शहरं
Join us  
Trending Stories
1
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
2
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
3
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
4
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
5
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
6
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
7
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
8
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
9
महाकुंभातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने केले लग्न; पत्नी काय करते? जाणून घ्या...
10
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
11
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
12
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
13
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
14
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
15
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
16
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
17
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
18
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
19
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
20
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
Daily Top 2Weekly Top 5

हरिपाठातला 'हा' अभंग म्हणजे अध्यात्माशी संबंधित आपल्या पडणाऱ्या प्रश्नांची माउलींनी दिलेली उत्तरंच आहेत!

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 24, 2023 10:26 IST

आजही अनेक घरात हरिपाठ नित्यनेमाने म्हटला जातो, त्यातील शब्दरचनेकडे डोळसपणे पाहिले असता अध्यात्माची उकल सहज होऊ शकेल. 

>> समीर सुनिल तुर्की, आळंदी 

श्रीमाऊलींच्या प्रत्येक रचनेत काही न काही नवलच सापडतं.. अगदी प्रत्येक वेळी...अर्थात ते ह्याआधीही अनेकांना सापडलं असेलच.. अगदी खात्रीशीर, निःसंशय..रात्री सहज हरिपाठ म्हणत असतांना एक अशीच फोड अनुभवायला मिळाली. श्रीमाउलींनी सर्वसामान्य लोकांना धर्म सांगितला, शिकवला, रुजवला तो किती सहज सुलभ आणि अत्यंत विशुध्द प्रकारचा आहे हे वेगळं सांगायला नकोच. मुळातच हा सगळाच पूर्णतः वेगळा आणि संशोधन व अभ्यासाचा विषय होऊच शकतो.

केवळ साधना करा असं न सांगता पाठोपाठ त्याचं फळ काय आहे हेसुद्धा नकळतपणे सांगणाऱ्या श्रीमाऊलींच्या एकमेवाद्वितीय कवित्वाची प्रचिती नव्याने अनुभवणं हेच मुळी एका वेगळ्या लेव्हलच सुख आहे.

माऊलींनी हरिपाठात साधना काय करावी आणि फळ काय मिळेल हे प्रत्येक चरणात पूर्वार्धात साधना आणि उत्तरार्धात फळ असे सांगितले आहे. उदाहरण म्हणून... 

१. साधना-देवाचिया द्वारी उभा क्षणभरी। फळ-तेणे मुक्तीचारी साधियेल्या ।।

२. साधना-हरि मुखे म्हणा हरि मुखे म्हणा ।फळ-पुण्याची गणना कोण करी।।

३. साधना-ज्ञानदेवा पाठ हरी हा वैकुंठ।फळ-भरला घनदाट हरि दिसे।।

४. साधना-ज्ञानदेवा ध्यानी रामकृष्ण मनी।फळ-अनंत जन्मोनी पुण्य होय।।

५. साधना-ज्ञानदेव म्हणे हरीजप करणे।फळ-तुटेल धरणे प्रपंचाचे।।

संपूर्ण हरिपाठ असाच अनेक गूढ, अगम्य ज्ञानाने ओतप्रोत भरलेला आहे. जितकं जास्त चिंतन करता येईल तेवढं उलगडत जाईल..श्रीमाउलींनी पुढच्या जन्मी तरी "मेधावी" बनवावं आणि सेवेतही ठेवावं इतकंच!