शहरं
Join us  
Trending Stories
1
उपराष्ट्रपतीपदाच्या निडणुकीचा कार्यक्रम जाहीर, ९ सप्टेंबरला होणार मतदान, निवडणूक आयोगाची घोषणा, असा आहे संपूर्ण कार्यक्रम
2
ट्रम्प यांच्या टॅरिफ वॉर दरम्यान भारताचा मोठा निर्णय; अमेरिकेकडून 'एफ ३५' जेट खरेदी करणार नाही!
3
"मोहन भागवत यांना पकडण्याचे आदेश होते"; मालेगाव स्फोट प्रकरणी माजी ATS अधिकाऱ्याचा दावा
4
सॅमसंगचे स्मार्ट टीव्ही बंद पडले, ग्राहक ठणाठणा ओरडू लागले; सर्व्हर डाऊनचे मेसेज दिसू लागले...
5
Pune Crime: कोयता काढला अन् सपासप वार करत सुटला; बारामती-इंदापूर धावत्या बसमध्ये प्रवाशावर हल्ला
6
बँकेत नोकरीची सुवर्णसंधी; IPBS ची १०,२७७ पदांवर मेगाभरती, महाराष्ट्रासाठी किती जागा?
7
आता PF काढणं झालं एकदम सोपं! फक्त 'हे' काम करा आणि कागदपत्रांशिवाय काही दिवसांत पैसे मिळवा!
8
ऑगस्ट २०२५ पासून बँकिंग आणि पैशांशी निगडीत नियमांत बदल; तुमच्यासाठी जाणून घेणं अतिशय महत्त्वाचं
9
पत्नीने पतीला नपुंसक म्हणणं गुन्हा आहे?; मुंबई हायकोर्टानं दिला महत्त्वाचा निर्णय
10
मुंबई आणि मालेगाव बॉम्बस्फोटात दुटप्पी राजकारण; केशव उपाध्ये यांचा काँग्रेसवर हल्लाबोल
11
अमेरिका एवढ्या खालच्या पातळीवर जाईल असे...; केव्हा केव्हा भारताविरोधात कारस्थाने रचलेली...
12
"मला कोंडून ठेवलं, पत्नीला दुखापत..."; आमदार चेतन आनंद यांचे एम्स कर्मचाऱ्यांवर गंभीर आरोप
13
जावई पहिल्यांदा सासरवाडीत आला, सासुने मस्त चिकनचा बेत आखला; विषबाधेमुळे दोघांचाही मृत्यू
14
प्रेमाचा त्रिकोण! आमच्या दोघींपैकी एकीला निवड; गर्लफ्रेंडच्या सांगण्यावरून पतीने केला मोठा कांड
15
२४ घरं, ४ प्लॉट, ४० एकर शेतजमीन... १५ हजार पगार असलेल्या क्लार्ककडे ३० कोटींचं घबाड
16
एकमेकांना शेवटचं बघताच आलं नाही! अल्जेरियात मुलाचा मृत्यू, मृतदेहाची वाट पाहणाऱ्या वडिलांचेही निधन 
17
एन चंद्रशेखरन यांच्या हाती पुन्हा टाटा सन्सची धुरा; IPO ची वाट पाहणाऱ्यांना पुन्हा एकदा मोठा झटका
18
वडिलांचा मृत्यू, बॉयफ्रेंडसोबत पळाली आई; लेकाची पोलिसांत धाव, म्हणाला, "ते मला मारुन टाकतील..."
19
नोकरी सुरू होताच १५,००० रुपये तुमच्या खात्यात! मोदी सरकारने आणली 'ही' खास योजना, कंपनीलाही मिळेल फायदा!

प्रेमप्रीतीचें बांधलें । ते न सुटे कांही केले ॥

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 11, 2021 12:11 IST

प्रेमप्रीतीचें बंधन सहजासहजी तोडता येत नाही. एका गंध विषयाने जर त्या (भ्रमर) जीवाचा अंत केला तर पांचही विषय रात्रंदिवस उपभोगणाऱ्या या देहाचा अंत व्हायला वेळ लागेल का..? माणूस तर विषयसेवनाखेरीज अन्य कांहीच करीत नाही.

