा झाला हा व्यक्ती; बायको ५६ वर्षांनी लहान! लगेच दुसऱ्या बाळाचाही विचार केला सुरू
17
Virat Kohli: "ज्यावेळी तुम्ही हार मानता..." किंग कोहलीची पोस्ट चर्चेत; जाणून घ्या सविस्तर
18
थकलेले चेहरे, कंटाळवाणा मूड.. विराट-रोहितसह सारेच हैराण! ऑस्ट्रेलियात पोहचण्याआधी काय घडलं?
19
जगातील नकाशात कुठे आहे रहस्यमय 'टोरेंजा' देश?; महिलेचा पासपोर्ट पाहून खळबळ, व्हिडिओ व्हायरल
20
TVS ने लॉन्च केली पहिली दमदार अ‍ॅडव्हेंचर टूरिंग बाईक; जाणून घ्या फीचर्स अन् किंमत...

मंदिरात गेल्यावर आधी घंटानाद करून मगच देवाला नमस्कार का करतात? वाचा.

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 19, 2021 09:31 IST

मंदिरातल्या सकारात्मक लहरींचा मनावर सकारात्मक परिणाम होतो आणि नवीन ऊर्जा प्राप्त होऊन सकारात्मक विचारांनी दैनंदिन कामाची आनंदात सुरुवात होते.

रोज सकाळी स्नान करून मंदिरात देवदर्शनाला जावे, असा आपल्या हिंदू संस्कृतीचा संस्कार आहे. रोज सकाळी मंदिरात जाणे शुभकारक असते. ही वेळ शांततेची असते. सभोवतालचे वातावरण प्रसन्न असते. पवित्र असते. अशा मंगलसमयी मंगलदर्शनाने दिवसाची सुरुवात केली असता दिवस छान जातो. म्हणून रोज सकाळी मंदिरात जाण्याचा शिरस्ता ठेवावा.

मंदिरात जाताना चपला बाहेर काढून, पाय धुवून मगच मंदिरात प्रवेश करावा. मंदिराच्या पायरीला नमस्कार करून मंदिरात गेल्यावर सर्वप्रथम घंटानाद करावा. हा घंटानाद कशासाठी व कोणासाठी? घंटानाद देवाला प्रिय आहे. तो कानावर पडला असता देवाला जाग येऊन दर्शनार्थ आलेल्या भक्ताकडे त्याची दृष्टी जाते. या दृष्टीच्या तेजामुळे दृष्ट प्रवृत्ती नष्ट होते. आगमनार्थं तु देवानां गमनाथरं तु राक्षसाम् ।कुर्वे घण्टारवं ततर देवताहृान लक्षणम् ।।

अनग्राहक देवांच्या आनगमासाठी व प्रतिबंधक राक्षसांच्या निर्गमनासाठी घंटानाद करावा. हे देवतांच्या आवाहनाचे उपलक्षण आहे. घंटानाद एकदाच करावा. कर्णकर्कश घंटानाद करून मंदिरातील शांततेचा भंग करू नये. घंटानाद करून देवाची पूजा केली असता भक्ताच्या रक्षणाची जबाबदारी भगवंत घेतो अशी भक्तांची श्रद्धा असते.

घंटानाद झाल्यावर देवाला दोन्ही हात जोडून मस्तक नत करून म्हणजेच झुकवुन नमस्कार करावा. नमस्कार तीन प्रकारे केला जातो. कायिक, वाचिक आणि मानसिक. कायिक म्हणजे जेव्हा आपण देवासमोर साष्टांग नमस्कार घालतो, तेव्हा आपल्या देहाचे आठ अवयव जमीनिला लागतात, त्याला अष्टांग नमस्कार म्हणतात. तसा नमस्कार किंवा गुडघ्यावर बसून माथा देवाच्या चरणांवर अथवा देवासमोर नतमस्तक करणे हा कायिक नमस्कार झाला. वाचेने देवाचे नामस्मरण करणे, जप जाप्य करणे, मंत्र म्हणणे, स्तोत्र म्हणणे याला वाचिक नमस्कार म्हणतात. मंदिराबाहेरून जाताना किंवा मनातल्या मनात देवाला स्मरून कार्यारंभ करताना जो नमस्कार केला जातो त्याला मानसिक नमस्कार म्हणतात. परंतु मंदिरात गेल्यावर शक्यतो कायिक नमस्कार करावा. 

जो देव आपल्या आवडीचा असतो, त्याची प्रार्थना करावी. आपल्या आवडत्या दैवताचा श्लोक म्हणावा, मंत्र म्हणावा, जपाची माळ ओढावी. देवाचे दर्शन घेऊन, प्रदक्षिणा घालून काही क्षण मंदिराच्या सभागृहात शांतचित्ताने बसावे. मंदिरातल्या सकारात्मक लहरींचा मनावर सकारात्मक परिणाम होतो आणि नवीन ऊर्जा प्राप्त होऊन सकारात्मक विचारांनी दैनंदिन कामाची आनंदात सुरुवात होते. देवदर्शन हे देवासाठी नसून आपल्यासाठी लाभदायक असते, हा विचार कायम ध्यानात ठेवावा.