शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
4
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
5
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
6
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
7
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
8
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
9
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
10
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
11
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
12
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
13
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
14
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
15
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
16
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
17
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
18
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
19
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
20
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
Daily Top 2Weekly Top 5

जेव्हा सगळे मार्ग बंद झाले असे वाटेल, तेव्हा 'हा' मार्ग निवडा!

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 28, 2021 18:15 IST

स्वत:च्या प्रयत्नांवर विश्वास आणि देवावर अतूट श्रद्धा ठेवा. सगळे दिवस सारखे नसतात. प्रत्येक अडचणींतून मार्ग निघतोच. तो मिळेपर्यंत श्रद्धा आणि सबुरी हाच मार्ग निवडावा लागतो.

आयुष्यात जेव्हा अडचणीतून बाहेर पडण्याचे सगळे मार्ग बंद झाले असे वाटेल, तेव्हा क्षणभर थांबा, विचार करा कारण एक तरी मार्ग तुम्हाला नव्या वाटेकडे निश्चितच घेऊन जाईल. अशा वेळी गरज असते, ती श्रद्धा आणि सबुरीची!

स्वत:ला सिद्ध करण्यासाठी घर दार सोडून बाहेर पडलेला एक मुलगा कामाच्या शोधात गावोगावी फिरत होता. परंतु काम तर दूरच, त्याची दोन वेळेच्या जेवणाचीही अडचण होऊ लागली. वाटेत त्याला एक साधू भेटले. तो त्यांना म्हणाला, `मला मार्ग दाखवा.'साधू म्हणाले, `तुझा मार्ग तुला स्वत:लाच शोधावा लागेल आणि शोधलास तर तुला तो नक्की सापडेल.'मुलगा म्हणाला, `पण महाराज, इतके दिवस मी तेच करत होतो. आता मात्र मी हरलो.'साधू म्हणाले, `ज्या वेळेस आपण स्वत:च हरलो असे मान्य करतो, तेव्हा जिंकायची दारे आपण स्वत:हून बंद करत असतो. तुला अडचणींवर मात करत स्वत:चा मार्ग धुंडाळावा लागेल. त्यासाठी श्रद्धा आणि सबुरी ठेव.'

मुलाने साधू महाराजांना नमस्कार केला आणि तो कामाच्या शोधार्थ भटकू लागला. त्याने मनाशी ठरवून टाकले, काहीही झाले तरी काम करायचे, पण फुकटचे मागून जगायचे नाही. भीक तर अजिबात मागायची नाही.

मुलाच्या या निश्चयामुळे त्याची पडेल ते काम करण्याची मनाची तयारी झाली होती. त्यामुळे विविध प्रकारच्या संधीदेखील त्याच्यासमोर उपलब्ध होऊ लागल्या. फक्त त्याला संधी ओळखण्याची गरज होती. 

त्याला खूप भूक लागली होती. तो एका वडापावच्या गाडीसमोर जाऊन थांबला. खिशात पैसे नव्हते पण पोटात भूक होती. गाडीमालकाने त्याला दया दाखवत वडापाव दिला, पण त्याने तो नाकारला. तो म्हणाला, `काही काम असेल तर मी ते करायला तयार आहे. माझ्या कामाच्या मोबदल्यात मला खायला द्या, पण फुकट नको.'

त्याची प्रामाणिकता पाहून मालकाने त्याला कामाला ठेवून घेतले. तो मन लावून मेहनत करू लागला आणि दिवस रात्र एक करून कमाई करू लागला. व्यवसायात मदतनीस म्हणून काम करता करता त्याने व्यवसायातील बारकावे शिकून घेतले आणि पैशांची जुळवाजुळव करत स्वत:ची वडापावची गाडी टाकली. पाहता पाहता त्याचे प्रस्थ एवढे वाढले की अनेक शहरांतून त्याच्या वडापाव ब्रँडच्या शाखा सुरू झाल्या. एक दिवस त्या मुलाची आणि साधू महाराजांची पुनश्च गाठ पडली. तेव्हा मुलाने त्यांना ओळख दिली, त्यावर महाराज म्हणाले, 'तू स्वत:वर विश्वास ठेवलास म्हणून अडचणीतून मार्ग शोधलास, तू तेव्हाच हार पत्करली असतीस, तर तू कधीच या जगाला निरोप दिला असतास.'

म्हणून स्वत:च्या प्रयत्नांवर विश्वास आणि देवावर अतूट श्रद्धा ठेवा. सगळे दिवस सारखे नसतात. प्रत्येक अडचणींतून मार्ग निघतोच. तो मिळेपर्यंत श्रद्धा आणि सबुरी हाच मार्ग निवडावा लागतो.