शहरं
Join us  
Trending Stories
1
कष्टकऱ्यांचा आधारवड काेसळला: डाॅ. बाबा आढाव यांचे निधन, वयाच्या ९५ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
2
"ठाकरे ब्रँड एकच होता, सध्या राज ठाकरेंचा वापर करून..."; CM देवेंद्र फडणवीसांचे रोखठोक मत
3
IndiGoला मोठा दणका! CEO, COO, बड्या अधिकाऱ्यांना DGCA कडून समन्स, उद्या सकाळी चौकशी
4
“धर्मवीर ३ ची स्क्रिप्ट मलाच लिहावी लागेल, आनंद दिघे...”; एकनाथ शिंदेंनी सांगितले ‘राज’कारण
5
बाबरी मशिदीचे भूमिपूजन करणाऱ्या हुमायूं कबीर यांचा मोठा 'यू-टर्न'; आता काय म्हणाले?
6
1 रुपये 34 पैशांच्या शेअरची कमाल, ₹90 वर गेला भाव, खरेदीसाठी लोकांची झुंबड; आता कंपनीनं केली मोठी घोषणा!
7
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? युतीच्या चर्चांवर जयंत पाटलांकडून मौन; म्हणाले, "याचं उत्तर शोधणार नाही"
8
गोवा अग्निकांडाचे आरोपी इंडिगोच्या फ्लाईटने फुकेतला पसार; पोलीस पोहोचण्याआधीच काढला पळ
9
“...तर २०२९ मध्ये महायुतीच्या हातातून सत्ता जाऊ शकते, मराठे सोपे नाहीत”: मनोज जरांगे पाटील
10
जपानच्या उत्तर किनाऱ्यावर ७.२ रिश्टर स्केलचा तीव्र भूकंप; ३ मीटर उंचीच्या त्सुनामीचा इशारा
11
"कोण बसवणार आहे मला? काय बोलताय"; 'वंदे मातरम्'वर बोलत असताना राजनाथ सिंह प्रचंड भडकले
12
'क्वीन इज बॅक'..! कणखर मानसिकतेची 'रन'रागिणी! स्मृती मानधना पुन्हा मैदानात उतरण्याच्या तयारीत
13
“मंत्री येणार म्हणून फक्त देखावा नको, ३६५ दिवस प्रवाशांना सेवा द्या”: मंत्री प्रताप सरनाईक
14
लग्न करताच 'या' कपलला मिळतात 2.5 लाख रुपये, 90% लोकांना ही योजनाच माहीत नाही!
15
VIDEO: नववधूला सरप्राईज! शेजारी बसलेला नवरदेव अचानक उठला अन् सुरु केला भन्नाट डान्स
16
भाजपाच्या मित्रपक्षातील नेत्याचे बाबरी मशि‍दीला समर्थन; म्हणाले, “मुस्लीम समजाला अधिकार...”
17
"जेवढ्या दिवसांपासून मोदी PM आहेत, जवळपास तेवढे दिवस नेहरू जेलमध्ये होते"; 'वंदे मातरम'वरील चर्चेदरम्यान प्रियांका गांधींचा निशाणा
18
निवृत्तीसाठी कोणता फंड सर्वोत्तम? EPF, PPF की NPS? कोणासाठी कोणती योजना चांगली? वाचा तज्ज्ञांचा सल्ला
19
क्रिकेट चाहत्यांना धक्का! पुढील वर्षीचा टी२० वर्ल्ड कप मोबाईलवर दिसणार नाही? जिओस्टारने घेतली माघार
20
२०२५ च्या शेवटी भारतीय गुगलवर का सर्च करताहेत ५२०१३१४? अर्थ समजल्यावर तुम्हीही व्हाल हैराण
Daily Top 2Weekly Top 5

अष्टसात्त्विक भाव कशाला म्हणतात? ते कसे जागृत होतात व त्यामुळे काय बदल घडतात? वाचा!

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 4, 2025 07:05 IST

अध्यात्म मार्गावर चालणारी व्यक्ति ईश्वराशी रममाण होते त्यावेळी हे भाव जागृत होतात असे म्हटले जाते, पण ते कसे ओळखावे हे जाणून घ्या.

