शहरं
Join us  
Trending Stories
1
जीएसटीत कपात अन् बँकांत गर्दी...! लोक कार लोन रद्द करू लागले, काय आहे कारण...
2
'या' मुस्लीम देशावर मोठा हल्ला करण्याच्या तयारीत इस्रायल, दिला बंदरं रिकामी करण्याचा अल्टीमेटम!
3
‘भारताने अमेरिकेच्या मध्यस्थीचा प्रस्ताव नाकारला’, पाकिस्तानने केली ट्रम्प यांच्या दाव्याची पोलखोल
4
“सध्याचे वातावरण सरकारला पोषक नाही, पराजयाच्या भीतीने निवडणुका पुढे ढकलल्या”: विजय वडेट्टीवार
5
कोराडी परिसरात पर्यावरण पर्यटन प्रकल्पाला प्रतिवर्ष १ रूपये भाडे तत्वावर जमीन मंजूर
6
“सत्तेत नसूनही काँग्रेसकडून तरुणांच्या हाताला काम, प्रत्येक जिल्ह्यात रोजगार मेळावा”: सपकाळ
7
मालेगाव ब्लास्ट प्रकरण : साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर यांच्यासह ७ जणांच्या निर्दोष मुक्ततेविरोधात उच्च न्यायालयात सुनावणी, आली मोठी अपडेट
8
केवळ ₹11,000 मध्ये आपली बनवा 'ही' नवी ढासू SUV, 52 भाषांसह AI असिस्टंन्ट अन् बरंच काही;  कंपनीनं सुरू केली बुकिंग
9
Shalarth ID Scam : 'ते' ६३२ शिक्षक, मुख्याध्यापक तुरुंगात जाणार? शिक्षण क्षेत्रातील सर्वात माेठा घोटाळ्याची झाडाझडती सुरु
10
Video - "तीळ कुठे आहे हे Gemini ला कसं कळलं?"; तरुणीने सांगितला धक्कादायक अनुभव
11
Video: मोहम्मद युसूफने खालची पातळी गाठली! लाईव्ह टीव्हीवर सूर्यकुमारच्या नावाचा अभद्र उच्चार...
12
पडळकरांवर गुन्हा दाखल करा, अन्यथा जीवाचे बरे-वाईट करू; कुणी दिला इशारा, नेमके प्रकरण काय?
13
IND vs PAK हस्तांदोलन वादावर ऑस्ट्रेलियाचा रिकी पॉन्टींग स्पष्ट बोलला, पाकिस्तानला झापलं...
14
मेघालयमध्ये मोठी राजकीय उलथापालथ, ८ मंत्र्यांनी दिला राजीनामा, नेमकं कारण काय?
15
'तो जिच्यासोबत आहे तिला मी चांगलं ओळखतो', आरजे महावशबद्दल अरबाज अन् धनश्रीचं संभाषण
16
“चुकीच्या गोष्टी सुरू, खाडाखोड करून कुणबी नोंदी; रिपोर्ट मुख्यमंत्र्यांना देणार”: छगन भुजबळ
17
RSS च्या विचारानुसार नरेंद्र मोदी ७५ वर्षानंतर वानप्रस्थाश्रमात जाण्याचा राजधर्म पाळतील का?, काँग्रेसचा सवाल
18
राज ठाकरे यांच्याशी अधिकृत युती कधी जाहीर करणार?; उद्धव ठाकरे यांनी सरळ सांगितले, म्हणाले…
19
'बीडच्या रेल्वेखाली जीवन संपविणारा मी पहिला असेल'; तरुणाचे मुख्यमंत्र्यांना पत्र, कारण काय?
20
Navratri 2025: नवरात्रीत प्या झेंडूच्या फुलांचा चहा, मिळवा निरोगी डोळे, रक्तशुद्धी आणि नितळ त्वचा

Vijaya Ekadashi 2025: व्यंकटेश स्तोत्राचा लाभ अनेकांनी घेतला, विजया एकादशीपासून तुम्हीही करा सुरुवात!

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 22, 2025 13:27 IST

Vijaya Ekadashi 2025: विजया एकादशी अर्थात विजय देणारी एकादशी, त्यानिमित्त एखादी उपासना करण्याच्या विचारात असाल, तर सलग २१ दिवस दिलेली उपासना करा.

२४ फेब्रुवारी रोजी विजया एकादशी (Vijaya Ekadashi 2025) आहे. त्यादिवशी विष्णु पूजेचे विशेष महत्त्व असते. विष्णुंच्या दशावताराबरोबरच पांडुरंग, बालाजी हीदेखील विष्णुरूप मानली जातात. त्या रूपाची पूजा म्हणून विजया एकादशीला पांडुरंगाष्टक, विष्णूसहस्त्रनाम किंवा व्यंकटेश स्तोत्र म्हणावे असे सांगितले जाते. पैकी व्यंकटेश स्तोत्राचा महिमा अनेकांनी अनुभवला आहे. ज्यांना शक्य आहे त्यांनी हे व्रत जरूर अंगिकारावे, ज्यांना नियम पाळणे शक्य नाही, त्यांनी निदान तिन्ही सांजेला व्यंकटेश स्तोत्र अवश्य म्हणावे. विजया एकादशीच्या मुहूर्तावर या व्रताची सुरुवात करणे उचित ठरेल, जेणेकरून तुम्हाला तुमच्या कार्यक्षेत्रात विजय प्राप्त होईल. 

