शहरं
Join us  
Trending Stories
1
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
2
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
3
“बारामती पोटनिवडणुकीत पाठिंबा द्या”; सुनेत्रा पवार यांचा उद्धव ठाकरेंना फोन, घडामोडींना वेग
4
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
5
“ती बोलत नाही, बेशुद्ध...”; ७ वर्षांनी मोठ्या लिव्ह-इन पार्टनरची हत्या, २० दिवसांनी सत्य समोर
6
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
7
VIDEO: सूर्याचा 'रहमान डकैत' स्टाईल FA9LA डान्स; Dhurandhar ची क्रेझ क्रिकेटच्या मैदानातही
8
'तू मरून जा, नाही तर तुला मारणार!' आरमोरीत हनी ट्रॅप, ब्लॅकमेलिंग अन् तरुणावर विषप्रयोग, तरुणीसह दोघांवर गुन्हा दाखल 
9
लखनौमध्ये रेल्वे सिग्नल बॉक्स उडवण्याचा मोठा कट उधळला; ISI च्या ४ संशयितांना अटक
10
Video - निसर्गाच्या देणगीला भेसळीचा विळखा; तुम्ही पिताय ते नारळपाणी खरंच 'नॅचरल' आहे का?
11
हजारो भारतीयांसह ३० हजार जणांना कामावरून काढणाऱ्या कंपनीच्या ऑफिसवर इराणने केला हल्ला 
12
रात्रीस खेळ चाले! झोपेतच घात, सौदी दूतावास बेचिराक; इराणचा प्रहार, अमेरिकेने विचारही केला नाही
13
Mithun Chakraborty : "मी पश्चिम बंगालचा बांगलादेश होऊ देणार नाही, ओवैसी रिअल लीडर"; मिथुन चक्रवर्ती यांचं मोठं विधान
14
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांच्यावर हल्ला, बंगालमध्ये काँग्रेस-तृणमूलचे कार्यकर्ते भिडले  
15
संकष्ट चतुर्थी २०२६: संकष्टीला करा राशीनुसार दिलेले उपाय; 'ही' गणेशसेवा पालटून टाकेल तुमचं आयुष्य!
16
IPL 2026: मराठमोळ्या आयुष म्हात्रेबद्दल अंपायरने केली मोठ्ठी चूक! सारेच हैराण; काय घडलं?
17
खळबळजनक!!! २०० किलो बनावट पद्धतीने पिकवलेले आंबे जप्त; श्वसनाच्या आजारांचा होता धोका
18
Gold-Silver Price Fall: खुशखबर! सोनं-चांदी झाली स्वस्त; खरेदी करणाऱ्यांसाठी 'गोल्डन चान्स'
19
दोन लढाऊ विमाने पाडली, २ चॉपर उद्ध्वस्त, पायलट बेपत्ता, २४ तासांत इराणचा अमेरिकेला जबर दणका
20
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
Daily Top 2Weekly Top 5

भूतकाळ विसरायचा आहे? भगवान बुद्धांची शिकवण देणारी ही कथा वाचा!

By ज्योत्स्ना गाडगीळ | Updated: February 2, 2021 09:00 IST

भूतकाळात अडकून राहिलात तर आयुष्यात पुढे कधीच जाऊ शकणार नाही. सदैव दुसऱ्यांना मदत करा आणि केलेल्या मदतीची जाणीवही मनातून पुसून टाका

भविष्याकडे वाटचाल करताना अनेकदा भूतकाळ आडवा येतो. मात्र भूतकाळामुळे भविष्यच नाही, तर वर्तमानाचा विकासही थांबतो. म्हणून शक्य तेवढ्या लवकर भूतकाळातील गोष्टी विसरून वर्तमानकाळावर लक्ष केंद्रित केले पाहिजे. हे सोपे नाही, परंतु अशक्यही नाही. त्यासाठी प्रयत्न करावे लागतील. ते प्रयत्न कसे असायला हवेत, वाचा ही गोष्ट!

भगवान गौतम बुद्ध यांच्या असंख्य शिष्यपरिवारापैकी दोन शिष्य भिक्षा मागण्यासाठी गावात गेले होते. गाव मठापासून दूर होते. पावसाचे दिवस होते. सायंकाळी लवकर काळोख होत होता. अशात आभाळ आले आणि काही क्षणात पावसाला सुरुवात झाली. भिक्षा मिळवली होती, परंतु पाऊस थांबण्याची वाट पाहत बसलो, तर मठात पोहोचायला उशीर झाला असता. 