अध्यात्म मार्गावर चालणार्‍या व्यक्तीचे भाव सात्विक होत जातात. व्यक्ति अंतर्बाह्य बदलते. तिचे आध्यात्मिक तेज दिसू लागते, जाणवू लागते. अशा परमार्थिक मार्गावर पुढे जात असताना एक क्षण असा येतो जेव्हा भक्त भगवंत एकरूप होतात. त्यावेळेस भक्ताचे अष्टसात्त्विक भाव जागृत असे म्हणतात. पण ते ओळखायचे कसे, याबाबतीत सोशल माध्यमावर व्हायरल झालेला हा महितीपूर्ण लेख. 

साधारणपणे मुमुक्षु साधनेत किंवा भक्ती करताना त्याच्या अंगावर अष्टसात्विक भाव प्रगट होत असतात. काय असतात ते भाव? भक्त किती वर्ष भक्तिमार्गामध्ये किंवा साधनेत आहे, हे त्याच्या ज्येष्ठतेवरून त्याची भक्तिमार्गातील-प्रगती मोजमाप होत नसून तो कुठल्या स्थितीत आहे यावरून त्याच्यी आध्यात्मिक प्रगती ओळखली जाते.....

प्रथम भाव -  स्वेद 

मंत्र, स्तोत्र, जप करताना, ग्रंथ पठण करताना शरीराला घाम येतो हा प्रथम भाव. असा अनुभव येत असेल तर त्याचा अर्थ त्याची सेवा पूर्वजन्मातील प्रारब्द शुद्ध करण्यात खर्च होते.

दुसरा भाव - कंप 

या भावात पोहोचल्यावर भक्ताच्या शरीराला कंप सुटतो. शरीरात कंप जाणवते.

तिसरा भाव -  रोमांच 

स्वामींचा अगर इतर देवांचा जप करताना पोथी वाचताना अनुभव सांगताना शहारे आले तर सेवेचा तिसरा भाव समजावा.

चतुर्थ भाव -  अश्रू 

सदगुरुंच्या किंवा इष्टदेवतेच्या आठवणीने हृदय भरून आले तर आनंदाश्रू येतात. हा भाव सेवेक-याच्या हृदयाची शुद्धी करतो. अशा सेवेकर्‍यांकडून सदगुरुविषयक किंवा देवतेची स्तुतिपर काव्यनिर्मिती होते. 

खरे म्हणजे या भावात गेल्यावर सेवाकाल वाढवायला हवा. निदान एकाच आसनावर बसून एका तासावर जप करायला हवा. अशी दीड वर्षे साधना केली तर भक्त पंचम भावात प्रवेश करतो.

पंचम भाव – सत्त्वापत्ती 

या भावात प्रवेश केल्यावर अनुसंधान जास्त वेळ टिकते. अंतर्गत ईश्वरीय संकेत मिळतात. सदगुरुमय होऊन जातो. पण सर्वसामान्य माणसे चवथ्या भावापर्यंत या जन्मात पोहोचतात व पुढच्या जन्मात पुढचा आध्यात्मिक प्रवास सुरू होतो.

षष्टभाव - समाप्ती 

या भावात प्रवेश झाल्यावर हळूहळू सुख-दु:ख मान-अपमान, निंदा-स्तुती सर्वसमान वाटू लागतात. अभिमान, अहंकार नष्ट व्हायला सुरुवात होते. सत्गुण वाढू लागतात.

सप्तम भाव -  असंसक्ती 

सातव्या भावात प्रवेश केल्यास देवतांचे दर्शन-साक्षात्कार-संभाषण होतात. षट्चक्रे जागरूक होतात-इतरांचे भूत-भविष्य समजते, बोललेले शब्द सत्य होतात. या भावात गुरू दुर्लक्ष करतात. साधकाला स्वबळावर आपली प्रगती करावी लागते व जन कल्याणाचे कार्य करावे.

अष्टमभाव - प्रलय 

या भावात साधक ईश्वराशी एकरूप होतो. सिद्ध अवस्था प्राप्त होते. पुढील जन्मात पण ते सर्व विभागात काम करून जनकल्याणाचे कार्य करतात .🙏🙏