शहरं
Join us  
Trending Stories
1
रोहित शर्मा, विराट कोहली २०२७च्या वनडे विश्वचषकाचा भाग नसणार? समोर आली मोठी अपडेट
2
"पुढील २४ तासांत मी भारतावर आणखी..."; डोनाल्ड ट्रम्प यांचा पुन्हा थयथयाट; नवीन इशारा काय?
3
एअरटेलने जिओला मागे टाकले! पहिल्या तिमाहीत ५९४८ कोटींचा नफा; महसुलातही मोठी वाढ
4
जायचं होतं जपानला, पोहोचल्या जयपूरला! युक्रेनच्या अध्यक्षांची बायको भारतात कशा पोहोचल्या?
5
₹500 नोट एटीएममधून मिळणे बंद होणार? मोदी सरकारने संसदेत दिले उत्तर
6
मुलगा वापरायचा मृत आईचं बँक खातं, अचानक खात्यात आले १०० कोटी रुपये, त्यानंतर...
7
निळेशार डोळे असलेल्या मॉडेलचं डोनाल्ड ट्रम्प का करतायत तोंडभरून कौतुक? कारण खूपच खास
8
Vivo Y400 5G: एमोलेड डिस्प्ले, ६००० mAh बॅटरी आणि बरेच काही; विवो व्हाय ४०० भारतात लॉन्च!
9
Video - "पळ भावा पळ..."; ढिगाऱ्यात अडकलेल्या दोघांनी मृत्यूला दिला चकवा, पुरात चमत्कार
10
कबुतरांना खाद्य मिळण्याचा मार्ग मोकळा; कबुतरखान्यांबद्दल CM फडणवीसांचा महत्त्वाचा निर्णय
11
भारताला धमकी मिळाल्यानंतर रशिया संतापला; अमेरिकेला सांगितलं, 'धमकी देऊ नका'
12
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचा कार्यक्रम ठरला; कधी होणार महापालिका निवडणुका?
13
निसर्गाचा प्रकोप! ३४ सेकंदात सगळंच संपलं, सुंदर धरालीच्या विनाशाचे धडकी भरवणारे फोटो
14
एसटी महामंडळ राज्य शासनाचे अधिकृत यात्री ॲप चालवणार, परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांची घोषणा
15
तयारीला लागा! उद्धव ठाकरेंचे पदाधिकाऱ्यांना आदेश; मनसेसोबतच्या युतीबाबत म्हणाले...
16
बेस्टच्या ऑफिसमध्ये पैसे उडवून डान्स? २०१७ मधल्या 'त्या' घटनेवर माधवी जुवेकर म्हणाली- "रात्री दोन मंत्र्यांचे फोन आले..."
17
७०, ५०, ४० की ३५ किलो; ट्रेनमध्ये किती सामान घेऊन जाऊ शकता? अन्यथा मोठा दंड होऊ शकतो
18
Vastu Tips: दारात ठेवण्याचे पायपुसणे हिरव्याच रंगाचे का असावे? खरंच होतो का भाग्योदय?
19
खिशातून एक रुपयाही न भरता शेतकऱ्यांना मिळेल वार्षिक ३६,००० पेन्शन, योजनेचा कसा घ्यायचा फायदा?
20
Shravan Purnima 2025: नारळी पौर्णिमेला समुद्राला श्रीफळ का अर्पण करतात? त्यामागे आहे 'हे' विशेष कारण!

विजया एकादशी: ‘या’ श्लोकातून उलगडले शेषशायी विष्णूंचे रहस्य; भावार्थ समजून घ्या, रोज म्हणा!

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 5, 2024 13:11 IST

Vijaya Ekadashi 2024: काही श्लोक आपण दररोज म्हणतो. मात्र, त्याचा अर्थ काय असतो, ते आपल्याला माहिती असतेच, असे नाही. जाणून घ्या...

