शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प यांचा भारतावर २५ टक्के टॅरिफ बॉम्ब; १ ऑगस्टपासून लागू होणार आयात शुल्क, दंडही आकारणार
2
भारत-पाक युद्ध तिसऱ्या देशाने थांबवले नाहीच; परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांनी खोडला दावा
3
‘लाडकी बहीण’च्या लाभार्थी महिला कर्मचाऱ्यांवर कारवाई; राज्य सरकारने जारी केले आदेश
4
मालेगाव खटल्याचा निकाल आज; १७ वर्षांनी विशेष NIA कोर्ट निर्णय देणार, संपूर्ण देशाचे लक्ष
5
संघर्षाचा शेवट गोड! तिसऱ्या मजल्यावरून ३९ व्या मजल्यावर; बीडीडीवासीयांचा आनंद गगनात मावेना
6
सर्वांत महाग-शक्तिशाली निसार उपग्रहाचे यशस्वी प्रक्षेपण; पृथ्वीची प्रत्येक इंच जमीन मॅप करणार
7
“मोदी यांच्या आचारसंहिता भंगप्रकरणी कोर्टात जाणार, निवडणूक आयोगाची कारवाईस टाळाटाळ”: चव्हाण
8
कृषी खात्यातील कथित भ्रष्टाचाराची चौकशी करा!; सुरेश धस यांचे मुख्यमंत्र्यांना पुन्हा पत्र
9
डिझेल दर सवलतीमुळे एसटीचे ११.८ कोटी वाचणार; स्पर्धात्मक निविदेमुळे महामंडळाला फायदा
10
देशातील विमानांमध्ये सुरक्षेच्या २६३ त्रुटी! सर्वाधिक एअर इंडिया, तिसऱ्या क्रमांकावर इंडिगो
11
अतिक्रमित जमिनींचा मिळणार मालकी हक्क, ३० लाख कुटुंबांना लाभ; चंद्रशेखर बावनकुळेंची माहिती
12
रशियात ८.८ तीव्रतेचा भूकंप; जपान, अमेरिकेत त्सुनामीसारख्या लाटांचे थैमान; जगात भीतीचे ‘हादरे’
13
एकनाथ शिंदे दिल्लीत, देवेंद्र फडणवीस राज्यपालांच्या भेटीला; महायुतीत काहीतरी मोठं घडतंय? 
14
Ladki Bahin Yojana: लाडक्या बहिणींना जुलै महिन्याचे १५०० रुपये कधी मिळणार? जाणून घ्या
15
'ईश्वराची कृपा आहे' असं म्हणणाऱ्या मोदींना…; राज्यसभेत संजय राऊत काय बोलून गेले?
16
"बळजबरी आणि दबावाने काहीही..."; डोनाल्ड ट्रम्प यांच्या टॅरिफ इशाऱ्याला चीनचे जशास तसे उत्तर
17
सारा तेंडुलकरची मैत्रीण बनली दिल्ली प्रीमियर लीगची स्पोर्ट्स अँकर, कोण आहे 'ती'? जाणून घ्या
18
मोटो जी ८६ पॉवर 5G भारतात लॉन्च, जाणून घ्या खिसियत आणि किंमत!
19
ड्रग्ज पार्टीच्या कारवाईचे व्हिडिओ व्हायरल कोणी केले? रोहिणी खडसे यांचा पोलिसांना सवाल
20
आई-वडिलांस पोटगी देण्यास नकार; मुलाची तुरुंगात रवानगी!

देवाला पाहायचे आहे ? मग आधी गुरुंचा शोध घ्या; वाचा ही छोटीशी बोधकथा!

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 25, 2021 15:51 IST

धीर, संयम, सबुरी अंगात बाणून घेतली, तर योग्य वेळी योग्य गोष्टी नक्कीच आपल्या पदरात पडू शकतील.

