शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

मनरुपी इंजिनाला भक्तीमार्गाकडे वळवा; इंद्रिये आपोआप त्या मार्गाने जातील

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 3, 2021 18:08 IST

इंजिना पाठोपाठ रेल्वेचे डबे धावतात. डब्याच्या पाठोपाठ इंजिन धावत नाही तसेच मनाच्या मागे इतर इंद्रिये धावत असतात मग या मनरुपी इंजिनालाच जर भक्तीमार्गाकडे वळविले तर प्रश्नच निर्माण होत नाही. इतर इंद्रिये आपोआप त्या मार्गाने जातील..!

- ह.भ.प. ऋतुपर्ण भरतबुवा रामदासी ( बीड, महाराष्ट्र )

राघवाच्या अनंत पंथाकडे जाण्यासाठी मन जर भक्तीच्या मार्गाने तर श्रीहरी सहज प्राप्त होईल. भक्ती मार्गासाठी मनाचे सहाय्य नसले तर; कांहीही उपयोग नाही. मन हे सहावें इंद्रिय आहे. गीता माऊली म्हणते -

मनः षष्ठाणि इंद्रियाणि प्रकृतिस्थानि कर्षति ।

इंजिना पाठोपाठ रेल्वेचे डबे धावतात. डब्याच्या पाठोपाठ इंजिन धावत नाही तसेच मनाच्या मागे इतर इंद्रिये धावत असतात मग या मनरुपी इंजिनालाच जर भक्तीमार्गाकडे वळविले तर प्रश्नच निर्माण होत नाही. इतर इंद्रिये आपोआप त्या मार्गाने जातील पण सगळ्यात अवघड हेच आहे की - मन हे भक्तीमार्गाकडे सहज वळत नाही. दासगणू महाराज म्हणतात -

करुं कायी करुं कायी । मन हे ऐकत नाही ।बुद्धी कराया पुण्य जाय । परिमन खेचि अघडोही ॥

मन हे सगळ्यांत अवखळ इंद्रिय आहे. मन हे नाठाळ मुलासारखे आहे. मन हे अवखळ जनावरासारखे आहे. अवखळ जनावराला वठणीवर आणण्यासाठी त्याच्या गळ्यात जसे लोढणे घालतात तसे मनाला लोढणे हवे आहे. बहिणाबाई चौधरी एका काव्यात बहारीचे वर्णन करतात -

मन वढाय वढाय । उभ्या पिकातलं ढोरं ।किती हाकला हाकला । पुन्हा येते पिकावर ॥

नामस्मरणामध्ये, भक्तिमार्गामध्ये कितीही अवीट गोडी असली तरी विषयाच्या ध्यासाने वेडे झालेले मन, मनुष्य देहाला येण्यापूर्वी फक्त विषय सुखाचीच गोडी अनुभवलेली असल्यामुळे या ही जन्मांत पुन्हा विषयांकडेच धाव घेते.तुकाराम महाराज देखील म्हणतात -

काय करुं आता या मना । न सांडी विषय वासना ॥प्रार्थिता राही राहेना । आदरे पतना नेऊ पाहे ॥आता धावे धावे गा श्रीहरी । गेलो वाया नाही तरी ॥न दिसे कोणी आवटी । आणिक दुजा तयासी ॥

मन विषयाचेच चिंतन करीत असल्यामुळे ते विषयासक्त झालेले असते. खरं तर मन इंद्रियांच्या आधीन होऊन बुद्धीचा दरवाजा झाकते आणि बुद्धीच नष्ट झाल्यामुळे -

बुद्धी नाशात् प्रणश्यति ।

सर्वनाश होतो म्हणून तर श्रीसमर्थ रामदास स्वामी मनांच्या दुसर्‍याच श्लोकांत या मनालाच उपदेश करतात की - बा मना.! तूं भक्तीच्याच मार्गाने जा..!

मना सज्जना भक्तीपंथेचि जावे ।तरी श्रीहरी पाविजेतो स्वभावे ।

॥ जय जय रघुवीर समर्थ ॥

( लेखक हे युवा कीर्तनकार आहेत, त्यांचा भ्रमणध्वनी ८७ ९३ ०३ ०३ ०३. )

टॅग्स :Adhyatmikआध्यात्मिकspiritualअध्यात्मिक