शहरं
Join us  
Trending Stories
1
'पाकिस्तानचे दोन तुकडे करा, पाकव्याप्त काश्मीर भारतात घ्या', काँग्रेसच्या मुख्यमंत्र्याची PM मोदींकडे मागणी
2
पहलगाम हल्ल्यात हिंदूच टार्गेट! आधी पॅन्ट काढल्या अन् 'खतना' न केलेल्यांचीच हत्या; तपास पथकाकडून मोठा खुलासा
3
मालेगावमध्ये ईडीचे छापे; जप्त केली बांगलादेशी रोहिंग्यांची बनावट कागदपत्रे आणि दाखले
4
Pahalgam Terror Attack: लष्कराची मोठी कारवाई! आणखी दोन दहशतवाद्यांची घरे स्फोटके लावून पाडली
5
पाकिस्तानच्या नापाक कारवाया थांबत नाहीत, २४ तासांत दुसऱ्यांदा नियंत्रण रेषेवर गोळीबार, भारतीय सैन्याने दिले चोख प्रत्युत्तर
6
"विकी कौशलमुळे 'छावा' चालला असं नाही, तर...", महेश मांजरेकर स्पष्टच बोलले
7
"हे काही टीव्ही शोज नाहीयेत...", अभिनेत्री शिवानी सुर्वेनं प्रसारमाध्यमांना फटकारलं
8
EPFO नं केला मोठा बदल, जॉब बदल्यावर PF ट्रान्सफर करणं होणार सोपं; १.२५ कोटी लोकांना फायदा
9
अक्षय शिंदे प्रकरणी आदेश देऊनही पोलिसांविरोधात गुन्हा दाखल न केल्याने हायकोर्टाचा संताप
10
PPF ची 'ही' ट्रिक अनेकांना माहीत नाही, बनेल १ कोटींचा फंड, वर्षाला मिळू शकतं ७ लाखांपेक्षा अधिक व्याज
11
मोठी बातमी: एल्फिन्स्टन ब्रिज सोमवारपर्यंत बंद होणार नाही; नागरिकांच्या आंदोलनाची थेट मुख्यमंत्र्यांनी घेतली दखल!
12
भारत-पाकमध्ये पाण्यावरून युद्ध होईल? तणाव वाढला; पाकिस्तानात हाहाकार, कारण...
13
भारताकडून पाकिस्तानला पाण्याचा थेंबही मिळणार नाही; केंद्र सरकारनं आखली रणनीती
14
अजित पवार यांचा अधिकाऱ्यांना सज्जड दम; सांगितलेली कामे केली नाहीत, तर पुढच्या बैठकीला..
15
आजचे राशीभविष्य, २६ एप्रिल २०२५: शक्यतो आज आर्थिक देवाण-घेवाण करू नका
16
अखेर पाक म्हणाला, होय, आम्ही दहशतवाद्यांना पोसले; संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ यांची कबुली
17
एकही पाकिस्तानी भारतात राहणार नाही याची खात्री करा; शाहांचा सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना फोन
18
पाकिस्तानी नागरिकांवर महाराष्ट्रात वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना आदेश
19
राहुल गांधी यांना सर्वोच्च न्यायालयाने फटकारले; "स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल..."
20
संसदेने मंजूर केलेला कायदा संवैधानिक, स्थगिती देऊ नका; केंद्र सरकारची मागणी

उद्या आहे या वर्षातील शेवटचा गुरुपुष्यामृत योग; या मुहूर्तावर काय करणे शुभ ठरेल ते पाहू!

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 24, 2021 16:38 IST

गुरुपुष्यामृत योग म्हणजेच गुरु पुष्यनक्षत्र योग. आपल्या भारतीय संस्कृतीप्रमाणे हा योग सर्वात शुभ योग म्हणून ओळखला जातो. गुरुपुष्यामृत हा योग पुष्य नक्षत्रासाहित गुरुवारी येतो. हा योग खूप महत्वाचा मानला जातो. या मुहूर्तावर अनेक प्रकारच्या शुभ कार्याचा शुभारंभ केला जातो. 

गेल्या वर्षी अर्थात २०२० मध्ये ३१ डिसेंबर रोजी गुरु पुष्यामृत योग आला होता. यावर्षी डिसेंबर महिन्यात गुरुपुष्यामृत योग येणार नसून तो थेट २०२२ मध्ये येईल. अशा पार्श्वभूमीवर उद्या म्हणजेच २५ नोव्हेंबर रोजी जुळून येणाऱ्या गुरुपुष्यामृत योगाचे महत्त्व अधिक ठरते. 

