शहरं
Join us  
Trending Stories
1
राष्ट्रवादीने पत्ते उघडले; शिक्षक मतदारसंघासाठी सुनिल तटकरेंनी केली उमेदवाराच्या नावाची घोषणा
2
उत्तर कोरियाच्या हेरगिरी उपग्रहाचं प्रक्षेपण अपयशी, उड्डाण करताच काही सेकंदात उडाल्या रॉकेटच्या ठिकऱ्या
3
‘’हवे तेवढे पैसे घ्या, पण मला मारू नका’’, अपघातानंतर ‘बाळा’ने दाखवला पैशांचा माज, प्रत्यक्षदर्शीचा दावा  
4
राजकोट अग्नितांडव! गेम झोनच्या मालकाचाही जळून मृत्यू, आईच्या DNA मुळे पटली ओळख...
5
माजी IAS अधिकाऱ्याच्या पत्नीच्या हत्येचे गूढ उकलले; जवळच्याच लोकांकडून दगाफटका, ३ आरोपींना अटक!
6
"युवासेनेच्या पदाधिकाऱ्याला कोस्टल रोडचे काम"; आदित्य ठाकरेंच्या इशाऱ्यानंतर भाजपचे प्रत्युत्तर
7
आणखी एका फॅक्टरीमध्ये बॉयलरचा स्फोट, ४० कामगार होरपळले, ८ जणांची प्रकृती गंभीर
8
 प्रचारसभेवेळी राहुल गांधी झाले उकाड्याने त्रस्त, भरसभेत डोक्यावर ओतलं पाणी   
9
'कान्स'मधलं वातावरण भारावून टाकणारं होतं - छाया कदम
10
शालिमार-मुंबई एलटीटी एक्स्प्रेसमधील बंद एसीवरून प्रवाशांचा संताप
11
राज्यातील दुष्काळाच्या मुद्द्यावर काँग्रेस आक्रमक, परिस्थितीच्या पाहणीसाठी विभागवार समित्यांची स्थापना
12
कोस्टल रोडच्या टनेलला गळती, व्हिडिओ समोर येताच CM शिंदे 'इन अॅक्शन'; कायमस्वरुपीच्या दुरुस्तीचे आदेश!
13
WhatsApp युजर्सना खुशखबर! आता मोठे Voice मेसेज पाठवता येणार, जाणून घ्या कसे?
14
India vs Pakistan मध्ये भारतच जिंकेल; पाकिस्तानच्या माजी खेळाडूनं व्यक्त केला विश्वास
15
घरातून एकत्रच पळाल्या ३ मुली; पत्र वाचून कुणीही शोधण्याची हिंमत केली नाही, अखेर...
16
AAP नेत्या आतिशी यांच्याविरोधात कोर्टाने बजावले समन्स, केजरीवालही आहेत आरोपी, जाणून घ्या प्रकरण
17
ट्रेनमध्ये सीट बुक केली, तरीही उभे राहून करावा लागला प्रवास; रेल्वेला ठोठावला १३ हजारांचा दंड!
18
"यामिनी जाधवांकडून सापळेंवर कमिशनचे आरोप"; चौकशीचा ड्रामा कशासाठी म्हणत ठाकरे गटाची टीका
19
अमेरिकेतील संकट बनलं भारतासाठी संधी?; औषध उत्पादक कंपन्यांना मोठा फायदा
20
अमेरिकेत कारच्या धडकेत भारतीय विद्यार्थिनीचा मृत्यू; शिक्षण पूर्ण करुन नोकरीच्या होती शोधात

ज्ञानेश्वरीची प्रत्येक ओवी शब्दश: जगणारे उपासक गोविंदकाका उपळेकर यांची आज पुण्यतिथी!

By ऑनलाइन लोकमत | Published: October 06, 2023 3:54 PM

'एक तरी ओवी अनुभवावी' असं नामदेव महाराज म्हणतात, मात्र ज्यांनी ज्ञानेश्वरीचं तत्त्वज्ञान आयुष्यात उतरवलं त्या उपासकाचं आयुष्य कसं असेल ते जाणून घेऊया. 

