शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai: कबुतरांना खायला घातलं, वांद्र्यात एका महिलेसह चार जणांविरोधात गुन्हा दाखल!
2
उद्योग क्षेत्राला बूस्टर; ४० हजारांवर रोजगार, मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत ९ कंपन्यांशी करार
3
कर्जाच्या ओझ्याखाली महाराष्ट्र? विरोधकांच्या आरोपानंतर अजित पवारांनी सांगितला आकडा!
4
१ वर्षात ₹१ लाखांचे झाले ₹७४ लाख, कोणता आहे जबरदस्त शेअर ज्याला सातत्यानं लागतंय अपर सर्किट?
5
सूर्यकुमार यादवने पाकिस्तानच्या जखमेवर चोळलं मीठ, सुपर ४ मधील लढतीबाबत म्हणाला...
6
आजचे राशीभविष्य, २० सप्टेंबर २०२५: भागीदारांशी संबंध बिघडतील, वाणीवर संयम ठेवा!
7
जीएसटी कपातीचा फायदा थेट जनतेला! खर्चासाठी वाढणार हातातली रोकड; एमएसएमई उद्योगांना बळ मिळणार
8
अजित पवारांची मंत्र्यांना तंबी, वेळ नसेल तर खुर्ची रिकामी करा; चिंतन शिबिरात सुनावले खडेबोल
9
पाक-सौदीसोबत आता इतर अरब राष्ट्रेही एकत्र? पाकिस्तानचे संरक्षण मंत्री ख्वाजा आसिफ यांचा दावा
10
परिणामांचा विचार करून बोला, गोपीचंद पडळकर यांना देवेंद्र फडणवीस यांची समज
11
‘निवडणूक आयोग जागा राहिला, चोरी पाहत राहिला...’, राहुल गांधी यांचा निवडणूक आयोगावर पुन्हा हल्लाबोल
12
राज्यात पीक पेरा नोंदणी ४७ टक्केच नोंदणीस दुसऱ्यांदा ३० पर्यंत मुदतवाढ
13
अमेरिकेत टिकटॉकचं गौडबंगाल! डोनाल्ड ट्रम्प यांनी टिकटॉकच्या बाबतीतही आता आपला निर्णय फिरवला
14
बदलापूरसारखी दुसरी घटना घडण्याची वाट बघताय का?; हायकोर्टाचा संतप्त सवाल
15
आधी जिल्हा परिषद निवडणुकांचा बार! याचिका निकाली निघाल्याने मार्ग जवळपास मोकळा
16
आयोग नव्हे, मतदारच राजा !
17
विमानतळासह एरोसिटीला जोडणाऱ्या कॉरिडॉरला मंजुरी; केंद्राच्या निर्णयाने सिडकोस दिलासा, तीन किमीच्या मार्गासाठी ४४.४८ कोटींचा खर्च
18
चौथ्या मजल्यावरून पडून चिमुकला वाचला; पण कोंडीत जीव गेला
19
मते चोरी हाेणार नाहीत, याची काळजी घ्या; राज ठाकरे यांच्या सूचना
20
सिडकोच्या कंपनीतील कामगारांचा ४० वर्षे प्रलंबित प्रश्न अखेर सुटला; ११ कामगारांना प्रत्येकी १० लाखांचा धनादेश

मोक्ष मिळवण्यासाठी 'हा' एक क्षण पुरेसा आहे; कसा ते जाणून घ्या!

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 22, 2022 13:47 IST

मोक्ष या संकल्पनेबद्दल आपण बरेच स्वप्नरंजन केलेले असते, पण मोक्ष शब्दाचा अर्थ आणि सोपा मार्ग जाणून घेऊया!

>> कांचन दीक्षित

निसर्ग सकारात्मक आहे,निसर्ग सतत हिलिंग करत असतो,एक क्षणभरही न थांबता! साधं काही खरचटलं आणि थोडंसं रक्त आलं तरी त्याच क्षणी बरं होण्याची प्रक्रिया सुरु होते. निसर्गाला सगळं बरं करायचंय,पुर्ण करायचंय,संतुलन साधायचंय आणि त्यासाठी तो अखंड कार्यरत आहे.जोडणं,वर्तुळ पुर्ण करणं हेच निसर्गाचं काम.

माणूस मात्र आपल्या जखमा लपवतो,तळघरात कोंडून ठेवतो कारण त्याला वेदनेला सामोरं जाण्याचं भय वाटतं.तो त्यापेक्षा सोपं काहीतरी शोधतो,वेदना विसरण्याचा प्रयत्न करतो,स्वतःपासूनच पळतो,सुखाच्या मागे धावतो.

स्वतःला फसवतो,जखमा सुन्न करण्यात व्यस्त रहातो,मनोरंजनाचे नवनविन मार्ग शोधतो,गर्दीत रहातो,का तर एकांतात वेदना जाणवते म्हणून!हिलिंग म्हणजे शरीराला लागलेली बंदुकीची गोळी किंवा खुपसलेला बाण काढणं,Yes त्यात प्रचंड वेदना आहे,पण ती टाळण्यासाठी ती गोळी किंवा बाण तसाच राहू देणं जास्त भयानक आहे. मेंदूला फक्त वेदनेपासून पळणं माहीतीये,तो हुशार आहे त्याच्याजवळ हजारो मार्ग आहेत.तो त्याची सगळी शक्ती पणाला लावतो आणि शोधून आणतो वेदना सुन्न करण्याचे नामी उपाय!

आता निसर्ग,तो त्याचं काम सोडत नाही,अंघोळ करायला नको म्हणून सैरावैरा धावणा-या मुलाला आई बरोब्बर पकडते तसं निसर्ग आपल्याला पकडतो.कापडी पट्टयांवर आणखी पट्टया लावून झाकलेल्या,घट्ट बांधून बधीर केलेल्या वेदना,लपवलेल्या जखमा,आपली दु:खं त्याला बरी करायची आहेत,पण त्या पट्टयांनीच तर वाचवलं ना आपल्याला आत्तापर्यंत ! आपण सहजासहजी सोडणार थोडीच! आरडाओरडा,नकार,पळापळ करणारच ! मग निसर्ग आपली स्ट्रॅटेजी वापरतो,एखादा आजार,संकट,शत्रू,ट्रिगर करणारी माणसं,उधवस्त करणा-या घटना ... 

आता अडकलो ! बरीच वर्ष टाळूनही दातांच्या डाॅक्टरांच्या खुर्चीत कधीतरी बसावंच लागतं तशी वेळ !आता निसर्ग म्हणतो, किती वेळ वाया घालवलास तुझा आणि माझा ! कशाला ईतकं भोगलंस ?ही वेदना एकदाच सहन करायची होतीस,न पळता ! मग तू कधीच मुक्त झाला असतास.

एकदाच असं मरायचं की मरणातून बाहेर पडायचं,हे जमलं की मोक्ष होतो ना तसं !

आपण प्रथमच भेटतो वेदनेला,कितीही झालं तरी आपल्याच जखमा,नातंच ना एक,आपण स्विकारतो,जवळ घेतो,समजून घेतो,थोडं बोलतो,थोडं ऐकतो आणि अश्रूच्या धारांनी न्हाऊन निघतो.वेदना संपते,भीती संपते आणि विनाकारण धावत पळत थकलेला जीव विसावतो.

निसर्गाचं काम झालेलं असतं,आपण आपल्या नाकारलेल्या वेदनेला स्विकारुन बरं केलेलं असतं आणि पुर्ण संपुर्ण झालेले असतो.

मोक्ष म्हणतात तो हाच, नाही का?