शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

वास्तुशास्त्र सांगते, घरात चुकूनही 'ही' रोपटी लावू नका, अन्यथा कार्यात येतील अनेक अडथळे!

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 3, 2021 14:48 IST

घराच्या आत आणि टेरेस आणि बाल्कनीमध्ये रोपटी लावताना काही गोष्टी जाणून घेणे फार महत्वाचे आहे.

आपल्याला निसर्गात रमायला आवडते, परंतु वेळेअभावी निसर्गात रमणे शक्य नाही म्हणून आपण निसर्गच घरात आणतो. तो म्हणजे बाग बगीच्यांच्या स्वरूपात! हौसेने आपण अनेक प्रकारची रोपे लावतो, त्यांची उत्तम मशागत करतो, देखभाल करतो. त्यापैकी काहींची छान वाढ होते, तर काहींची खुंटून जाते. परंतु हौसेपायी लावलेल्या झाडांमध्ये चुकून आपण अशी काही झाडं तर लावत नाही ना, जी आपल्याच मार्गात काटे पेरण्याचे काम करतील? 

म्हणून वास्तुशास्त्रानुसार घरात कोणती रोपटी लावावीत आणि कोणती लावू नयेत, याची माहिती घेऊया. 

वास्तुशास्त्रामध्ये घर आणि ऑफिसमधील प्रत्येक गोष्टीसंदर्भात योग्य दिशानिर्देश आणि निवड करण्याचे मार्गदर्शन केले गेले आहे. यात घरात ठेवलेल्या वनस्पतींचादेखील समावेश आहे. काही झाडे घराच्या वातावरणास शुद्ध करतात आणि सकारात्मक ऊर्जा निर्माण करतात, तर काही झाडे बर्‍याच समस्या निर्माण करतात. अशा परिस्थितीत घराच्या आत आणि टेरेस आणि बाल्कनीमध्ये रोपटी लावताना काही गोष्टी जाणून घेणे फार महत्वाचे आहे.

चुकूनही काटेरी रोपं लावू नका:  अलीकडे फेंगशुईच्या नावावर निवडुंगाचे अनेक प्रकार विकले जातात. विविध आकाराचे निवडुंग काटेरी असूनही आकर्षक दिसतात, परंतु वास्तुशास्त्र अशी रोपटी घरात ठेवण्यास परवानगी देत नाही. अशी रोपटी अकारण वादाला आणि ताण तणावाला कारणीभूत ठरतात. अशा रोपट्यांचा वापर घर सजावटीचा भाग म्हणून करू नये. अशाने घर चांगले दिसेलही, परंतु घरातील शांततेला सुरुंग लागण्याची शक्यता आहे. म्हणून आपल्या हातांनी आपल्या घरात काटे पेरू नका. 

चिकाची झाडे : अशी अनेक रोपटी आहेत, ज्यांची पाने मध्यातून तोडली असता चीक अथवा दुधासारखा द्रव पदार्थ स्रवतो. अशी रोपटी, झाडं राना वनात उगवतात व ती तिथेच शोभून दिसतात. कारण त्यातील रस विषारीदेखील असू शकतो. चुकून या पानांचा कोणी वापर केल्यास त्याच्या आरोग्याला धोका निर्माण होऊ शकतो. म्हणून घराच्या परिसरात अशा झाडांची लागवडच नको! अशी झाडे राना वनातील पशु पक्ष्याचे खाद्य असते. त्यामुळे अशी रोपटी घरात लावून घराला अरण्य बनवू नका. 

वृक्षांचे बियाणे घरात रुजवू नका: वृक्षाचे बियाणे गॅलरीच्या कुंडीत रोवणे उचित नाही. आंबा, जांभूळ, आवळा, वड हे वृक्ष हिंदू संस्कृतीत पूजनीय असले, तरी वास्तू शास्त्रानुसार आपल्या घरच्या बगिच्यात त्याची लागवड करणे योग्य नाही. असे बियाणे जमिनीत रुजले तर त्याची पाळे मुळे खोलवर रुजतात. घराच्या कुंड्यांमध्ये शोभेसाठी लावलेली ही झाडं जमिनीत रुजवताना मुळांना धक्का लागून त्यांची वाढ खुंटण्याची शक्यता असते. यासाठीच ही रोपटी थेट जमिनीत लावावीत आणि त्यांची निगा राखावी, पण घरात लावू नयेत. अगदीच हौस म्हणून लावायचे असेल तर बोन्साय झाडांचा वापर करता येईल. 

सकारात्मकता देणारी रोपटी : डोळ्यांना आल्हाददायक वाटेल, ज्यांची वेगाने वाढ होईल, फुलांनी मोहरून जाईल, असे रोपटे आपल्या बगिच्यात लावावे. ते पाहून मन प्रसन्न होईल. यात तुळशीच्या रोपाचा आवर्जून समावेश करावा. कारण जेवढी सकारात्मकता एकट्या तुळशीच्या रोपात आहे, ती अन्य कशात नाही!