- युवा कीर्तनकार, ह.भ.प. ऋतुपर्ण भरतबुवा रामदासी ( बीड, महाराष्ट्र. )

जो शुष्क काष्ठ स्वयेकोरी । तो कोवळ्या कमळा माझारी ।भ्रमर गुंतला गंधावरी । कमळास तरी कुचंबो नेदी ॥

शांतीसागर एकनाथ महाराजांनी या ओवीत भ्रमराचा एवढा समर्पक दृष्टांत दिला आहे तो एवढ्यासाठी की, या ओवीत भ्रमर गंधावर एवढा लुब्ध होतो की, आपले अनमोल जीवन तो कमळाच्या गंधावर भुलून समर्पित करतो. मोठमोठ्या इमारतीची लाकडे पोखरण्यात पटाईत असणारा हा भुंगा, कमळातील परागकण सेवन करण्यासाठी त्या सूर्यविकासिनी कमळात प्रवेश करतो. त्या कमळातील गंध विषयाला तो इतका लुब्ध होतो की, कमळाच्या पाकळ्या गळून खाली पडू नये म्हणून तो पंखसुद्धा हलवित नाही. गंधाचे सेवन करता करता सूर्यविकासिनी कमळ आपल्या पाकळ्या मिटून घेते. आत हा भुंगा कोंडून पडतो. कशाच्या आशेने तर, उद्या सकाळ होईल, सूर्योदय होईल व या कमळाच्या पाकळ्या पुन्हा उमलतील.. हा हा म्हणता रात्र निघून जाईल व सूर्य उगवला, कमळाने आपल्या पाकळ्या उघडल्या की, आपण सुखरुप या कमळांतून बाहेर पडू..! असा विचार हा भ्रमर करतो. सुभाषितकारांनी अत्यंत रसभरीत वर्णन केले आहे ते म्हणतात-

रात्रि र्गमिष्यति भविष्यति सुप्रभातम् ।भास्वान् उदेष्यति हसिष्यति पंकजश्री: ।इत्थं विचिंतयति कोषगते द्विरेके ।हा हन्त नलिनी गज उज्जहार ॥

सकाळी बाहेर पडू असा विचार हा भ्रमर करतो खरा पण घडते काय..? सायंकाळच्या वेळी एक हत्ती त्या सरोवरात पाणी पिण्यासाठी येतो. सरोवरात जलविहार करता करता हत्ती आपल्या सोंडेने ते कमळ देठासकट उपटून पायाखाली चिरडून टाकतो आणि त्यातच या भ्रमराचा किंवा भुंग्याचा अंत होतो. अहो..! लाकडे पोखरण्यात पटाईत असणाऱ्या या भुंग्याला कमळ पोखरता आले नसते का..? पण तो गंध या विषयाच्या प्रेमात पडून स्वतःचा अंत करुन घेतो. तुकाराम महाराजांनी एका अभंगात दृष्टांत दिला -

नाही काष्ठाचा गुमान । गोंवी भ्रमरां सुमन ।प्रेमप्रीतीचें बांधलें । ते न सुटे कांही केले ॥

प्रेमप्रीतीचें बंधन असे सहजासहजी तोडता येत नाही. एका गंध विषयाने जर त्या (भ्रमर) जीवाचा अंत केला तर पांचही विषय रात्रंदिवस उपभोगणाऱ्या या देहाचा अंत व्हायला वेळ लागेल का..? माणूस तर विषयसेवनाखेरीज अन्य कांहीच करीत नाही.ज्ञानराज माऊली म्हणतात -

जैसा भ्रमर भेदी कोडे । भलतैसे काष्ठ कोरडे ।परी तो कमलकलिकेमाजि सापडे । कोवळिये ॥

तेव्हा अमर्याद विषयसेवन हे जीवाचा सर्वस्वी नाश करणारच..!

॥ जय जय रघुवीर समर्थ ॥

टॅग्स :Adhyatmikआध्यात्मिक