शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
2
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
3
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
4
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
5
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
6
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
7
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
8
२०१४ मधील पोलिस कोठडी मृत्यू प्रकरणी सात पोलिसांविरुद्ध खुनाचा आरोप कायम
9
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
10
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
11
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
12
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
13
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
14
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
15
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
16
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
17
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
18
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
19
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
20
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
Daily Top 2Weekly Top 5

Vijaya Ekadashi 2023: विजया एकादशीनिमित्त जाणून घेऊया परदेशात स्थित असलेली सर्वात उंच विष्णू मूर्ती!

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 16, 2023 07:00 IST

Vijaya Ekadashi 2023: माघ मासातील विजया एकादशी १६ आणि १७ तारखेत विभागून आली आहे, तरी १७ तारखेची तिथी ग्राह्य धरली जाईल, त्यानिमित्त घेऊया हे विष्णूदर्शन!

भारतात हिंदू देवी-देवतांची अनेक आश्चर्यकारक मंदिरे आहेत आणि त्यांच्याशी संबंधित अनेक रहस्ये अजूनही उलगडलेली नाहीत. जगातील विविध देशांमध्ये हिंदू देवी-देवतांची प्रसिद्ध मंदिरेही आहेत. पण काही मंदिरे खूप खास आहेत. असेच एक मंदिर मुस्लिम देशात आहे. भगवान विष्णूची जगातील सर्वात उंच मूर्ती येथे स्थापित आहे. तर मुस्लिम समाजाचे सर्वाधिक अनुयायी येथे आहेत. ही विष्णू मूर्ती आहे इंडोनेशियात. त्याबद्दल सविस्तर माहिती जाणून घेऊया. 

१२२ फूट उंचीची मूर्ती बनवण्यासाठी २४ वर्षे लागली

मुस्लिम देश इंडोनेशिया हा एक असा देश आहे जिथे हिंदू भगवान विष्णूंची जगातील सर्वात उंच मूर्ती स्थापित आहे. हिंदूंची लोकसंख्या सर्वाधिक असलेल्या भारतातही इतकी मोठी विष्णूमूर्ती नाही. ही मूर्ती इंडोनेशियातील बाली बेटावरील केनकाना पार्कमध्ये आहे. ही मूर्ती १२२ फूट उंच आणि ६४ फूट रुंद असून ती बनवण्यासाठी २४ वर्षे लागली. या मूर्तीमध्ये भगवान विष्णू गरुडावर विराजमान आहेत. ही मूर्ती २०१८ मध्ये पूर्ण झाली असून ती पाहण्यासाठी जगभरातून लोक येतात. ही मूर्ती तांबे आणि पितळाची आहे.

ही योजना १६ वर्षांपूर्वी तयार करण्यात आली होती 

इंडोनेशियामध्ये राहणारे शिल्पकार बाप्पा नुमान नुआरता यांनी १९७९ मध्ये अशी महाकाय मूर्ती बनवण्याचे स्वप्न पाहिले, जी आजपर्यंत जगात कुठेही बनलेली नाही. त्यानंतर ही मूर्ती घडवण्याचे नियोजन सुरू झाले. तब्बल १६ वर्षांच्या नियोजनानंतर त्यावर काम सुरू झाले. ते तयार करण्यासाठी कोट्यवधी रुपये खर्च करण्यात आले.

देशाच्या विमान कंपनीचेही नाव विष्णूच्या वाहनाच्या नावावर आहेया मुस्लिम देशात हिंदू देवी-देवतांची लोकप्रियता खूप जास्त आहे. येथे हिंदू देवतांची मोठ्या प्रमाणावर पूजा केली जाते. भगवान विष्णूचे वाहन असलेल्या गरुडाच्या नावावरून इंडोनेशियन विमान कंपनीचे नाव गरुड एअरलाइन आहे, हा लोकांच्या श्रद्धेचा परिणाम आहे. त्याचप्रमाणे इंडोनेशियाची रामलीलाही जगप्रसिद्ध आहे.