Vijaya Ekadashi 2024: माघ महिन्याच्या वद्य पक्षातील एकादशी विजया एकादशी म्हणून ओळखली जाते. रामायणात प्रभू श्रीरामांनी या एकादशीचे व्रत केले होते, अशी मान्यता आहे. प्रत्येक मराठी महिन्याच्या शुद्ध पक्षात आणि वद्य पक्षात एकादशी येते. या प्रत्येक एकादशीचे महत्त्व आणि मान्यता अगदी वेगवेगळ्या आहेत. तसेच या प्रत्येक एकादशीची नावेही अगदी वैशिष्ट्यपूर्ण आहेत. या एकादशींच्या नावावरून त्याचे वेगळेपण आणि महत्त्व विषद होत असते. मराठी वर्षात येणाऱ्या सर्व एकादशी दिनी भगवान श्रीविष्णूंचे पूजन केले जाते. या दिवशी श्रीविष्णूंचे विविध श्लोक, स्तोत्रे, मंत्र पठण, जप आवर्जून केला जातो. 

०६ मार्च रोजी विजया एकादशी आहे. काही श्लोक आपल्या रोजच्या म्हणण्यातील असतात. अगदी लहानपणापासून आपण काही श्लोक नित्यनेमाने म्हणत असतो. मात्र, अनेकदा श्लोकाच्या अर्थाकडे आपले लक्ष जात नाही. केवळ तोंडपाठ असतात म्हणून आणि सवयीचा भाग म्हणून ते म्हटले जात असतात. तसाच हा भगवान महाविष्णूंची स्तुती आणि वैशिष्ट्ये सांगणारा हा श्लोक आपण रोज म्हणतो. विजया एकादशी निमित्त या श्लोकाचा अर्थ समजून घेऊ.

शांताकारं भुजगशयनं पद्मनाभं सुरेशम्,  विश्वाधारं गगनसदृशं मेघवर्णम् शुभांगम्।लक्ष्मीकांतं कमलनयनं योगिभिर्ध्यानिगम्यम्,  वन्दे विष्णुं भवभयहरं सर्वलोकैकनाथं।।  

दुष्टांचा नायनाट आणि सज्जनांचा उद्धार करण्यासाठी गर्दीला मार्ग दाखवायला मार्गदर्शक लागतोच. मोहिमेची अंमलबजावणी करायला नेता लागतोच. शत्रूशी दोन हात करायला सेनापती लागतोच, तसाच आयुष्याला दिशा दाखवणारा गुरु लागतोच. या सर्व भूमिका एकत्रपणे एकहाती सांभाळणारे कुशल दैवत म्हणजे, भगवान महाविष्णू! त्यांच्या व्यक्तिमत्त्वाचे गुणविशेष या श्लोकात वर्णन केले आहेत. कोणत्याही समूहाचे, कार्याचे नेतृत्त्व करणाऱ्या नेत्याकडे, नायकाकडे हे गुण असले पाहिजेत. भगवान महाविष्णूंना आपले आदर्श मानले पाहिजे, असे म्हटले जाते. 

श्लोकाचा भावार्थ काय?

- शांताकारं: व्यक्ती नुसती शांत असून उपयोगी नाही. अनेकदा वरवर शांत दिसणारी व्यक्ती आतून धुमसत असते. अस्वस्थ असते, चरफडत असते. कारण, अशी व्यक्ती स्फोटक ठरू शकते. व्यक्ती केवळ शांत 'दिसून' उपयोगी नाही, तर ती अंतर्बाह्य 'शांत'ही असावी लागते. शांत डोक्याची व्यक्तीच कठीणात कठीण परिस्थिती नियंत्रणात आणू शकते.   

- भुजगशयनम्: शांत कोणीही बसेल, पण भुजंगाची शय्या, म्हणजे फारच झाले. घरात छोटसे फुरसे आढळले, तरी लोक दहा आकडी सापडल्याचे वर्णन करून रंगवून सांगितले जाते. सर्पमित्र येऊन भोवऱ्याची दोरी पकडावी, तसे अलगद उलचून घेऊनही जातात. इथे तर शेषराजांवर स्वार होऊन भगवंत कृष्णावतारात नाचत आहेत, विष्णू अवतारात झोपत आहेत. या प्रतिकात्मक रूपकातून महाविष्णूंनी दाखवून दिले आहे की, संकट कितीही मोठे असो, ते गुंडाळून त्यावर स्वार होता आले पाहिजे. संकटकाळातही सहजतेने आयुष्य जगता आले पाहिजे. तरच तुम्ही इतरांना धीर देऊ शकाल. नायकाने घाबरून, डगमगून चालत नाही. तो स्थिर असला, तरच त्याचे अनुयायी त्याचे अनुकरण करणार आहेत. आणि नायकाचे वेगळेपण अधोरेखित होणार आहे, पद्मनाभं सुरेशम्!