'पी हळद हो गोरी' असा आपल्याकडे एक वाकप्रचार आहे. म्हणजेच, आपल्याला कोणतीही गोष्ट विनासायास मिळवण्याची घाई लागलेली असते. मात्र, तसे होत नाही. इंन्स्टंट मॅगी बनवायची म्हटली, तरी दोन मिनीटे थांबण्याचा कालावधी अनिवार्य आहेच. हे कळत असूनसुद्धा आपण बऱ्याचदा संयम गमावून बसतो. अधीर होतो. अधीरता बळावली, की त्याचे पर्यवसान क्रोधात होते आणि क्रोधाचे स्वरूप वाढले, तर आपली बुद्धी भ्रष्ट होते. धीर, संयम, सबुरी अंगात बाणून घेतली, तर योग्य वेळी योग्य गोष्टी नक्कीच आपल्या पदरात पडू शकतील. हेच सांगणारी, छोटीशी बोधकथा!

एक सुशील राजा होता. त्याला एके दिवशी देवाच्या दर्शनाची तीव्र तळमळ लागली. तेव्हा त्याने आपल्या सभेतील पंडितांपैकी प्रत्येकाला, `तुम्ही देव पाहिलात का?' असा प्रश्न विचारला. तेव्हा ज्याअर्थी आपण मोठे पंडित म्हणवून घेतो, त्याअर्थी नाही म्हणणे शोभणार नाही. अशा विचाराने प्रत्येकाने होय असे उत्तर दिले. ते ऐकताच राजा म्हणाला, `तर मग आत्ताच्या आत्ता मला देवाचे दर्शन घडवा.' पंडित म्हणाले, `सहजासहजी देवाचे दर्शन कसे होईल?' त्यासाठी खडतर उपासना करावी लागते. त्यावर राजाने त्यांची निर्भत्सना करून त्यांना हद्दपार केले. 

पुढे तो राजा बाबा, वैरागी जो कोणी भेटेल त्याला हाच प्रश्न करू लागला. परंतु, सर्वांकडून वरीलप्रमाणेच उत्तर मिळाल्यामुळे शेवटी राजा उदास झाला. पुढे एके दिवशी अकस्मात राजसभेत एका साधूचे येणे झाले. राजाने त्यास बसावयास आसन देऊन वरीलप्रमाणे प्रश्न विचारला. तेव्हा साधू म्हणाला, `राजा, तू आधी माझे सांगणे ऐक. त्यावर तुझ्या प्रश्नाचे मी समर्पक उत्तर देईन या गावात जेवढे म्हणून सराफ आहेत, त्या सर्वांना तू सभेत बोलावणे कर.'

ठरल्याप्रमाणे सभा भरली. थोड्यावेळाने साधूने सराफांना आपल्यासमोर रांगेत उभे केले आणि प्रश्न विचारला, `तुम्ही हिऱ्याची परीक्षा जाणता का?' सराफाने होकारार्थी मान डोलावली.

साधू म्हणाला, `मला आत्ताच्या आता ती खुबी शिकवा.'सराफ म्हणाला, `साधू महाराज, ही खुबी शिकायला मला चौदा वर्षे लागली. तेव्हा कुठे आता मी हिऱ्याची पारख करू लागलो आहे. ही विद्या अशी क्षणार्धात आत्मसात होणारी नाही. त्यासाठी सराफाच्या सहवासात काही वर्षे घालवावी लागतात.'

त्यानंतर साधूने प्रत्येक सराफासमोर तोच प्रश्न ठेवला. कोणी दहा, कोणी पंधरा, कोणी वीस वर्षात ही विद्या हस्तगत केली असे सांगितले. एक जण तर म्हणाला, ही विद्या अशी लगेच येणारी असती, तर माझे वडील सराफ असूनही मला त्यांच्याकडून शिकायला बारा वर्षे लागली नसती.

हे सर्व ऐकल्यानंतर साधू राजाला म्हणाला, `राजेंद्रा हे सर्व सराफ काय म्हणतात, ते ऐकलेस का? यांच्या उत्तरात तुझ्याही प्रश्नाचे उत्तर दडले आहे. हिऱ्याची पारख करायला, एवढी वर्षे घालवावी लागतात, तर परमात्म्याला पाहण्याची विद्या एका क्षणात कशी अवगत होईल? त्यासाठी सत्संग केला पाहिले. कारण संत, सद्गुरु हे सराफाप्रमाणे आपल्याला हिऱ्यासारखे घडवतील आणि परमात्म्याला पाहण्याची दृष्टी देतील.