शहरं
Join us  
Trending Stories
1
Pahalgam Terror Attack: लष्कराची मोठी कारवाई! आणखी दोन दहशतवाद्यांची घरे स्फोटके लावून पाडली
2
भारताची धास्ती घेत पाक लष्कराची सीमेवर मोठ्या प्रमाणात जमवाजमव; सैनिकांची संख्या वाढवली
3
मोठी बातमी: एल्फिन्स्टन ब्रिज सोमवारपर्यंत बंद होणार नाही; नागरिकांच्या आंदोलनाची थेट मुख्यमंत्र्यांनी घेतली दखल!
4
भारत-पाकमध्ये पाण्यावरून युद्ध होईल? तणाव वाढला; पाकिस्तानात हाहाकार, कारण...
5
भारताकडून पाकिस्तानला पाण्याचा थेंबही मिळणार नाही; केंद्र सरकारनं आखली रणनीती
6
आजचे राशीभविष्य, २६ एप्रिल २०२५: शक्यतो आज आर्थिक देवाण-घेवाण करू नका
7
अखेर पाक म्हणाला, होय, आम्ही दहशतवाद्यांना पोसले; संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ यांची कबुली
8
एकही पाकिस्तानी भारतात राहणार नाही याची खात्री करा; शाहांचा सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना फोन
9
पाकिस्तानी नागरिकांवर महाराष्ट्रात वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना आदेश
10
राहुल गांधी यांना सर्वोच्च न्यायालयाने फटकारले; "स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल..."
11
संसदेने मंजूर केलेला कायदा संवैधानिक, स्थगिती देऊ नका; केंद्र सरकारची मागणी
12
भारतात द्वेषाचा वणवा पेटवण्याचं एक षड्‌यंत्र; ‘बदला’ घेण्याची घाई नको, ‘धडा’ शिकवला पाहिजे
13
नरेंद्र मोदी यावेळी बालाकोटच्याही पुढे जाणार?; पुढच्या दोन आठवड्यांत आणखी कठोर पावले
14
हम सब एक है! अतिरेकी व त्यांच्या सूत्रधारांचा कायमस्वरूपी बंदोबस्त करण्याची मागणी
15
कृषी विकासासाठी ६५ बाजार समित्या; अद्याप राज्यातील ६८ तालुक्यांत समित्याच नाहीत
16
"आणखी किती वेळ सहन करणार..."; चिठ्ठी लिहून नवी मुंबईतील विकासकानं संपवलं आयुष्य
17
मेमध्ये जिल्हा समित्या, जूनमध्ये महामंडळे; भाजपाच्या वरिष्ठांचा कार्यकर्त्यांना शब्द
18
‘साहेब’ होऊ घातलेला बिरदेव म्हणतो, शेळ्या-मेंढ्यांना काय लाजायचं? तीच माझी ताकद
19
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
20
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे

आज काळभैरव जयंती; झोपण्याआधी वाचा  कालभैरवाष्टकम् स्तोत्र!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 7, 2020 20:53 IST

त्यामुळे कार्तिक महिन्यातील अष्टमीला काळभैरव अष्टमी असे देखील म्हटले जाते. प्रत्येक महिन्याच्या कृष्णपक्षातील अष्टमी ही काळभैरवला समर्पित आहे.

