शहरं
Join us  
Trending Stories
1
"भारतावर टीका करणारे देशच रशियासोबत व्यापार करताहेत"; ट्रम्प यांना भारताने दाखवला आरसा, आकडेवारीसह सुनावले
2
"...त्यामुळे मी भारतावरील टॅरिफ भरपूर वाढवणार आहे"; अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचा पुन्हा इशारा
3
DSP सिराजचा ऑन ड्युटी फॉर्म्युला! सर्वाधिक विकेट्स अन् १००० पेक्षा अधिक चेंडू टाकण्याचा मोठा पराक्रम
4
धक्कादायक! नागपुरात भर रस्त्यावर महिला पोलिसाला मारहाण करत विनयभंग
5
मोबाईलसाठी रेल्वेतील प्रवाशाच्या हातावर फटका, तरुणाने गमावला पाय; २० हजार रुपयेही पळवले
6
Pahalgam Attack: ते दहशतवादी पाकिस्तानी असल्याचे लष्कराने म्हटले नाही; संरक्षण मंत्रालयाचा खुलासा
7
१२,००० सॅमसंग स्मार्टफोनने भरलेला ट्रक चोरीला गेला; चोरट्यांनी ९१ कोटींच्या वस्तू लंपास केल्या
8
IND vs ENG : एक मालिका अन् दोन मालिकावीर! गंभीरमुळं गिलसोबत हॅरी ब्रूकला मिळाला हा पुरस्कार
9
अमित शाह मोडणार देशाच्या गृहमंत्र्यांचा रेकॉर्ड! जम्मू काश्मीरबद्दल सरकार घेणार आणखी एक मोठा निर्णय?
10
मारहाण, शिवीगाळ असं काहीच घडलं नाही; पुणे पोलिसांनी मुलींचे सगळेच आरोप फेटाळले
11
'भारत आगीशी खेळत आहे'; डोनाल्ड ट्रम्प, एस. जयशंकर यांच्याबद्दल खोटी विधाने केली पोस्ट, 'एक्स'ने खातीच केली बंद
12
iPhone 16: पहिल्यांदाच आयफोन १६ च्या खरेदीवर एवढी मोठी सूट!
13
भारत रशियाला युक्रेनविरुद्ध युद्धासाठी अप्रत्यक्षपणे निधी पुरवतोय, अमेरिकेचा आरोप!
14
येमेनमध्ये निमिषा प्रियाच्या अडचणी वाढल्या! मृताच्या भावाने पत्र लिहून केली मोठी मागणी
15
Siraj, IND vs ENG: 'तो' एक शब्द अन् सिराजने फिरवला अख्खा सामना... टीम इंडियाच्या विजयानंतर उघड केलं गुपित
16
आपच्या सत्येंद्र जैन यांना दिलासा, CBIच्या क्लोजर रिपोर्टवर कोर्टाचं शिक्कामोर्तब
17
माझा 'तो' व्हिडीओ रोहित पवारांना कुणी पाठवला? मंत्री मेघना बोर्डीकर म्हणाल्या...
18
राज ठाकरेंच्या 'मराठी'नंतर नितीश कुमारांची 'बिहारी' घोषणा; शिक्षक भरतीत नोकरी बिहारींनाच मिळणार
19
Siraj, IND vs ENG: ‘पूरा खोल दिए पाशा...’; सिराजच्या 'मॅचविनिंग' गोलंदाजीवर ओवेसींची हैदराबादी शैलीत स्तुती
20
कमाल झाली राव! रशियन महिलेने सांगितली भारतीय पुरुषाशी लग्न करण्याची खास कारणं, जिंकलं मन

जो नियम मोडतो, त्याला यम गाठतो; यम-नियमांचे महत्त्व जाणून घ्या!

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 20, 2021 09:15 IST

ज्याप्रमाणे सामाजिक नियम पाळणे महत्त्वाचे आहेत, त्याप्रमाणे वैयक्तिक आयुष्याबाबतही काही नियम पाळणे गरजेचे आहे.

'नियम हे मोडण्यासाठीच असतात' असे काही जण अभिमानाने सांगतात. परंतु तसे नसते, किंबहुना तसे नसायला हवे. नियम अर्थात सामाजिक चौकट, जी सर्वांच्या हिताचा विचार करून आखली जाते. ती चौकट मोडण्यात कोणाचे हित आहे? सिग्नल लागल्यावर गाडी थांबवावी हा साधा नियम आहे, पण तो उल्लंघून गेल्यामुळे अपघात होतात. 

आपल्या देशात नियम मोडणारी मंडळी परदेशात शिक्षेच्या भीतीने नियमांचे काटेकोरपणे पालन करतात. अगदी रात्री-बेरात्रीसुद्धा सिग्नल लागल्यावर, रस्त्यावर कोणी असो वा नसो, त्यांना गाडी थांबवावीच लागते. अन्यथा नियमांचे उल्लंघन केल्याबद्दल त्यांना संगणकीय यंत्रणेने दंड आकारला जातो. म्हणून तिथे कोणीही थुंकणे, कचरा टाकणे, वाटेल त्या दिशेने, वाटेल तेवढ्या वेगाने गाडी नेणे, पार्विंâग करणे इ. गैरप्रकार करत नाहीत. 

याउलट आपल्या देशात पदोपदी नियमांना केराची टोपली दाखवली जाते. या सवयींमुळे आपण स्वत:चे आणि समाजाचे नुकसान करत आहोत, ही बाब आपल्याला लक्षात येत नाही. आपण जसे वगतो, त्याचे अनुकरण पुढची पिढी करत असते. 'फेरारी की सवारी' चित्रपटात वडील आपल्या मुलाबाबतीत म्हणतात, 'जो देखेगा वही सिखेगा!' त्यामुळे मुले बिघडतात म्हणण्यापेक्षा त्यांच्या गैरवर्तनाला आपण तर जबाबदार नाही ना, याची पालकांनी अवश्य खात्री करून घ्यावी. 

ज्याप्रमाणे सामाजिक नियम पाळणे महत्त्वाचे आहेत, त्याप्रमाणे वैयक्तिक आयुष्याबाबतही काही नियम पाळणे गरजेचे आहे. सामाजिक नियम आपल्याला माहित आहेच, वैयक्तिक उन्नतीसाठी कोणते नियम महत्त्वाचे आहेत, ते जाणून घेऊ...

सत्य - सत्याचरण करणे.अहिंसा - काया, वाचा, मनाने कोणालाही न दुखवणे.अस्तेय - कोणालाही न फसवणे.ब्रह्मचर्य - विषयांचे परिमित सेवन करत त्यातून ईश्वरसेवा साधणे.अपरिग्रह - अनावश्यक साठा न करणे. अनावश्यक चिंतन न करणे.शौच - काया, वाचा, मनाने शुद्धतेचे आचरण करणे.संतोष - प्रारब्धानुसार प्राप्त होणाऱ्या भोगांमध्ये समाधान मानणे.तप - जीवनभर दुसऱ्यांना आनंद देण्यासाठी, उद्धारासाठी झटणे. स्वाध्याय - शुद्ध ज्ञान, भक्ती जागवणारे ग्रंथ वाचणे, त्यानुसार आचरण करणे.ईश्वरप्रणिधान - परमेश्वराच्या इच्छेने सर्व चालू आहे याची जाणिव ठेवणे आणि परमेश्वराच्या चिंतनातच राहणे.

या गोष्टींचे आचरण केले असता, नियमांचे उल्लंघन होत नाही आणि यम जवळ येत नाही.