शहरं
Join us  
Trending Stories
1
अवघ्या २४ तासांतच फुस्सं झाला पाकिस्तानचा प्लॅन?; २५० मृत्यूनंतर तुर्कीनं इस्रायलला फटकारलं
2
"मुनीर आपले हिरो, आज अल्लाहने..."; अमेरिका-इराण युद्धविरामाचं श्रेय घेण्यासाठी शहबाज शरीफ यांचा आटापिटा
3
वाहनमालकांनो...! उद्यापासून टोल नाक्यावर रोख रक्कम स्वीकारली जाणार नाही! फास्टॅग, युपीआय नसेल तर पुढे जाता येणार नाही...
4
सिलिंडरच्या OTP मुळे वाचला जीव, विहिरीत ३ दिवस मृत्यूशी झुंज; आजोबांसोबत काय घडलं?
5
इराण-अमेरिका बैठकीपूर्वी २ दिवस सुट्टी जाहीर, हॉटेलही केले रिकामे; पाकिस्तानात खास तयारी
6
Latest Marathi News LIVE: इस्रायलच्या हल्ल्यात 203 लोकांचा मृत्यू, १००० पेक्षा जास्त जखमी
7
जगातील अजब देश! या १० देशांकडे स्वतःचे 'सैन्य'च नाही; मग संरक्षणाची जबाबदारी कोणाची?
8
सावधान! स्मार्टफोनमध्ये चुकूनही ठेवू नका 'असे' व्हिडिओ, अन्यथा थेट घरून उचलून नेतील पोलीस
9
फक्त ३ सोप्या स्टेप्समध्ये घरीच तयार करता येईल वर्षभर टिकणारी चटपटीत आमचूर पावडर
10
इराणच्या समुद्रात युद्धाचा भडका! भारत सरकारकडून भारतीयांना इमर्जन्सी अलर्ट; "कुठेही जाण्यापूर्वी आम्हाला सांगा..."
11
युद्धविरामादरम्यान इस्रायलचा लेबनॉनवर हवाई हल्ला; हिजबुल्लाह प्रमुखाचा वैयक्तिक सचिव ठार!
12
‘इराण होर्मुझमध्ये टोल घेणार असेल तर भारतानेही ‘या’ ठिकाणाहून टोल वसूल करावा’, प्रसिद्ध बँकरचा सल्ला   
13
Sanoj Mishra : "जिहादी जेलमध्ये जाणार, महादेव लवकरच माझा वनवास..."; मोनालिसावरुन सनोज मिश्रा आक्रमक
14
ही ५ कारणं ज्यामुळे अमेरिका आणि इराणमधील युद्धविराम तुटणार, तिसरा मुद्दा ठरणार कळीचा
15
विमान प्रवास करताय? चुकूनही घालू नका 'काळे मोजे'; ठरू शकतात धोकादायक, असं आहे कारण
16
Vastu Tips: सावधान! पूर्वजांचे फोटो 'या' दिशेला असतील तर घरात टिकणार नाही पैसा; वेळीच बदल करा!
17
जगात काहीतरी मोठे घडणार? छोटासा देश सोन्याच्या मागे लागला; खरेदीचा आकडा बघून RBI लाही चिंता वाटू लागली...
18
युद्धविरामानंतर फ्रान्सच्या नेतृत्वात १५ देश आले एकत्र; होर्मुझवर आखला 'प्लॅन बी', कसली तयारी?
19
IPL 2026: आता 'या' खेळाडूंना मैदानात एन्ट्री नाही, बीसीसीआयचा कठोर निर्णय!
20
स्मार्टफोन्सच्या दुनियेत या कंपनीचा धमाका! ६९९ रुपयांत इअरबड, ३०००० रुपयांत फ्लिप फोन; बाजार उठवला...
Daily Top 2Weekly Top 5

आपण जगासाठी कोणी नसलो, तरी कोणासाठी आपण त्यांचे जग असतो; त्या प्रेमळ स्पर्शापासून दूर तर जात नाहीये ना?

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 10, 2021 08:00 IST

आवडत्या बाप्पानेही विश्व प्रदक्षिणा मारण्याच्या स्पर्धेत आपल्या आई बाबांना प्रदक्षिणा घालून तेच आपले विश्व आहे, हा आदर्श घालून दिला होता.

दमलेल्या बाबांची कहाणी तर घरोघरी ऐकायला मिळते. पण या दमलेल्या बाबांच्या मुलांची कहाणी सुद्धा दिवसेंदिवस दयनीय होत चालली आहे. एकूणच घरातले नातेसंबंध दुरावत चालले आहे. ज्या सुखसोयी मिळवण्यासाठी आपण जीवाचे रान करत आहोत, त्या सुखसोयी मिळूनही उपभोगण्यासाठी आपली माणसे मनाने जवळ नसली, तर त्या सुखाचा उपयोग तरी काय? 

असाच एक दमलेला बाबा कामावरून संध्याकाळी घरी येतो. ट्रेनची गर्दी, भांडणं, मारामारी, ऑफिसमध्ये वरिष्ठांची बॉसगिरी, सहकाऱ्याच्या कुरबुरी अशा सगळ्या परिस्थितीतून दमून भागून घरी पोहोचतो. मुलगा दार उघडतो आणि बाबांना पाहताच घट्ट मिठी मारतो. वैतागलेला बाबा त्याला दूर करतो आणि हात पाय धुवून पलंगावर पाठ टेकवतो. 

जेवून झाल्यावर मुलगा पुन्हा जवळ येतो आणि बाबांना म्हणतो, 'बाबा तुम्ही रोज किती पैसे कमवता?'वडिलांचा शांत झालेला राग पुन्हा उफाळतो. ते त्याच्या अंगावर ओरडून म्हणतात, 'तुला काय करायचे आहे मी किती कमवतो आणि किती नाही ते? तुला काही कमी तर पडू देत नाही ना, मग झालं. मुकाट्याने जाऊन झोप.'मुलगा म्हणतो, 'बाबा मला फक्त एवढं जाणून घ्यायचं होतं, की माझ्या पिगी बँक मध्ये किती पैसे जमा झाले की तुम्हाला नोकरी सोडून घरी आराम करता येईल.'

मुलाच्या शब्दांनी वडिलांच्या काळजात घर केलं. त्यांनी मुलाला हृदयाशी घट्ट धरलं. त्याचवेळेस त्याची आई आणि आजी दारात उभे राहून त्या दोघांकडे भरल्या डोळ्यांनी पाहत होत्या. त्याक्षणी दमलेल्या बाबाला जाणीव झाली, की मुलाला मिठी मारून, बायकोशी प्रेम संवाद साधून, आपल्या आईचा सुरकुतलेला हात हातात घेऊन कितीतरी दिवस लोटले. आपण आपल्या काळजीत अडकलेलो असतो, परंतु माझी काळजी करणारे लोक माझ्यापासून दुरावून चालणार नाही. 

आपण या जगासाठी विशेष कोणी नसलो, तरी कोणासाठी आपण त्यांचे जग असतो, ही जाणीव ठेवून त्या प्रेमळ स्पर्शांना पारखे होऊ नका. तेच आपले जग आहे. म्हणून तर आपल्या आवडत्या बाप्पानेही विश्व प्रदक्षिणा मारण्याच्या स्पर्धेत आपल्या आई बाबांना प्रदक्षिणा घालून तेच आपले विश्व आहे, हा आदर्श घालून दिला होता...!