देवाधिदेव महादेव यांना आपण भोलेनाथ म्हणतो. परंतु त्यांनी तिसरा डोळा उघडला की नजरेस पडतो, तो त्यांचा रुद्रावतार! असेच शत्रूंच्या संहारासाठी त्यांनी धारण केलेले एक रूप म्हणजे कालभैरव. आज त्यांची जयंती आहे.   भैरव हा शक्तिपीठाचा रक्षक आहे. त्यामुळे सर्वच शक्तिपीठांच्या ठिकाणी भैरवाचे स्थान असते, असे सांगितले जाते. कालाष्टमीच्या दिवशी काळभैरवांचा जन्म झाला होता. त्यामुळे कार्तिक महिन्यातील अष्टमीला काळभैरव अष्टमी असे देखील म्हटले जाते. प्रत्येक महिन्याच्या कृष्णपक्षातील अष्टमी ही काळभैरवला समर्पित आहे. त्यामुळे प्रत्येक महिन्यात "कालाष्टमी" असते. पण या सर्वात महत्वाची कार्तिक महिन्याची अष्टमी असून हा दिवस पापी, अत्याचारी व अन्यायी लोकांना शिक्षा देण्याचा दिवस म्हणून मानला जातो, अशी आख्यायिका आहे. मान्यतेनुसार काळा कुत्रा हा काळभैरवचे प्रतीक मानला जातो. या दिवशी काळभैरवाष्टक तसेच महाकाळभैरवाष्टक म्हणावे. व काळभैरवाची स्तुती करावी. 

हेही वाचा : 'नेकी कर, और दर्या में डाल' सुभाषितकार सांगत आहेत, परोपकाराचे महत्त्व!

 कालभैरवाष्टकम्

देवराज्य सेव्यमान पावनाघ्रिपंकजम्।व्यालयज्ञ सूत्रमिंदू शेखरं कृपाकरम्।नारदादि योगिवृंद वंदितं दिगंबरम्।काशिकापुराधिनाथ कालभैरवम् भजे ।।१।।

भानुकोटिभास्वरं भवाब्दितारकं परं।नीलकण्ठमीप्सिथार्थ दायकं त्रिलोचनम।कालकाल मम्बुजाक्ष मक्षशूलमक्षरं।काशिकापुराधिनाथ कालभैरवम् भजे।।२।।

शूलटंक पाशदण्ड पाणिमादिकारणं।श्यामकायमादिदेवमक्षरं निरामयम।भीमविक्रम प्रभुं विचित्र तांडवप्रियं।काशिकापुराधिनाथ कालभैरवम् भजे।।३।।

भुक्तिमुक्ति दायकं प्रशस्तलोकविग्रहं।भक्तवस्तलं स्थितं समस्तलोकविग्रहं।विनिकण्वन्मनोज्ञ् हेम् किंकिणीलस्तकटिं।काशिकापुराधिनाथ कालभैरवम् भजे।।४।।

धर्मसेतू पालकं अधर्ममार्ग् नाशकम्।कर्मपाशमोचकम् सुशर्मदारकम् विभुम्।स्वर्णवर्ण शेष् पाश शोभितांगमण्डलं।काशिकापुराधिनाथ कालभैरवम् भजे।।५।।

रत्नपादुकाप्रभाभिराम पाद युग्मकम्।नित्यमद्वितीयमिष्ट दैवतं निरंजनम्।मृत्युदर्प नाशनं करालदंष्ट्र मोक्षणम्।काशिकापुराधिनाथ कालभैरवम् भजे।।६।।

अट्टहास भिन्नपद्म जाण्ड् कोश संततिं।दृष्टिपात नष्टपाप जालमुग्र शासनं।अष्टसिद्धिदायकं कपालमालिकन्धरं।काशिकापुराधिनाथ कालभैरवम् भजे।।७।।

भूतसंघनायकं विशालकिर्तीदायकं।काशिवास लोकपुण्यपापशोधकं विभुम्।नितिमार्गकोविदम् पुरातनम् जगत्पतिं।काशिकापुराधिनाथ कालभैरवम् भजे।।८।।

कालभैरवाष्टकम् पठन्ति ये मनोहरं।ज्ञानमुक्ति साधनम् विचित्रपुण्यवर्धनम्।शोक मोह दैन्य लोभ कोपतापनाशनम्।ते प्रयान्ति कालभैरवांघ्रिसन्निधिम् धृवम् ।।९।।

इति श्रीमत् शंकराचार्यविरचितं कालभैरवाष्टकम् संपूर्णम्।

हेही वाचा : देवाधिदेव महादेवांनादेखील 'राम'नामाचीच मात्रा लागू झाली होती.