शहरं
Join us  
Trending Stories
1
जातनिहाय जनगणनेचे स्वागत, पण कधी पूर्ण करणार ते सांगा; राहुल गांधी यांनी केंद्र सरकारच्या निर्णयाला दिला पाठिंबा
2
दहशतवाद्याने विचारले, आप काश्मिरी हो क्या? जालन्यातील युवकाचा दावा : रेखाचित्र पाहताच ‘एनआयए’ला ई-मेल
3
यावेळी तीन तुकडेच करा! पीएम मोदींनी काल पाच उच्चस्तरीय बैठका घेतल्या
4
आजचे राशीभविष्य, १ मे २०२५: व्यापारात फायदा अन् नोकरीत बढतीची शक्यता
5
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आता वर्षा बंगल्यामध्ये; अक्षय्य तृतीयेचा मुहूर्त साधून केली विधीवत पूजा
6
ग्रामीण भागात रोजगार वाढले; तरुणांपुढे आव्हाने, तरुणांपुढे गुणवत्तापूर्ण उपजीविकेशी संबंधित आव्हाने कायम
7
एफआयआर नोंदविण्यास नकार हे दुर्दैव; अक्षय शिंदे एन्काऊंटरप्रकरणात क्राइम ब्रँचच्या ‘एसआयटी’वर उच्च न्यायालयाची नाराजी
8
एमएमआरटीएकडून बेस्ट भाडेवाढ मंजूर; अधिकृत घोषणेची प्रतीक्षा
9
रेल्वेच्या बैठकीला पाच खासदारांची दांडी; प्रवाशांना चांगल्या सुविधा पुरविण्याचे आश्वासन
10
पुढील जनगणनेची तारीख लवकरच जाहीर; काेराेनामुळे झाला नव्हता निर्णय
11
भारतासोबतच्या टॅरिफ वाटाघाटी प्रगतिपथावर; अमेरिकी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे प्रतिपादन
12
CSK प्लेऑफ्सच्या शर्यतीतून आउट; IPL च्या इतिहासात धोनीच्या संघावर पहिल्यांदाच आली ही वेळ
13
पाकिस्तान हादरला !! बसले भूकंपाचे तीव्र धक्के; किती होती तीव्रता? काय आहे सध्याची परिस्थिती?
14
जातिनिहाय जनगणना निर्णयावरुन आता श्रेयवादाची लढाई; भाजपा नेत्यांचा राहुल गांधींवर पलटवार
15
चहलनं साधला मोठा डाव; IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकसह युवराज सिंगच्या विक्रमाशी बरोबरी
16
"आम्ही सुरुवात करणार नाही, पण...!"; पाकिस्तानची भारताला पोकळ धमकी
17
"2043 पर्यंत या देशांमध्ये असेल मुस्लिमांचं राज्य", बाबा वेंगा यांची भविष्यवाणी!
18
दिशा सालियन प्रकरण: सतीश सालियन यांच्या याचिकेवर भूमिका स्पष्ट करा; HCचे सरकारला निर्देश
19
'सरकारला 'टेकू' असला की मनमानी करता येत नाही'; जातनिहाय जनगणनेच्या मुद्द्यावरून खोचक टोला
20
संध्याकाळचे पेट्रोलिंग टाळले म्हणून पोलिस आयुक्तांनी ठाण्यात पोहोचून ठाणेदारांना फटकारले!

बाप्पाचे वाहन उंदीरच का? त्या रूपकामागे असलेली कथा आणि अर्थ समजून घ्या!

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 27, 2021 12:05 IST

उंदीर ही एक विनाशक, विघातक वृत्ती आहे. तसेच उंदीर हे आपल्या चंचल तसेच काळ्या विकृत मनाचे प्रतीक आहे. त्यावर अंकुश धारण केलेला बाप्पाच विजय मिळवू शकतो.