त्या दोघांपैकी एक भिखू तरुण तर दुसरा थोडा बुजूर्ग होता. दोघांनी पावसात भिजत भिजत पुढे निघायचे ठरवले आणि दोघे चालू लागले. वाटेत एक नदी होती. पावसाच्या पाण्याने नदीच्या पाण्याची पातळी वाढत होती. आणखी पूर येण्याआधी नदी ओलांडलेली बरी, अशा बेताने दोघे जण नदी पार करण्यासाठी कटीबद्ध झाले.

तेवढ्यात काही अंतरावरून एका तरुणीचा आवाज आला. त्या दोघांनी मागे वळून पाहिले, तर एक तरुणी राजकुमारीसारखा पोशाख आणि अलंकार लेवून मदतीसाठी विनवणी करत होती. दोन्ही शिष्यांना अडवून ती त्यांच्याजवळ पोहोचली. तिने राजकुमारी म्हणून आपली ओळख करून दिली आणि शिकारीसाठी आले असताना शिपायांशी ताटातूट झाली, असे तिने सांगितले. नदीच्या पलीकडे आपल्या वडिलांचा राजवाडा आहे आणि ते आपली वाट बघत असतील. कृपया नदी ओलांडण्यासाठी सहाय्य करावे, असे ती सांगू लागली. 

वास्तविक पाहता संन्यस्त जीवन जगणाऱ्या व्यक्तीने परस्त्रीला स्पर्श करू नये, असा नियम होता. परंतु, तिला मदतीची गरज आहे पाहून तरुण भिखूने तिला खांद्यावर घेत नदी पार करून दिली. पाठोपाठ ज्येष्ठ भिखूदेखील चालत आले. 

दोघेजण मठात पोहोचले. तरुण भिखूने परस्त्रीला स्पर्श केला आणि आजवरची शिकवण वाया घालवली, याचा राग ज्येष्ठ भिखूंच्या मनात होता. रागारागात ते जेवले आणि जेवण झाल्यावर त्यांनी भगवान बुद्धांची भेट घेतली. त्यांना घडलेला प्रसंग सांगितला आणि तरुण भिखू शिष्य म्हणून कामाचे नाहीत, हे पटवून दिले. त्यांचे सर्व बोलणे ऐकून भगवानांनी तरुण भिखूला बोलावून घेतले आणि परस्त्रीला स्पर्श केला का, अशी विचारणा केली. त्यावर थोडासा डोक्यावर ताण देत तरुण भिखू म्हणाला, `हो भगवान, मी राजकुमारीला मदत म्हणून खांद्यावर घेतले आणि नदी पार करून तिला तिच्या मार्गाने जाऊ दिले. माझ्या खांद्यावरून राजकुमारी कधीच उतरली, परंतु ज्येष्ठ भिखू अजूनही राजकुमारीला घेऊन इथवर आले आहेत. म्हणजे ओझे कोण वाहतेय ते तुम्हीच ओळखा!'

तरुण भिखुच्या बोलण्यावर मंद स्मित करून भगवान, ज्येष्ठ भिखुला उद्देशून म्हणाले, `परस्त्रीला मदत करण्यासाठी केलेला स्पर्श आणि वासनेने केलेला स्पर्श यात खूप अंतर आहे. तरुण भिखूने मदत केली आणि तो विसरूनही गेला. तुम्ही मनावर ओझे ठेवत त्याची तक्रार केलीत. याचा अर्थ तुम्ही त्या राजकुमारीला प्रत्यक्ष स्पर्श न करताही खांद्यावर घेऊन वावरलात. असे वागण्याची दिक्षा मी दिली नाही. तुम्ही एवढी वर्षे मठात काढूनही जो बोध घेतला नाहीत, तो तरुण भिखूने घेतला. चांगले कार्य करा आणि विसरून जा. भूतकाळात अडकून राहिलात तर आयुष्यात पुढे कधीच जाऊ शकणार नाही. सदैव दुसऱ्यांना मदत करा आणि केलेल्या मदतीची जाणीवही मनातून पुसून टाका. तरच आनंदी आणि समाधानी जीवन जगू शकाल.