व्यंकटेश स्तोत्र पठणाचे नियम: 

 १) एक मंडल म्हणजे २१ वेळा या स्तोत्राचा पाठ म्हणणे. 

२) हे स्तोत्र २१ दिवस (कोणताही दिवस, वार, पक्ष चालतो), रोज अर्धरात्री १२.०० वाजता (शुचिर्भुत होउन), म्हणायला सुरुवात करावी, संपवावे आपल्या गतीने, हरकत नाही, पण सुरु मात्र ठीक १२ वाजता रात्री करावं.  

३) ह्या २१ दिवसांत ह्या सर्व गोष्टी जितक्या होऊ शकतील तितक्या टाळाव्या . काम, क्रोध, लोभ, मोह, मद, मत्सर, ईर्ष्या, असत्य विचार्-वर्तन्-वचन, कोणावर अन्याय.करणे टाळावे.  

४) रोज रात्री हे स्तोत्र म्हणतांना पूर्वेकडे तोंड करुन निळ्या, आसनावर मांडी घालुन बसावं . 

५) एकाग्रतेने, इकडे-तिकडे न पाहाता, कोणाकडेही काहीही लक्ष न देता म्हणावं अथवा वाचावं. 

६) २१दिवस पूर्ण झाल्यावर जे काही ईच्छित असेल ते पूर्ण होतेच. 

खालील गोष्टींकडे जरा लक्ष द्या : 

या सेवे मध्ये काही अज्ञात शक्ती  तुम्हाला चक्क बाधा आणतील २१ दिवस काही तुमचे पुरे होऊ देणार नाही, त्या आधीच काहितरी चुक करुन  अगदी नीट लक्ष कुठेतरी, कसातरी, कुठुनतरी हे तुम्हाला हे बाधा रहित पणे २१ दिवस पूर्ण होऊ देणार नाही. पण आपण ढळायचे नाही!! . २१ दिवस कसोटीने हे पूर्ण केल्यावर व्यंकटेशाला कुठल्या ना कुठल्या रुपांत तुम्हाला भेटायला यायचे असते. तो तुम्हीच ओळखायचा. हा जागृति, स्वप्न, सुषुप्ती ह्या कोणत्याही आपल्या अवस्थांमध्ये येऊ शकतो !! 

|| शुभं भवतु || 

ग्रहपीडा निवारण, संकटनिवारण करण्यासाठी अत्यंत प्रभावी स्तोत्र.     श्री व्यंकटेश स्तोत्र 

व्यंकटेशो वासुदेवःप्रद्युम्नोऽमितविक्रमः।संकर्षणो अनिरुद्धश्र्च शेषाद्रिपतिरेवचः ॥१॥जनार्दनः पद्मनामो वेंकटाचलवासिनः ।सृष्टीकर्ता जगन्नाथो माधवो भक्तवत्सलः॥२॥गोविंदो गोपतिः कृष्णः केशवो गरुडध्वजः ।वराहो वामनश्चैव नारायण अधोक्षजः ॥३॥श्रीधरः पुंडरिकाक्षः सर्वदेवस्तुतो हरीः ।श्रीनृसिंहो महासिंहः सूत्राकारः पुरातनः ॥४॥रमानाथो महाभर्ता मधुरः पुरुषोत्तमः ।चोलपुत्रप्रियः शांतो ब्रह्मादिनां वरप्रदः ॥५॥श्रीनिधिः सर्वभूतानां भयकृद् भयनाशनः ।श्रीरामो रामभद्रश्च भवबंधैकमोचकः ॥६॥भूतावासो गिरावासः श्रीनिवासः श्रियःपतिः अच्युतानंद गोविंद विष्णुर्वेंकटनायकः ॥७॥सर्वदेवैकशरणं सर्वदेवैकदैवतं ।समस्तदेवकवचं सर्वदेवशिखामणिः ॥८॥इतीदं कीर्तितं यस्य विष्णोरमिततेजसः ।त्रिकाले यः पठेन्नित्यं पापं तस्य न विद्यते ॥९॥राजद्वारे पठेद् घोरे संग्रामे रिपुसंकटे ।भूत-सर्प-पिशाचादि भयं नास्ति कदाचन ॥१०॥अपुत्रो लभते पुत्रान् निर्धनो धनवान्भवेत् । रोगार्ते मुच्यते रोगात् बद्धो मुच्येत बंधनात् ॥११॥यद् यदिष्टतमं लोके तत् तत् प्राप्नोत्यसंशयः ।ऐश्वर्यं राजसंन्मानं भुक्तिमुक्तिफलप्रदम् ॥१२॥विष्णोर्लोकैकसोपानं सर्वदुःखैकनाशनं ।सर्वऐश्वर्यप्रदं नृणां सर्वमंगलकारकम् ॥१३॥मायावी परमानंद त्यक्त्वा वैकूठमुत्तमं ।स्वामिपुष्करिणीतीरे रमया सह मोदते ॥१४॥कल्याणाद्भूत गात्राय कामितार्थप्रदायिने ।श्रीमद् वेंकटनाथाय श्रीनिवासाय ते नमः ॥१५॥

टॅग्स :Puja Vidhiपूजा विधी