शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

घर असो नाहीतर नोकरी, आपल्या कामाची दखल कोणी घेत नसेल, तर 'हा' उपाय करा!

By ज्योत्स्ना गाडगीळ | Updated: April 19, 2021 15:57 IST

आपली किंमत आपण ओळखली पाहिजे. कुठे हो म्हणावे आणि कुठे नाही, याबाबत आपली भूमिका ठाम नसेल, तर आयुष्यात आपली योग्य किंमत कुठेच होणार नाही.

आपल्या कामाची दखल घेतली जावी, आपल्याही वाट्याला प्रशंसा यावी, आपल्यालादेखील पगारात बढती मिळावी, असे प्रत्येकाचे स्वप्न असते. केवळ नोकरीच काय, तर आपल्या घरापासून, समाजापर्यंत सर्वत्र आपली हीच माफक अपेक्षा असते.परंतु, दरवेळी आपल्याला डावलले जात असेल, दुर्लक्ष केले जात असेल, चूकांवर बोट ठेवले जात असेल, तर परिणामी आपल्या कामाची प्रत खालावते आणि नुकसान आपलेच होते. अशा परिस्थितीवर उपाय काय, तो जाणुन घेऊया.

एकाा कंपनीत एक जुने कर्मचारी निवृत्त होत असतात. त्यांच्या निवृत्तीसमारंभात त्यांना मिळालेला मानसन्मान पाहून एक तरुण अभियंता मोहरून जातो. आपल्या निवृत्तीच्या वेळी आपल्यालाही असा सोहळा अनुभवता येईल का, असे स्वप्न पाहतो. तेव्हा निवृत्त कर्मचारी उपस्थित कर्मचाऱ्यांना अनुभवाचे बोल सांगताना म्हणतात, 'कामात विश्रांतीदेखील महत्त्वाची आहे. तरच कामात आत्मपरीक्षणाला आणि सुधारणेला वाव मिळेल. दुसरी गोष्ट म्हणजे सर्व बाबतीत समतोल राखता आला पाहिजे. तरुण अभियंता त्यांचे शब्द मनावर घेतो आणि कधीही सुटी न घेणारा तो, एक दिवस अचानक सुटी घेतो. सुटीच्या दुसऱ्या दिवशी कामावर येतो, तर त्याचे वरिष्ठ त्याला बोलावून घेतात आणि त्याच्या अनुपस्थितीत कंपनीत किती घोळ झाले हे सांगतात. तो जबाबदारीने सगळ्या गोष्टी निस्तरतो. कंपनीला त्याचा हेवा वाटतो. त्याची किंमत कळते आणि किंमत वाढते. बढती होते. अभियंता आनंदून जातो. हा पर्याय कामी आला असे समजून वरचेवर सुटी घेऊ लागतो. त्याच्यावाचून काम अडत असल्याचे पाहून कंपनी त्याला नोकरीतून काढून टाकते. अभियंत्याला पश्चात्ताप होतो आणि तो निवृत्त कर्मचाऱ्याची भेट घेतो आणि आपली काय चूक झाली विचारतो. 

यावर निवृत्त कर्मचारी मार्मिक उत्तर देतात, `रोज प्रकाश देणाऱ्या दिव्याची किंमत तो एखादवेळेस बंद पडला की कळते. परंतु तो दीवा वारंवार बंद पडत असेल, तर तो काढून नवीन लावणे, हेच लोकांना सोयीचे ठरेल. तू तुझी विंâमत, तुझे अस्तित्त्व दाखवून दिलेस. परंतु मी दुसरी गोष्ट सांगितली, ती म्हणजे समतोल राखणे, ती मात्र तू केली नाहीस. म्हणून आपली किंमत आपण ओळखली पाहिजे. इतरांसाठी दरवेळी हाकेसरशी मदतीला न धावता आपली  किंमत दाखवून दिली पाहिजे. परंतु, कुठे हो म्हणावे आणि कुठे नाही, याबाबत आपली भूमिका ठाम नसेल, तर आयुष्यात आपली योग्य किंमत कुठेच होणार नाही. ते जेव्हा साध्य होईल, तेव्हा आपल्याला यशाची शीडी आपोआप चढता येईल.

हा कानमंत्र लक्षात घेऊन आपणही आपली किंमत ओळखूया आणि इतरांना आपल्या अस्तित्त्वाचे मोल दाखवून देऊया. अर्थात, योग्य समतोल साधत!