शहरं
Join us  
Trending Stories
1
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
2
मोठी बातमी: सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात पोलिसांवर नव्हे, अज्ञातांवर खुनाचा गुन्हा
3
राज्यात दोन-तीन भागात गुन्हेगारी वाढतेय, त्यात पुणे येतं; याला जबाबदार कोण? - सुप्रिया सुळे
4
राजा रघुवंशीच्या भावाच्या पत्नीने केला सनसनाटी दावा, म्हणाली, "माझ्या मुलाचा बाप…’’
5
Viral Video: नाशकात दुचाकीवरून आलेल्या सोनसाखळी चोराला महिलेनं दाखवला इंगा!
6
IND vs ENG ...तर भारतीय गोलंदाजाला ठोसा मारला असता; आकाशदीपसंदर्भात काय म्हणाला पाँटिंग?
7
"...तर तुम्हालाही अटक होईल"; राज ठाकरेंनी दिलेल्या आव्हानावर CM फडणवीस स्पष्टच बोलले
8
संजय बांगरची 'ट्रान्सजेंडर' मुलगी अनाया बांगर हिची धडाकेबाज फटकेबाजी, पाहा फलंदाजीचा VIDEO
9
जागे राहा, सतर्क राहा, महाराष्ट्र विकला जाऊ देऊ नका; मनसे प्रमुख राज ठाकरेंचं जनतेला आवाहन
10
"शाहरुखपेक्षा विकी कौशलने सॅम बहादूरमध्ये चांगलं काम केलं होतं", राष्ट्रीय पुरस्कारावर लेखिकेची पोस्ट
11
Yavat Violence: "बाहेरून आलेले लोक तिथे..." यवत हिंसाचाऱ्याच्या घटनेवर सुप्रिया सुळेंची प्रतिक्रिया
12
SIP चे दिवस गेले? आता लाँच होणार SIF; 'या' कंपनीला SEBI कडून मिळाली मंजुरी
13
Ritual: एखाद्या व्यक्तीच्या निधनानंतर घरात तीन दिवस का केला जात नाही स्वयंपाक? वाचा शास्त्र!
14
झुनझुनवालांनी 'या' कंपनीचे सर्व शेअर्स विकले, ३ वर्षात १११% रिटर्न; Zerodha च्या निखिल कामथांचीही आहे गुंतवणूक
15
"१५-२० वर्ष इथे राहूनही मराठी येत नसेल तर लाज वाटली पाहिजे...", श्रुती मराठे स्षष्टच बोलली
16
'ही' आहे अखेरची तारीख; इन्कम टॅक्स रिटर्न फाईल केलं नाही तर लागेल मोठा दंड, पाहा डिटेल्स
17
"...अन् कुंदन डोळे उघडतो", 'रांझणा'चा AI व्हिडिओ पाहिलात का? थिएटरमध्ये शिट्ट्यांचा कडकडाट
18
ब्रह्मोस क्षेपणास्त्र मिळाल्याने चीनचा 'हा' शत्रू झाला खूश! करतोय अमेरिकेला धक्का देण्याची तयारी
19
कोकणातील प्रसिद्ध Red Soil Stories युट्युब चॅनेलच्या शिरीष गवस यांचं आकस्मिक निधन 
20
मानवी हाडे, लाल ब्लाऊजचा तुकडा अन् ATM कार्ड...; जमिनीत गाडलेल्या शेकडो मृतदेहाचे रहस्य उलगडणार

समाधी अवस्था म्हणजे काय?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 9, 2020 16:33 IST

जेव्हा कुणी भौतिक मर्यादा पार करतात आणि “जे नाही” त्याची चव चाखली असेल, सद्गुरु सांगतात, त्याला समाधी असे म्हणतात.

सद्गुरु: ब्रम्हांडाची निर्मिती “जे आहे ते” आणि “जे नाही ते” या दोन्हींयापासून झाली आहे. “ते जे आहे” त्याला एक रूप, आकार, गुण, सौंदर्य आहे. “जे नाही ते” याला यापैकी कोणत्याच गोष्टी नाहीत, पण ते मुक्त आहे. इथे आणि तिथे, “जे नाही ते” “जे आहे” त्यामध्ये फुलते. आणि “जे आहे ते” जसजसे सजग होत जाते, तसतसे त्याला “जे नाही ते” व्हायची ओढ लागते. जरी साकार स्वरुपाचे आपण रूप, गुण आणि सौन्दर्य उपभोगत असू, तरी देखील, आपल्या अस्तित्वाच्या संपूर्ण मुक्त स्वरूपात जाण्याची ओढ अपरिहार्य आणि अटळ आहे. हे फक्त काळ, काळाचे आणि अवकाशाचे बंधन “जे आहे” त्याचा आभास आहे.” “जे नाही ते” त्याला काळ अथवा अवकाशाचे आकलन नाही कारण ते अमर्याद आणि अनंत आहे, काळाच्या आणि अवकाशाच्या मर्यादांच्या बंधनात ते अडकलेले नाही.

