शहरं
Join us  
Trending Stories
1
'मतदार याद्यांमध्ये घोळ, आम्हालाही मान्य; आमची मागणी होती की...", CM फडणवीसांचं मोठं विधान
2
सरकारने आयकर विधेयक २०२५ मागे घेतले; टॅक्स स्लॅबमध्ये काय बदल होणार? जाणून घ्या...
3
तेल कंपन्यांना 30,000 कोटींचे अनुदान, उज्ज्वला योजनेसाठी...; केंद्र सरकारने घेतले पाच मोठे निर्णय
4
ज्या आदित्य श्रीवास्तवचं नाव घेऊन राहुल गांधींनी ECI ला घेरले; तोच आता समोर आला, सांगितलं 'सत्य'
5
Eknath Shinde : ज्यांनी स्वाभिमान गुंडाळून ठेवला, त्यांचं....; उद्धव ठाकरेंना मागची जागा दिल्यावरून एकनाथ शिंदेंचा टोला
6
राहुल गांधींच्या आरोपानंतर काँग्रेस आक्रमक; दादरमध्ये रास्ता रोको, भाजपाविरोधात घोषणाबाजी
7
NASA : नासाचा मोठा निर्णय! इंटरनॅशनल स्पेस स्टेशन समुद्रात पाडणार! कारण ऐकून धक्का बसेल
8
अतुल परचुरेंच्या आठवणीत भावुक झाले दिलीप प्रभावळकर; म्हणाले, "डॉक्टरांनी त्याला..."
9
IND vs AUS: टीम इंडियाविरुद्ध ऑस्ट्रेलियाचा संघ जाहीर, भारतीय वंशाच्या दोन खेळाडूंना संधी!
10
हृदयस्पर्शी! "तुम्ही माझ्यासाठी श्रीकृष्णासारखे..."; महिलेने साडी फाडून मुख्यमंत्र्यांना बांधली राखी
11
Donald Trump Tariff News : अमेरिकाच टॅरिफबाबत गंडली! ट्रम्प यांची भारताबद्दल कडक भूमिका, पण परराष्ट्र मंत्रालय करतंय कौतुक
12
२ तासांचा हायव्हॉल्टेज ड्रामा, गर्लफ्रेंडच्या मिठीत सापडला नेता; पत्नीला पाहून पती पळाला, पण...
13
आकाश 'वाणी'! वैभव सूर्यवंशीमुळे स्टार विकेट किपर बॅटर संजूवर आलीये संघ सोडण्याची वेळ!
14
भारतीयांसाठी कॅनडा ठरतोय मृत्युचं घर; गेल्या ५ वर्षातील आकडे चिंताजनक!
15
प्राजक्ता माळीने वाढदिवशी घेतलं भीमाशंकरचं दर्शन; म्हणाली, "१२ ज्योतिर्लिंग यात्रा पूर्ण..."
16
चालत्या बसवर झाड कोसळलं, ५ जणांचा मृत्यू; महिला म्हणते, "आयुष्याचा प्रश्न, तुम्ही Video बनवताय"
17
BCCI: बीसीसीआय नव्या प्रशिक्षकाच्या शोधात, अर्जही मागवले! जाणून घ्या पात्रता
18
धनंजय मुंडेंनी मंत्रिपद स्वप्नातही पाहू नये, पुन्हा घेतले तर अजितदादांचा पक्ष संपेल: जरांगे
19
Video: हृदयस्पर्शी! हत्तीच्या पिंजऱ्यात पडला चिमुकला; गजराजाने जे केले त्यानं सर्वांचीच मने जिंकली
20
काय आहे युनिव्हर्सल बँकिंग? ११ वर्षांत पहिल्यांदाच RBI नं कोणत्या बँकेला दिला असा लायसन्स

Tulasi Tips: उन्हाळ्यातही तुळस टवटवीत ठेवायची असेल तर एक चमचा दह्याचा 'असा' करा वापर!

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 19, 2024 14:24 IST

Tulasi Tips: तुळस जेवढी पवित्र तेवढीच ती नाजूक; विशेषतः उन्हाळ्यात ती कोमेजू नये म्हणून दिलेला उपाय नक्की करा.  