गुरुपुष्यामृत योग मुहूर्त : सकाळी ६. ५४ ते सायंकाळी ६. ४८

गुरुपुष्यामृत योग म्हणजेच गुरु पुष्यनक्षत्र योग. आपल्या भारतीय संस्कृतीप्रमाणे हा योग सर्वात शुभ योग म्हणून ओळखला जातो. गुरुपुष्यामृत हा योग पुष्य नक्षत्रासाहित गुरुवारी येतो. हा योग खूप महत्वाचा मानला जातो. या मुहूर्तावर अनेक प्रकारच्या शुभ कार्याचा शुभारंभ केला जातो. 

पुष्यामृत गुरुवारी येणे हा योग दुर्मिळ आहे. म्हणूनच आपण याला अमृत योग असे संबोधितो.  घरातील ईशान्य कोपऱ्यात म्हणजेच देव्हाऱ्यात उजव्या कोपऱ्याला श्रीसुक्त , पुरुषसुक्त वाचून व पंचोपचार पूजा करून कलश स्थापना केल्यास घरात धन-धान्य वृद्धी व लक्ष्मीप्राप्ती होते. त्यासाठी पुढीलप्रमाणे कलश स्थापना करावी :-

एक चौरंग, एक पाट, चौरांगाभोवती आंब्याच्या चार डगळे लावावेत. चौरंगावर शुभ्र पांढरे वस्त्र टाकावे. त्यावर मध्यभागी थोडे तांदूळ टाकावे. त्यावर एक कलश, त्यात पाणी, नाणे व सुपारी टाकून ठेवावा. त्यात पाच विड्याची पाने ठेवावीत. त्यावर श्रीफळ ठेवावे.

आपण पूजेकरिता भरून घेतलेल्या कलशात गंध, अक्षता व फुले टाकावीत व खालील मंत्र म्हणावा -कलश देवताभ्यो नम: || सकलपूजार्थे गंधाक्षता पुष्पाणि समर्पयामि ||प्रार्थनापूर्वक नमस्काराणि समर्पयामि ||

कलशाला गंध लावताना : -श्री कलश देवताभ्यो नम: | विलेपनार्थ चंदनम् समर्पयामि || २) कलशाला अक्षता व हळद-कुंकू वाहताना : -श्री कलश देवताभ्यो नम: | अलंकारार्थे अक्षताम् समर्पयामि || हरिद्रा कुंकुम सौभाग्यद्रव्याणि समर्पयामि ||

३) कलशाला फूल वाहताना : -श्री कलश देवताभ्यो नम: | ऋतुकालोद्धव पुष्पम समर्पयामि ||

४) कलशाला आगरबत्ती ओवाळताना : श्री कलश देवताभ्यो नम: | धूपम् आघ्रपयामि ||

५) कलशाला दीप ओवाळताना : -श्री कलश देवताभ्यो नम: | दीपं दर्शयामि ||

६)कलशासमोर पाण्याने भरीव चौकोन काढून त्यावर खडीसाखरेची वाटी ठेऊन गायत्री मंत्र म्हणून त्या वाटीत तुळशीची पान ठेवावे. नंतर दुसरे तुळशीचे पान घेऊन तीनवेळा वाटी भोवती फिरवावे व फिरवताना खालील मंत्र म्हणावा : - 

सत्यंत वर्तेन परिसिंचयामी ओम तत्सवितूरवरेण्यं | भर्गो देवस्य धिमही धियो यो न: प्रचोदयात |

७) नंतर तुळशीचे पान कलशासमोर ठेवतांना खालील मंत्र म्हणावा:ओम प्राणाय स्वाहा | ओम अपानाय स्वाहा | ओम व्यानाय स्वाहा | ओम उदानाय स्वाहा | ओम सामान्य स्वाहा | ओम ब्राम्हणे अमृतत्वाय स्वाहा ||

पुन्हा एकदा दुसरे तुळशीचे पान घेऊन वरीलप्रमाणे तीनवेळा फिरवून मंत्र म्हणून कलशासमोर ठेवावे. अशाप्रकारे गुरुपुष्यामृताच्या मुहूर्तावर पूजा विधी पार पाडला जातो.