ज्याला सर्व ठिकाणी पूजेचा पहिला मान असतो, असा बाप्पा वाहन म्हणून एवढ्याशा उंदराची निवड करतो, यात विरोधाभास जाणवतो,नाही का? परंतु, त्या रूपकामागे दडलेला अर्थ समजून घेतला, तर बाप्पाच्या दूरदृष्टीचे आपल्याला निश्चितच कौतुक वाटेल. तत्पूर्वी याबाबत सांगितली जाणारी पौराणिक कथा जाणून घेऊया. 

एक दिवस इंद्राच्या दरबारात काही औचित्य असल्यामुळे नृत्य गायनाचा कार्यक्रम आयोजित केला होता. त्या कार्यक्रमाचा सूत्रधार अर्थात प्रमुख कलाकार होता क्रौंच नावाचा एक गंधर्व! देवलोकातील त्या खास सभेची आणि सभासदांची उठबस करताना त्याचा पाय चुकून एका ऋषींना लागला आणि त्यांना यातना असह्य झाल्याने त्यांनी रागाच्या भरात त्याला शाप दिला, की सभेमध्ये उंदरासारखी लुडबूड करणाऱ्या गंधर्वा, तू पृथ्वीवर उंदीर होऊन फिरशील. 

क्रौंच गयावया करू लागला. क्षमा मागू लागला. परंतु त्याला ती शिक्षा भोगावी लागली. गंधर्व योनीतून थेट तो उंदीर योनीत प्रवेश करता झाला आणि नेमका तो एका ऋषींच्या आश्रमात पोहोचला. उंदरांच्या मूळ वृत्तीप्रमाणे तो अन्नधान्याची नासधूस करू लागला. सर्वांनी त्याला पकडण्यासाठी शर्थीचे प्रयत्न केले. त्या आश्रमात बाप्पाचे आगमन झाले असता, ऋषींनी ही समस्या बाप्पाच्या कानावर घातली. बाप्पाने अवघ्या काही क्षणात सापळा रचून उंदराला पकडले. 

उंदराने हात जोडले. सर्वांची माफी मागितली. आपण शापित गंधर्व असल्याची ओळख पटवून दिली. तेव्हा बाप्पाने त्याला अभय दिले आणि वर माग म्हटले. त्यावर तो गंधर्व म्हणाला, `पुन्हा गंधर्व होऊन गायन नृत्य करण्यात मला रस नाही, त्यापेक्षा साक्षात तुझ्या पायाशी येण्याची संधी मिळाली आहे, तर तू मला तुझा दास करून घे. अगदी वाहन होऊन येण्याचीही माझी तयारी आहे.' यावर बाप्पा म्हणाले, `अरे पण तुझा माझा भार पेलवेल तरी का? तू दबून जाशील!'

गंधर्व म्हणाला, `हरकत नाही देवा, जेवढा काळ शक्य तेवढी तुमची सेवा हातून घडल्याचे समाधान तरी मिळेल!'त्याचे हे बोलणे ऐकून बाप्पाने त्याला तथास्तू म्हटले आणि त्या दिवसापासून क्रौंच हा शापित गंधर्व बाप्पाचे वाहन बनला.

ज्याप्रमाणे ही पौराणिक कथा समर्पक वाटते, त्याचप्रमाणे उंदराचा वाहन म्हणून केलेला वापर हा रुपक कथेचा एक भाग आहे, हे आपण लक्षात घेतले पाहिजे. उंदीर ही एक विनाशक, विघातक वृत्ती आहे. तसेच उंदीर हे आपल्या चंचल तसेच काळ्या विकृत मनाचे प्रतीक आहे. त्यावर अंकुश धारण केलेला बाप्पाच विजय मिळवू शकतो. म्हणून वाईटाकडे वेगाने धावणारे मन, अज्ञान, अंधश्रद्धेने पोखरले जाणारे मन नियंत्रणात राहावे, यासाठी आपण बाप्पाची प्रार्थना करतो आणि त्याला विनवणी करतो...

मोरया मोरया मी बाळ तान्हे,तुझीच सेवा करू काय जाणे, अन्याय माझे कोट्यानुकोटी, मोरेश्वरा बा तू घाल पोटी।

टॅग्स :Sankashti Chaturthiसंकष्ट चतुर्थी