तुळस हा तर हिंदू संस्कृतीचा जीव की प्राण! तिचे धार्मिक, अध्यात्मिक, वैज्ञानिक, आयुर्वेदिकदृष्ट्या अतिशय महत्त्व आहे. त्यामुळे घरात इतर कोणती रोपटी असो वा नसो, तुळशीचे रोप असतेच असते. परंतु बऱ्याचदा इच्छा असूनही तुळस फार दिवस टिकत नाही. विशेषत: उन्हाळ्यात ती वाळून जाते. एक तर कोरडी पडते, खुंटून जाते, मलूल पडते नाहीतर तुळशीला कीड लागते. अशा वेळी जुने रोप बदलून नवे रोप लावण्याशिवाय पर्याय उरत नाही. परंतु, दर वेळी दहा-पंधरा रुपयांचे नव नवे रोपटे आणण्यापेक्षा घरातल्या तुळशीला दीर्घकाळ कसे टिकवता येईल, यासाठी प्रयत्न करू. 

>> तुळशीला जास्त पाणी घातले तर ती मरते. आपले पूर्वज रोज तुळशीला पाणी घालत होते, पण तेव्हा घरादारात तुळशीचे वृंदावन असे. मोठ्या वृंदावनात पेलाभर पाणी सहज शोषले जात असे. परंतु आपण लावलेले रोपटे छोटेसे असते आणि त्यावर पाण्याचा मारा केला तर ते मरते. म्हणून तुळशीला सुरुवातीला व्यवस्थित पाणी घातल्यानंतर रोज माती भिजेल एवढेच पाणी घालावे. 

>> कुंडीतून पाणी झिरपेल अशा बेताने दोन छिद्र पाडावीत. तुळशीचे र लावताना कुंडीमध्ये सर्वात खाली वाळूचा एक थर पसरवून घ्यावा. तसेच भुसभुशीत माती, वाळू आणि कोरडे शेण एकत्र करून कुंडीत पसरवून घ्यावा. यात मातीचे प्रमाण सत्तर टक्के, वाळूचे प्रमाण पंधरा टक्के आणि शेणाचे प्रमाण पंधरा टक्के असावे. 

>> तुळशीचे रोप निवडताना त्याची पाने चांगली तपासून घ्यावीत. पाने मोठी, छान आणि हिरवीगार असतील आणि त्याला मोहोर असेल, तर ती तुळस चांगली मानली जाते. अशा तुळशीला प्लॅस्टिक आवरणातून बाहेर काढून कुंडीतील मातीत रुजवावे आणि वरून आणखी एक मातीचा थर रचावा व पहिल्या वेळेस व्यवस्थित पाणी टाकून घ्यावे आणि नंतर थोडे थोडे पाणी टाकत राहावे. यात कोकोपीटचाही वापर करता येईल. 

>> तुळशीला पुरेसा सूर्यप्रकाश मिळायला हवा. अपुऱ्या सूर्य प्रकाशाअभावी तुळशीचे रोपटे मलूल होते आणि त्याची अन्न निर्मिती प्रक्रिया थांबते. काही काळातच रोपटे मान टाकते. म्हणून तुळशीचे रोप सूर्य प्रकाश मिळेल अशा जागी लावावे. 

>> तुळशीला कीड पटकन लागते. यासाठी दर वीस-बावीस दिवसांनी त्यावर सैंधव मीठ मिश्रित पाण्याचा फवारा करावा. हा फवारा केल्यानंतर एक दोन दिवसानंतर तुळशीची पाने धुवून मगच वापरावीत.

>> गोवऱ्यांचा एक तुकडा पाण्यात एक दिवसभर भिजवून ते पाणी महिन्यातून एक दोनदा तुळशीला घालावे. तुळशीला आवश्यक सर्व घटक त्यातून मिळतात. 

>> तुळशीची वाढ चांगली होण्यासाठी मंजिरी फार दिवस ठेवू नये. ती खुडून तिचा चुरा पुन्हा कुंडीतल्या मातीत टाकावा. मंजिरी खुडल्यामुळे आणि वरवरची पाने अलगद तोडल्यामुळे तुळशी अधिकाधिक बहरते, फोफावते. 

या सगळ्या क्लुप्ती तुम्हीदेखील वापरून पहा, शिवाय तुमच्या माहितीत आणखी काही क्लुप्त्या असतील, तर जरूर सांगा, जेणेकरून दुसऱ्यांच्या अंगणातील तुळस आणखी बहरेल आणि त्यांच्या घरीदेखील सुख समृद्धी नांदेल. 

टॅग्स :Summer Specialसमर स्पेशल