शहरं
Join us  
Trending Stories
1
महादेवी हत्ती परत आणण्यासाठी राजू शेट्टींची आत्मक्लेष पदयात्रा; अनेकांनी घेतला सहभाग
2
"मी माझी कबर खोदतोय, इथेच दफन..."; हमासने दाखवला इस्रायली ओलिसाचा भयानक Video
3
भारताच्या हाती खजिना लागला खजिना...! कोळशाच्या खाणीत दडलेला; लोकसभेत मोठी घोषणा...
4
Priyanka Chaturvedi : "जवानांच्या रक्तापेक्षा पैसा महत्त्वाचा..."; भारत-पाकिस्तान मॅचवरून प्रियंका चतुर्वेदींचा हल्लाबोल
5
वॉरेन बफेटही चुकले! ज्या कंपनीत हात घातला तीच बुडाली, सर्वात मोठं नुकसान! नेमकं काय घडलं?
6
वर्षभरापासून बेपत्ता होता नवरा, मोबाईलने उलगडलं गूढ; बायकोनेच रचलेला भयंकर कट
7
‘मोदी-योगी आणि इतरांची नावे घेण्यास भाग पाडले’; साध्वी प्रज्ञा ठाकूर यांचे एटीएसवर गंभीर आरोप
8
राज्यमंत्री मेघना बोर्डीकर पुन्हा वादात; भर सभेत ग्रामसेवकाला कानाखाली मारण्याची भाषा
9
ट्रम्प यांचा 'हा' निर्णय भारताला नव्हे तर अमेरिकेलाच महागात पडणार? अहवालातून मोठा खुलासा!
10
भरधाव बोलेरो कालव्यात कोसळली; ११ जणांचा गाडीतच मृत्यू, बाहेर येण्यासाठी धडपडत राहिले
11
मैदानावर विराट, व्यवसायात विकास! विराट कोहलीच्या १०५० कोटींच्या साम्राज्याचा 'हा' आहे खरा हिरो!
12
'पाकिस्तानात नाही, तर बलुचिस्तानमध्ये तेल सापडले', बलोच नेत्याचे डोनाल्ड ट्रम्प यांना पत्र
13
भारती सिंगने सर्वांसमोर जाळली महागडी 'लाबूबू डॉल'! कारणही सांगितलं, म्हणाली- "माझा छोट्या मुलाला.."
14
पायी जाणाऱ्या दोघांना भरधाव कारने उडविले, दोघांचा जागीच मृत्यू; छत्रपती संभाजीनगरमधील घटना
15
भारतासोबत वाद ओढवून घेणे मोठी चूक, मोदी...; हात पोळलेल्या कॅनडाच्या बिझनेसमनचा ट्रम्पना इशारा...
16
खुशखबर! रक्षाबंधनपूर्वी RBI देणार मोठी भेट? कर्ज घेणाऱ्यांना दिलासा, तुमचा EMI होणार स्वस्त?
17
जिभेचे चोचले पडतील महागात! अल्ट्रा-प्रोसेस्ड फूडमुळे फुफ्फुसांच्या कॅन्सरचा धोका, रिसर्चमध्ये खुलासा
18
Ankita Lokhande : "ते आमच्या घराचा..."; अंकिता लोखंडेच्या हाऊस हेल्परची मुलगी बेपत्ता, पोलिसांत केली तक्रार
19
केंद्रीय मंत्री नितीन गडकरींचे नागपुरातील घर उडविण्याची धमकी, निनावी कॉलने सुरक्षायंत्रणांची धावपळ
20
सामाजिक न्याय विभागाचे ४१० कोटी लाडक्या बहिणींसाठी वळते : खोब्रागडे

देव, देश, धर्माची सुयोग्य सांगड घालणारे स्वातंत्र्यवीर वि. दा. सावरकर यांची जयंती!

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 27, 2023 07:00 IST

''देहाकडून देवाकडे जाताना देश लागतो''... म्हणणाऱ्या स्वातंत्र्यवीर सावरकरांचं 'अध्यात्म!'