>> रोहन उपळेकर 

आज भाद्रपद कृष्ण अष्टमी, प.पू.सद्गुरु श्री.गोविंदकाका उपळेकर महाराज यांची ४९ वी पुण्यतिथी ! आजपासून त्यांच्या सुवर्ण महोत्सवी पुण्यतिथी वर्षाची (पन्नासाव्या पुण्यतिथी वर्षाची) सुरुवात होत आहे. 

राजाधिराज श्रीअक्कलकोट स्वामी समर्थ महाराजांच्या कृपापरंपरेतील महान विभूतिमत्त्व आणि भगवान श्री ज्ञानेश्वर माउलींचे पूर्णकृपांकित सत्पुरुष, प.पू.सद्गुरु श्री.गोविंदकाका महाराज उपळेकर हे फार विलक्षण महात्मे होते. सदैव आपल्याच अवधूती मौजेत रममाण असणारे प.पू.श्री.काका सद्गुरु श्री माउलींच्या श्री ज्ञानेश्वरीची ओवीन् ओवी अक्षरश: जगत होते.

२०१८ साली आजच्याच तिथीला, प.पू.श्री.काकांच्या पावन स्मृतिकथा व चरित्रावर आधारित 'स्वानंदचक्रवर्ती' हे माझे पुस्तक प.पू.श्री.काकांच्या समाधी समोर प्रकाशित झाले होते. 'स्वानंदचक्रवर्ती' ग्रंथाच्या प्रस्तावनेत प.पू.सद्गुरु श्री.काकांचे माहात्म्य यथार्थ शब्दांत सांगताना, श्रीदत्तसंप्रदायाचे अध्वर्यू प.पू.श्री.शिरीषदादा कवडे लिहितात, "विसाव्या शतकात महाराष्ट्रात ज्या श्रेष्ठ, अग्रगण्य भगवद् विभूती होऊन गेल्या त्यांच्यात प.पू.श्री.गोविंद रामचंद्र उपळेकर उपाख्य 'काका' महाराज ह्यांची गणना होते. परमबोधावस्थेत सतत रममाण राहणारे काका, संतत्वाचा उत्तुंग आदर्श होते. ते स्वानंदसाम्राज्याचे अनभिषिक्त चक्रवर्ती होते. लौकिकातल्या कुठल्याही प्रसंगांत त्यांच्या अंत:करणाची ब्रह्मबैसका सुटलेली दिसत नसे. प्राप्त पुरुषाची ती समग्र दैवी सुलक्षणे त्यांच्या ठायी सुखाने, आपलेपणाने तिन्ही त्रिकाळ नांदत होती. सहज, अखंड समाधीचे शांभवी वैभव त्यांच्या सर्व लीलाव्यवहारांमधून सदैव ओसंडत असे !"

प.पू.श्री.काकांनी मंगळवार दि.८ ऑक्टोबर १९७४ रोजी, आजच्याच तिथीला सायंकाळी ६ वाजून १० मिनिटांनी आपल्या नश्वर देहाचा त्याग केला. त्यापूर्वी साधारणपणे दीड-दोन महिने आधी फलटणला एक प्रसंग घडला. प.पू.श्री.काकांच्या दर्शनाला कै.श्री.ज्ञाननाथजी रानडे व काही मंडळी फलटणला आली होती. प.पू.श्री.काका आपल्याच अवस्थेत असले तरी फार सूचक वाक्ये बोलून जात. तसेच त्या वेळी क्रिकेट खेळाचा संदर्भ घेऊन प.पू.श्री.काका अचानक उद्गारले, "कशी झाली मॅच ? खेळाडू धावपट्टीवर येतो, खेळतो. जेवढा दम असेल तेवढी फटकेबाजी करून धावा काढतो. त्यातही प्रेक्षकांना आपली कलाकुसर दाखवतो. बॉल टाकल्यावर त्याचा झेल देऊन आऊट होणे चांगले. स्टंप मारून किंवा उडून आऊट (क्लीन बोल्ड) होण्यात काय मजा आहे ? हा चेंडू-फळीचा खेळ भगवान श्रीकृष्ण परमात्म्यापासून तो श्रीकृष्णदेवांपर्यंत (प.पू.श्री.काकांचे सद्गुरु) आम्ही खेळत आलेलो आहोत. खेळ खेळ म्हणून खेळायचा, त्याला भ्यायचे नाही. हाच खेळ सर्व संत मंडळींसमवेत खेळत राहावयाचा आहे ! खेळ मांडियेला वाळवंटी घाई । नाचती वैष्णव भाई हो ।"