- विश्वाधारम् गगनसदृशम्: या अखिल विश्वावर आजवर एवढी संकटे आली, त्यांचा निभाव लावताना विष्णू डळमळीत झाले नाहीत, उलट त्यांनी विश्वाला आधार दिला म्हणून त्यांना जगद्पालक अशी बिरुदावली मिळाली. पृथ्वीच्या टोकावर कुठेही गेलात, तरी विस्तीर्ण आकाश जसे आपली साथ सोडत नाही, तसे सर्वव्यापक भगवान महाविष्णू गगनसदृश्य आहेत. आयुष्याच्या प्रत्येक टप्प्यावर ते आपल्या पाठीशी आहेत. 

- मेघवर्णम् शुभांगम्: मेघांसारखी त्यांची श्यामल कांती आहे आणि मेघाप्रमाणेच प्रेमाचा वर्षाव करण्याचे सामर्थ्य आहे. त्यांना पाहून कोणालाही आनंदच होईल, असे त्यांचे व्यक्तिमत्त्व आहे, म्हणून त्यांना शुभांगम् म्हटले आहे. 

- लक्ष्मीकांतं कमलनयनम्: शब्दश: ज्यांच्या घरात लक्ष्मी पाणी भरते, असे महाविष्णू कामे थांबवून निष्क्रिय झालेले नाहीत, तर त्यांनी जगराहाटीचा व्यवहार सुरू ठेवला आहे. आपल्या कमलनयनांनी, कृपादृष्टीने ते जगाकडे पाहत आहेत. कमलनेत्राचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे, सकारात्मक दृष्टीकोन. कमळ चिखलात उगवते, तरीही सुंदर, टवटवीत असते. चिखलात राहूनही, स्वत:ला डाग लावून न घेता आपले आयुष्य आनंदाने जगते. तसेच नेतृत्व करणाऱ्या व्यक्तीला संकटातही संधी शोधून सकारात्मक दृष्टीकोन देता आला पाहिजे. 

अशा भगवान विष्णूंच्या दर्शनासाठी योगी, तपस्वी, ऋषी, मुनी, भाविक सदैव धडपडत असतात. योगिभिर्ध्यानिगम्यम्. भगवान महाविष्णू केवळ शूर, साहसी आणि सत्याची कास धरणाऱ्या व्यक्तीलाच साथ देतात. म्हणून आपणही त्यांच्या कृपेस पात्र होऊया. साऱ्या विश्वावर कोणतेही संकट आले, तरी ते पार करण्यासाठी लागणारे धैर्य मागुया व या विश्वाचे कल्याण होवो, हे दान पदरात पाडून घेऊया, वन्दे विष्णुं भवभयहरं सर्वलोकैकनाथं. 

नेपाळमध्ये आहे शेषशायी विष्णूचे मंदिर

नेपाळची राजधानी काठमांडूपासून ८ कि.मी. अंतरावर असलेल्या शिवपुरी पर्वतरांगांमध्ये वसलेल्या तलहटी या गावात शेषशायी विष्णूचे मंदिर आहे. मंदिराच्या वैशिष्ट्यामुळे जगभरातील भाविक, पर्यटक येथे आवर्जुन येत असतात. या मंदिरातील विष्णूंची मूर्ती भव्य आहे. ११ नागांच्या शेषशैय्येवर विराजमान ही मूर्ती रहस्यमय आहे. शेषशैय्येवरील श्रीविष्णू एका पाय दुसऱ्या पायावर ठेवून निद्रावस्थेत आहेत. ११ नाग श्रीविष्णूंचे छत्र बनले आहेत. या मंदिरात श्रीहरि म्हणजेच श्रीविष्णूंसोबत महादेव शिवशंकर विराजमान आहेत.

 

टॅग्स :Puja Vidhiनवरात्री पूजा विधी २०२३spiritualअध्यात्मिक