शहरं
Join us  
Trending Stories
1
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
2
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
3
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
4
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
5
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
6
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
7
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
8
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
9
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
10
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
11
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
12
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
13
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
14
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
15
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
16
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
17
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
18
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
19
जम्मू-काश्मीरच्या कठुआ जिल्ह्यात दिसले 4 संशयित, सुरक्षा दलांनी सुरू केली शोध मोहीम...
20
ज्याच्यासाठी लिंग परिवर्तन केलं, त्याचं दुसऱ्यावरच प्रेम जडलं...! सनीची मारिया बनलेली किन्नर पोहोचली पोलीस ठाण्यात, अन् मग...

देवाधिदेव महादेवांचा आवडता मंत्र कोणता? त्या मंत्राने होणारे लाभ जाणून घ्या

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 2, 2022 17:23 IST

शिवभक्त महादेवाचे ध्यान करतात, पण महादेव कोणाचे ध्यान करतात आणि कोणता मंत्र जपतात? जाणून घेऊ!

महादेवांची मूर्ती पहा. नेहमी ध्यानस्थ असलेली दिसते. दिवस-रात्र असे ध्यानधारणेत बुडालेले पाहून पार्वती मातेने न राहवून महादेवांना विचारले, ''देवाधिदेव महादेव, सगळे भक्त त्यांच्या आयुष्यातील ताप नष्ट व्हावेत म्हणून तुमची प्रार्थना करतात, मग तुम्ही कोणाचे स्मरण करत असता? कोणत्या नाम: स्मरणात एवढे दंग असता? कोणात एवढे रममाण होता?'

यावर महादेव स्मित करत म्हणाले, `देवी, तुझ्या प्रश्नातच तुझे उत्तर आहे. जो सकल विश्वाला रमवतो, तो राम. त्याचेच मी सदैव नाम घेतो. त्याच्यात रमतो आणि मन एकाग्र करतो.'

पार्वती मातेने पुढचा प्रश्न विचारला, `परंतु, भगवंत तुम्ही तिघेही समान शक्तीचे आहात, तुम्हाला नाम:स्मरणाची काय गरज?' 

त्यावेळी महादेवांनी पार्वती मातेला समुद्र मंथनाची कथा सांगितली. ते म्हणाले, `देवी, समुद्र मंथनाचे वेळी देव आणि दानवांमध्ये नुसती चढाओढ लागली होती. अस्र, शस्र, रत्न, हिरे, माणिक, मोती, कामधेनू, कल्पतरू, चिंतामणी आणि अमृतसुद्धा! ते मिळवण्यासाठी सगळे धडपडत होते. असूरांच्या हाती अमृतकलश लागू नये, म्हणून भगवान महाविष्णूंनी मोहिनी अवतार घेऊन केवळ देवांना अमृतप्राशन करवले, हे तुम्हाला माहित आहेच. परंतु, अमृत मिळवण्याची चढाओढ संपल्यावर सर्वात शेवटी समुद्रमंथनातून हलाहल अर्थात विष निघाले. ते घेण्यासाठी कोणीच पुढाकार घेईना. 

विष पृथ्वीवर सांडले असते, तर विश्व संपले असते. कोणीतरी पुढाकार घेणे गरजेचे होते. मात्र, कोणीच पुढे जात नाही पाहून, विश्वकल्याणार्थ ते हलाहल प्राशन करण्यासाठी मी पुढे सरसावलो. कारण, ब्रह्ना, विष्णू आणि मी आम्ही तिघांनी वाटून घेतलेल्या कामानुसार ब्रह्माने सृष्टी निर्मिती करायची, विष्णुंनी पालन पोषण करायचे आणि मी दुष्ट वृत्तीचा नायनाट करायचा. त्यामुळे जगावर आलेले संकट दूर करणे माझे कर्तव्यच होते. मी तो विषप्याला ओठाला लावला आणि घटाघटा ते विष कुठेही सांडू न देता प्राशन केले. विष प्यायल्याने माझा गळा काळा-निळा पडला, त्यावरून मला नीलकंठ अशी ओळख मिळाली. परंतु, जसससे विष अंगात भिनू लागले, तसतसा माझ्या अंगाचा दाह होऊ लागला. 

सर्वांगाला भस्म लावले, गळ्याभोवती सर्प गुंडाळलेस, सर्वांची तहान भागवणारी गंगा मस्तकावर धारण केली, शीतल चंद्रमा भाळी लावला. एवढे नानाविध पर्याय निवडूनही अंगाचा दाह शांत झाला नाही, त्यावेळेस महर्षी नारदांनी राम नामाचा उतारा सांगितला. त्यांच्या सांगण्यानुसार राम नाम सुरू केले आणि काही काळातच मी पूर्णपणे बरा झालो. तेव्हापासून मला राम नामाची गोडीच लागली. या राम नामाने अनेक जण या भवसागरातून तरून गेले आहेत. रामनाम आध्यात्मिक तहान-भूक भागवणारे आहे, म्हणून माझाच अंश असलेले हनुमंत, यांनी भगवान विष्णुंच्या राम अवतारात मारुतीचे रूप घेऊन अखंड रामनामाचा वसा घेतला.'

तेव्हापासून ते श्रीराम जय राम जय जय राम या त्रयोदक्षरी मंत्राचा जप करतात. भगवान महादेवांनी दिलेल्या स्पष्टीकरणानुसार रामनामाने त्यांच्या अंगाचा दाह शांत केला. मग विचार करा, आपणही रोजच्या रोज अपमानाचे, अन्यायाचे, अत्याचाराचे विष प्याले पित असतो, त्यामुळे आपल्या शरीराचा दाह होत असतो. तर आपणही राम नाम घेतले, तर आयुष्यात येणाऱ्या कठोर, कडवट विषसमान प्यालांना अमृतस्वरूप नक्कीच प्राप्त होऊ शकेल.

जय श्री राम!