वरकरणी अतिशय गूढ वाटणारे हे प.पू.श्री.काकांचे बोल अत्यंत महत्त्वपूर्ण आहेत. यातून त्यांनी आपल्या दैवी जन्मकर्माचे व अलौकिक देहत्यागाचे रहस्यच सांगून टाकलेले आहे. या संदर्भात मी प.पू.श्री.शिरीषदादा कवडे यांना विचारल्यावर त्यांनी प.पू.श्री.काकांच्या या वाक्यांचा अद्भुत अर्थ सांगितला होता. तो असा की ; "प.पू.श्री.काका हे श्रीभगवंतांच्या आज्ञेने लोकांच्या उद्धारासाठीच जन्माला आलेले होते. "आम्ही वैकुंठवासी । आलो याचि कारणासी ।" ह्या श्री तुकाराम महाराजांच्या उक्तीप्रमाणे प.पू.श्री.काकाही पृथ्वीतलावर कार्यासाठीच आलेले होते. त्याअर्थाने ते भगवान श्रीकृष्णांचे खेळ-सवंगडीच होते. क्लीन बोल्ड होणे म्हणजे काळाने टाकलेल्या बॉलवर आऊट होणे, यमाच्या इच्छेने मृत्यू येणे. पण काळाच्या बॉलवर झेल (कॅच) देणे म्हणजे त्या काळाला फाट्यावर मारून स्वत:च्या इच्छेने देहत्याग करणे. ह्या प्रक्रियेत संत निष्णातच असतात. ते कधीच काळाच्या अधीन नसतात. एरवी दुर्लंघ्य असा काळ त्यांच्यासमोर मात्र कायमच हतबल असतो. आम्ही म्हणू तेव्हा आम्ही जाऊ, काळ आला म्हणून आम्ही आमची विकेट टाकणार नाही, असेच संत म्हणतात. ते यमाची बॉलिंग तर चोपूनच काढत असतात. त्यांची विकेट काढायची कोणाची ताकद आहे ?"

प.पू.श्री.काकांनी देखील असा आपल्या इच्छेने ठरवूनच देहत्याग केला होता. त्यामागचे कारणही खूप विशेष आहे. ८ ऑक्टोबर ही त्यांच्या सद्गुरूंची, प.पू.श्रीकृष्णदेव महाराजांची देहत्यागाची तारीख होती. ८ ऑक्टोबर १९२३ रोजी सद्गुरु श्रीकृष्णदेव महाराजांनी देहत्याग केला होता. म्हणूनच परम गुरुभक्त असणाऱ्या प.पू.श्री.गोविंदकाका उपळेकर महाराजांनी देखील आधी ठरवून ८ ऑक्टोबर याच तारखेला, आपल्याच इच्छेने नश्वर देहाची खोळ सांडली. आपल्या इच्छामरणाचाच सूचक संकेत प.पू.श्री.काकांनी क्रिकेटच्या संदर्भाने आलेल्या वरील वाक्यांत दिलेला स्पष्टपणे दिलेला आहे !आजच्या पावन दिनी, प.पू.सद्गुरु श्री.गोविंदकाका उपळेकर महाराजांच्या श्रीचरणीं सादर साष्टांग दंडवत !! 

प.पू.सद्गुरु श्री.गोविंदकाका उपळेकर महाराज की जय !

संपर्क : 88889 04481