शहरं
Join us  
Trending Stories
1
शरद पवारांच्या बारामतीतील प्रचाराच्या सांगता सभेत अचानक अजितदादांची एंट्री; नेमकं काय घडलं?
2
चेन्नई सुपर किंग्सने बदलले Point Table चे चित्र; दुसऱ्या फळीच्या गोलंदाजांना घेऊन १११५ दिवसांनी जिंकले
3
"एका पठ्ठ्याने अश्रू काढले, घ्या मी पण रडतो, मला मत द्या", अजित पवारांनी केली नक्कल
4
एक ऑस्ट्रेलिया, बाकी ३ कोण याची पर्वा नाही; वर्ल्ड कप विजेत्या पॅट कमिन्सचा कॉन्फिडन्स पाहा, Video 
5
मागे रिकामे कॅरेट अन् समोर चंदनाच्या गोण्या, 'पुष्पा' स्टाईल चोरी उघडकीस, 2 कोटींचे चंदन जप्त
6
भाजपा, महायुतीच्या उमेदवारांची उमेदवारी रद्द करा, कारण...; काँग्रेसची निवडणूक अधिकाऱ्यांकडे तक्रार
7
श्रीराम मंदिरात गेल्यामुळे पक्षातून तीव्र विरोध; काँग्रेस नेत्या राधिका खेरा यांचा राजीनामा...
8
पक्षफुटीनंतर शरद पवारांचे 'ते' शब्द आठवून रोहित पवार गहिवरले; ढसाढसा रडताना पाहून सारेच स्तब्ध
9
“राज ठाकरे ज्यांच्या प्रचारासाठी जातात तो उमेदवार पडतोच”; ठाकरे गटाचा खोचक टोला
10
अगं बाई तुला आम्हीच निवडून आणत होतो; प्रचाराच्या शेवटच्या दिवशी अजितदादांचा सुप्रिया सुळेंवर निशाणा
11
'सोढी' १० दिवसांपासून बेपत्ता, आदल्या दिवशी नेमकं काय घडलं होतं? वडिलांनी केला खुलासा
12
निवडणुकीच्या तोंडावर मुद्दाम बदनामीचा प्रयत्न, 'त्या' प्रकरणाशी माझा संबंध नाही- सुनिल तटकरे
13
MS Dhoni चा त्रिफळा उडवताच हर्षल पटेलनं केलं असं काही; निराश फॅन्सची जिंकली मनं
14
'...तर मी मोदींचा जाहीर प्रचार करेन'; उद्धव ठाकरेंचं भरसभेत आश्वासन
15
सई ताम्हणकर अन् जितेंद्र जोशी झळकणार एकाच हिंदी सिनेमात, फरहान अख्तरने केली घोषणा
16
जम्मू-काश्मीर: दहशतवादी हल्ल्यात एकुलता एक मुलगा शहीद; चिमुकला पोरका झाला
17
इंग्लंडच्या सर्वात वजनदार व्यक्तीचा मृत्यू, पुढच्या आठवड्यात होता वाढदिवस, वजन होते...
18
६ धावांत ३ बाद! CSK ने गमावल्या धडाधड विकेट्स, राहुल चहरने टिपले सलग बळी, Video 
19
'ही' आहेत जगातील सर्वात उष्ण ठिकाणं, तापमान वाचून बसेल धक्का!
20
‘भाजपाला विरोध करण्यासाठी दहशतवादी कसाबची बाजू घेता? थोडी तरी लाज बाळगा’, बावनकुळेंची वडेट्टीवारांवर टीका

मंत्र का म्हटले जातात? मंत्रांचे सामर्थ्य काय असते? मंत्रांमुळे काय लाभ होतात? सविस्तर वाचा. 

By ऑनलाइन लोकमत | Published: May 15, 2021 9:21 AM

मंत्र या शब्दातील मकार म्हणजे मनन, त्रकार म्हणजे त्राण तथा संरक्षण यावरून मनन आणि संरक्षण यांनी जो संपन्न झाला आहे, त्याला मंत्र म्हणतात. मंत्र ही एक अद्वितीय शक्ती आहे, सामर्थ्य आहे. त्याची दीक्षा घ्यावी लागते. पुराणकाळी युद्धांमध्येही मंत्रविद्येचा उपयोग करत असत.

कुळधर्म कुळाचारामध्ये पूजा या गोष्टीलाच सर्वात जास्त महत्त्व आहे. या पूजा करत असताना वेगवेगळ्या प्रकारचे मंत्र म्हणावयाचे असतात. यामुळे `मंत्र' यांनाही महत्त्वाचे स्थान आहे. ऋग्वेद-यजुर्वेद-सामवेद-अथर्ववेद हे जे आपले चार वेद आहेत, त्यामध्ये मंत्राचा अंतर्भाव होत असल्यानी मंत्र या शब्दाचा अर्थ वेदसंहिता, वेदभागाविशेष असा आहे. तसेच मंत्र म्हणजे गुह्यभाषणे, गुह्य ते सांगणे, गुह्य मतितार्थ उपलब्ध करून देणे, विशिष्ट हेतू मनात धरून देवतांना आमंत्रित करणे, असे मंत्र या शब्दाचे अनेक अर्थ आहेत. देवतांची प्राप्ती व्हावी, आपले संरक्षण व्हावे, विकास व्हावा, हा मंत्रांमागील मुख्य हेतू असतो. 

मकरो मननं प्राह त्रकारस्त्राणमुच्यते,मननत्राणसंयुक्तो मंत्र मत्यभिधीयते।।

मंत्र या शब्दातील मकार म्हणजे मनन, त्रकार म्हणजे त्राण तथा संरक्षण यावरून मनन आणि संरक्षण यांनी जो संपन्न झाला आहे, त्याला मंत्र म्हणतात.मंत्र ही एक अद्वितीय शक्ती आहे, सामर्थ्य आहे. त्याची दीक्षा घ्यावी लागते. पुराणकाळी युद्धांमध्येही मंत्रविद्येचा उपयोग करत असत.

मंत्रांमध्ये असे फार मोठे सामर्थ्य असल्याने पूजेतही मंत्रांना फार महत्त्व असते. मंत्रपुष्प हा तर देवाच्या षोडशोपचार पूजेतील सातेचा म्हणजे शेवटचा मंत्र आहे.ऊँ यज्ञेन यज्ञमयजन्त...ऊँ राजाधिराजाय...ऊँ स्वस्ति, साम्राज्य, भौज्यं...

असे यातील जे मंत्र आहेत त्यामधून प्रथम देवाला वंदन करून सर्वांचे कल्याण, साम्राज्याचा विस्तार, सर्व पदार्थांची निर्मिती, उत्तम राज्य, अधिकार संपन्नता वगैरे गोष्टी प्राप्त व्हाव्यात अशी प्रार्थना केली जाते.

हे मंत्र सामुदायिकपणे म्हणून झाल्यावर शेवटी सर्वांनी आपल्या ओंजळीतील गंध व अक्षता यांनी युक्त असलेली फुले देवाला वहायची असतात. असे हे मंत्र सामर्थ्य अनुभवातून सिद्ध होते. ते श्रद्धापूर्वक म्हटले असता, त्याचे उचित फळ हमखास मिळते.