शहरं
Join us  
Trending Stories
1
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
2
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपटेड? पटापट चेक करा
3
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
4
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
5
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
6
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
7
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
8
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
9
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
10
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
11
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
12
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
13
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
14
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
15
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
16
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
17
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
18
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
19
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
20
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
Daily Top 2Weekly Top 5

षोडशोपचार पूजा हा शब्द आपण वापरतो, पण त्यातले सोळा उपचार कोणते ते माहीत आहे का? वाचा

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 3, 2022 14:44 IST

पुढच्या वेळेस हा शब्द वापरताना आपल्या डोळ्यासमोर हे सर्व सोळा उपचार येतील हे नक्की!

देवाची पूजा करताना गंध, अक्षता, फुले यांचा आपण नेहमीच करतो. प्रासंगिक पूजेच्या वेळी मात्र ताम्हन, पळी पंचपात्र, नैवद्य इत्यादी गोष्टींची भर पडते शिवाय आणखीही उपचारांची जोड दिली जाते, त्याला आपण षोडशोपचारे पूजा केली असे म्हणतो. यातील षोडशोपचार नेमके कोणते, ते जाणून घेऊया. 

या पूजेमध्ये पुढील सोळा उपचार देवास देतात. १. आसन : देवाचे आसन हे आपल्यापेक्षा उंच असते. २. पाद्य : म्हणजे पाय धुण्याकरिता दिलेले पाणी. ते शंखाने किंवा स्वतंत्र देतात. ३. अर्ध्य : पाय धुतल्यानंतर सत्कार करण्यासाठी अर्ध्य दिले जाते. अर्ध्य म्हणजे गंध, अक्षता घालून जलसमर्पण करणे. ४. आचमन : म्हणजे पिण्याकरिता किंवा चूळ भरण्याकरिता देवाला पाणी देणे. ५. स्नान : दूध, दही, तूप, मध आणि साखर या पाच घटकांनी क्रमाने देवतेला स्नान घालणे. त्यालाच पंचामृत स्नान म्हणतात. ६. वस्त्र : देवा वस्त्र अर्पण करतात. ७. गंधलेपन : देवाला गंध, हळद कुंकू, अक्षता लावून लेपन करतात. ८. पुष्प : पत्र म्हणजे फुले आणि पत्री म्हणजे पाने, देवाला आवडणारी फुले, पाने अर्पण करतात. ९. धूप : देवासमोर धूप जाळणे किंवा उदबत्ती लावणे. १०. दीप : सर्व पूजा झाल्यावर देवाला आरती ओवाळणे आणि आरती म्हणणे. 

११. नैवेद्य : पूजा पूर्ण झाल्यावर देवाला फळ, मिठाई किंवा गूळ खोबरे अशा स्वरूपाचा नैवेद्य दाखवणे. १२. तांबूल : जेवण झाल्यावर आपण जसा विडा खातो, तसा देवालाही नैवेद्य झाल्यावर विडा किंवा तांबूल देणे. १३. दक्षिणा : रोजच्या पूजेत दक्षिणा आवश्यक नसते परंतु प्रासंगिक पूजेत दक्षिणा बाजूला काढून ती दान करतात. १४.  प्रदक्षिणा : सर्व उपचार पूर्ण झाल्यावर स्वतः भोवती प्रदक्षिणा मारून भगवंताच्या अस्तित्वाची आपल्या सभोवताली अनुभूती घेणे. १५. नमस्कार : आपल्या हातून झालेली पूजा देवाने स्वीकारावी यासाठी चूक भुलीची माफी मागून देवाला नमस्कार करणे. मंत्रपुष्पांजली म्हणणे. १६. प्रार्थना : वरील सर्व उपचार देवाने मोठ्या मनाने स्वीकारावेत आणि आशीर्वाद द्यावा म्हणून प्रार्थना करणे. 

असे हे सोळा उपचार. पुरुषसूक्तातील एक एक ऋचा म्हणून एक एक उपचार देवाला अर्पण करण्याची पद्धत प्रचलित आहे. पुरुषसुक्तात सोळा ऋचा आहेत. शिवाय पुराणोक्त मंत्र म्हणण्याची पद्धत आहे. मात्र आजच्या काळात ही स्तोत्र पाठ नसल्याने भाविक पाठ असलेले श्लोक म्हणून षोडशोपचारे देवाची पूजा करतात.