ज्या कालखंडामध्ये भारतामधली बहुतांशी माणसं इंग्रजांसाठी चंदनासारखी झिजत होती, अशा वेळी हा भूलथापांनी फसवणारा इंग्रज आपला शत्रू आहे, हे वयाच्या चौदाव्या वर्षी एका तरुणाने अचूक ओळखले आणि आपण जो मार्ग अवलंबला, तो योग्यच होता ह्या मताशी वयाच्या ऐंशीव्या वर्षापर्यंत जे ठाम राहिले, ते होते स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर! २८ मे रोजी त्यांची तारखेनुसार जयंती. 

सुखवस्तू घरात जन्माला येऊन, उच्चशिक्षण घेऊन, कुटुंबकबिला सांभाळत आनंदात जीवन व्यतीत करायचे सोडून सावरकर कुटुंबीयांनी घरावर तुळशीपत्र ठेवले. त्यांची पुढची पिढी अर्थात विनायक सावरकरांचा सुपुत्र प्रभाकर अवघा सहा महिन्यांचा असताना आजारी पडून देवाघरी गेला, त्यावर शोक व्यक्त करण्याऐवजी सावरकर आपल्या वहिनीचे पत्राद्वारे सांत्वन करताना लिहितात, 

अनेक फुले फुलती। फुलोनिया सुकोनी जाती।कोणी त्यांची महती गणती। ठेवली असे।।परी जे गजेंद्रशुंडेने उपटीले। श्री हरीसाठी मेळे।।कमल - फूल ते अमर ठेले । मोक्षदायी पावन।।त्या पुण्यगजेंद्रासमयी । मुमुक्षु स्थिती भारतीची ।।करुणारवे ती याची । इंदीवरशामा श्रीरामा।।

त्यानुसार सावरकर कुटुंब पुष्प देशकार्यात कामी आले आणि त्याचे निर्माल्य झाले असे समजू. 

अशा काव्यप्रतिभेतून कणखर सावरकरांची आध्यात्मिक बाजू आपल्या समोर येते. नव्हे, तर ती पदोपदी दिसते. सावरकरांवर बालपणापासूनच आध्यात्माचे संस्कार झाले होते. आईची छत्रछाया बालपणीच हरपली, परंतु वडील, वडीलबंधू आणि येसू वहिनी यांच्या सान्निध्यात सावरकरांचा आध्यात्मिक पिंड चांगलाच निपजला होता. अशातच त्यांनी बालवयात रामायण, महाभारतापासून अनेक ग्रंथांचा, चरित्रांचा अभ्यास केला होता, त्यामुळे त्यांची वैचारिक बैठक पक्की झाली होती. 

सावरकरांच्या अध्यात्मिक शक्तीने त्यांना पदोपदी साथ दिली. काळ्या पाण्याची खडतर शिक्षा भोगण्याचे सामर्थ्य मिळाले. तिथल्या तुरुंगवासात त्यांनी केलेली काव्यरचना, पाठांतर, चिंतन, मनन या गोष्टींमुळे ते त्याही कठीण परिस्थितीत तग धरू शकले. 

मातृभूमीला आई मानून तिच्या स्वातंत्र्याचा त्यांनी ध्यास घेतला होता. परदेशात गेल्यावर आईशी झालेली ताटातूट त्यांना व्याकुळ करत असे. `ने मजसी ने परत मातृभूमीला, सागरा प्राण तळमळला' असे ते सागराला विनवित असत. 

प्रखर हिंदूत्त्व जाणणारे आणि मानणारे सावरकर अशी त्यांची ओळख असली, तरी हिंदूत्त्वामागील त्यांचा विचार व्यापक होता. त्यांना जातपातरहित हिंदूत्त्व अपेक्षित होते. म्हणूनच त्यांनी रत्नागिरी येथे 'पतितपावन मंदिर' उभारले आणि तिथे जातिबांधवांना प्रवेश मिळवून दिला. सहभोजन केले आणि माणसाने माणसांना माणुसकीने वागवले पाहिजे, ही शिकवण घालून दिली.

संपूर्ण आयुष्य मातृभूमीच्या कार्यार्थ वेचून झाल्यावर आपल्या आयुष्याची इतिश्री करताना प्रायोपवेशनाचा मार्ग त्यांनी अवलंबिला होता आणि आपलं उदात्त कार्य मागे ठेवून ते भारतमातेच्या कुशीत कायमचे विसावले होते. 

टॅग्स :Vinayak Damodar Savarkarविनायक दामोदर सावरकर