जेव्हा अस्तित्वाच्या मूलभूत प्रक्रियेपासून मुक्ती मिळवण्याची ओढ वाढत जाते, तेव्हा मन आणि भावनेचे भीतीदायक स्वरूप त्याकडे फक्त स्वतःचा नाश याच धारणेने पाहू लागते. एका विचारशील मनासाठी, आध्यात्मिक प्रक्रिया म्हणजे दुसरे तिसरे काही नसून स्वेच्छेने केलेली आत्महत्याच आहे. पण ही आत्महत्या नाही – ते त्याहून अधिक काहीतरी अतिशय वेगळे आहे. आत्महत्या हा स्वतःचे जीवन संपवण्याचा एक अतिशय तुच्छ मार्ग आहे. मी त्याला तुच्छ मार्ग असे म्हणतो कारण तो नेहेमी अपयशी ठरतो. त्याचा काहीही उपयोग होत नाही. पण या संस्कृतीत, असे लोक आहेत जे खरोखरच त्याचा उपयोग होईल अशा पद्धतीने ते करण्यात तज्ञ आहेत – ही एक आध्यात्मिक प्रक्रिया आहे.समाधीचा अर्थभारतात, “समाधी” हा शब्द सामान्यतः कबर किंवा थडगे या अर्थाने वापरला जातो. जेंव्हा एखाद्या व्यक्तीला त्या ठिकाणी पुरले जाते आणि त्यावर एखाद्या प्रकारचे स्मारक उभारले जाते, तेव्हा त्याला समाधी असे म्हटले जाते. पण “समाधी” हा शब्द एखादी व्यक्ती प्राप्त करू शकत असलेल्या मानवी चेतनेच्या सर्वोच्च स्थिती सुद्धा दर्शवितो.जेंव्हा एखाद्याचा मृत्यू होतो आणि त्यांना पुरले जाते, त्या जागेला त्या व्यक्तीचे नाव देण्यात येते. पण जेंव्हा एखादी व्यक्ती एका विशिष्ट ठिकाणी मानवी चेतनेच्या विशिष्ट स्थितीत पोहोचते, तेव्हा त्या जागेचे नाव त्या व्यक्तीला दिले जाते. म्हणूनच तुम्हाला असे आढळून येईल की अनेक योगींना एखाद्या जागेचे नाव दिलेले आहे. श्री पाळनी स्वामींना त्यांचे नाव असेच मिळाले, कारण ते पाळनी या ठिकाणी समाधी अवस्थेत बसले होते. लोकं त्यांना पाळनी स्वामी असे म्हणत असत कारण त्यांनी कोणालाही स्वतःची खरी ओळख सांगितली नव्हती. त्यांचे नाव काय होते हे त्यांनी कोणालाही सांगितले नाही कारण त्यांनी कोणतेच नाव धारण केले नव्हते. त्यांनी त्या ठिकाणी समाधी घेतली म्हणून लोक त्यांना पाळनी स्वामी म्हणू लागली. अनेक योगी आणि ऋषींची अशी नावे आहेत.

“समाधी” हा शब्द सम आणि धी या शब्दांपासून उगम पावला आहे. सम म्हणजे समानता, धी म्हणजे बुद्धी. तुम्ही जर बुद्धीच्या समभाव अवस्थेत पोहोचलात तर त्याला समाधी म्हणून ओळखले जाते. जेव्हा तुमची बुद्धी कार्यरत असते, तेंव्हा तुम्हाला एका गोष्टीची तुलना दुसर्‍या गोष्टीबरोबर करता येते. म्हणजेच गोष्टींमध्ये भेदाभेद करता येतो. ही एक वस्तु आणि ती आणखी एक वेगळी वस्तु ही तुलना केवळ बुद्धि कार्यरत असल्यानेच शक्य आहे. ज्या क्षणी तुम्ही बुद्धिची ही मर्यादा ओलांडता, तेंव्हा हा भेदाभेद अस्तित्वात राहात नाही. सर्वकाही एकसंध, पूर्णत्व होऊन जाते – जे वास्तविक सत्य आहे. ह्या अवस्थेत काळ आणि अवकाश अस्तित्वात नसतो. एखादी व्यक्ती तीन दिवस समाधीत आहे असे तुम्हाला कदाचित वाटू शकेल, पण त्या व्यक्तीसाठी ते फक्त काही क्षण असतील – ते असेच निघून जातात. त्याने काय आहे आणि काय नाही हे द्वैत पार केलेले असते. त्याने भौतिक मर्यादा पार करून “जे नाही आहे” त्याची चव चाखलेली असते – ते, ज्याला कोणतेही रूप, आकार, गुण, स्वरूप – काहीही नाही.

संपूर्ण अस्तित्व, सृष्टी अनेक, अफाट रुपे केवळ बुद्धी असेपर्यंतच हजर असतात. ज्या क्षणी तुम्ही तुमची बुद्धी विरघळून टाकता, तेव्हा सर्वकाही विरून एक होतं.